Sangram Chougule Biography in Marathi
बिग बॉस मराठी सीजन 5 हा कार्यक्रम महाराष्ट्रात सध्या गाजत आहे. मागील गेल्या चार सीजन पेक्षा या सीझनला जास्त पसंती दिली जात आहे. या सीजन मधून आपल्याला अनेक नवीन कलाकारांची ओळख झाली. अनेक कलाकारांविषयी आपल्याला माहिती मिळाली. यामध्ये अंकिता वालवाल कर , डीपी दादा , निकिता तांबोळी , अभिजीत सावंत , या कलाकारांना प्रेक्षकांकडून जास्त पसंती दिली जात आहे. यातीलच एक वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणजे कोल्हापूरचा पैलवान व मिस्टर वर्ल्ड ही ख्याती मिळवलेला कोल्हापूरचा बॉडी बिल्डर संग्राम चौगुले. हा प्रवास संग्राम चौगुले साठी काही सोपा नव्हता. या लेखात आपण संग्राम चौगुले यांची माहिती घेणार आहोत. यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत.

Age
संग्राम चौगुले यांचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापूर मध्ये 28 डिसेंबर 1979 रोजी झाला. संग्रामची वडील शिक्षक होते. संग्रामच्या घरची परिस्थिती जेमतेम होती. संग्रामच्या वडिलांच्या कमाई वरती सहा लोकांचा उदरनिर्वाह होत असे. संग्रामने प्राथमिक शिक्षण गावातील शाळेतून पूर्ण केले. व 12 वी नंतर संग्रामने पॉलिटेक्निक कॉलेज बहादुरगड येथून इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग चे शिक्षण पूर्ण केले. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर संग्राम चौगुले याने पुण्यातील मॉर्डन कॉलेज मध्ये बीएचे शिक्षण घेतले. शिक्षक कुटुंबात जन्म झाल्यामुळे संग्रामच्या शिक्षणावर जास्त भर दिला जात होता.
About The Sangram Chougule
Sangram Chougule Wife
पण संग्रामला कुस्ती व बॉडी बिल्डिंग मध्ये जास्त रस होता. संग्राम चौगुले यांनी हौस म्हणून 2001 मध्ये बॉडी बिल्डिंग करण्यास सुरुवात केली. कॉलेजमध्ये शिकत असताना तो पुण्यातील नावाच्या एका मुलीच्या प्रेमात पडला आणि नंतर लग्न झाले स्नेहल ही फॅशन डिझायनर आहे. लग्नानंतर संग्राम चौगुले एका कंपनीत काम करू लागला. काम करून मिळणारा मोबदला हा घर चालवण्यासाठी व बॉडी बिल्डिंग करण्यासाठी कमी पडत होता. यामुळे संग्राम चौगुले यांनी बॉडी बिल्डिंग सोडण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट जेव्हा त्याच्या जवळच्या मित्रांना समजली त्यावेळी त्या मित्रांनी त्याला खूप सपोर्ट केला. संग्रामच्या मित्रांनी अनेक दिवसांच्या प्रशिक्षणाचा खर्च उचलला. याच मित्रांमुळे संग्राम चौगुले बॉडी बिल्डिंग सुरू ठेवू शकला.या गोष्टीत रस असल्यामुळे संग्राम चौगुले मन लावून मेहनत घेऊ लागला व या गोष्टीमध्ये उतरला. याच कष्टाचा मोबदला म्हणून संग्राम चौगुले याला 2010 मध्ये मिस्टर इंडिया फिट ही पदवी मिळवली. ही पदवी मिळाल्यानंतर संग्राम चौगुले यांनी जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याचा निर्णय घेतला. व त्यासाठी तयारी चालू केली. या निर्णयानंतर संग्राम चौगुले यांनी अतोनात कष्ट केले. 2011 मध्ये संग्राम चौगुले यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर मिस्टर एशिया मध्ये तिसरा क्रमांक पटकावला. लगेचच 2012 मध्ये संग्राम चौगुले याने चीनमध्ये मिस्टर युनिव्हर्स चा मान मिळवला. इथपर्यंतचा प्रवास संग्राम चौगुले याने भरपूर कष्ट व मेहनत केली. व मिस्टर युनिव्हर्स हा नावलौकिक मिळवला.
Sangram Chougule Height
संग्राम चौगुले यांची उंची 5’8” inch इतकी आहे.
Sangram Chougule Biography in Marathi-
2013 साली एका स्पर्धेत स्टेज शोदरम्यान संग्राम चौगुले पोज देत होता त्यावेळी अचानक पायाला फ्रॅक्चर झाले . या फ्रॅक्चर नंतर संग्राम ला पूर्णपणे बेड रेस्ट घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. यावेळी संग्राम चौगुले याची आर्थिक तयारी नव्हती. या काळात संग्राम चौगुले यांनी खूप चढ-उतार पाहिले. पण संग्रामने आपली जिद्द सोडली नाही. संग्रामने आपल्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले व याच काळात त्याने फिनिक्स नावाने एकूण आठ जीव उभारले. यानंतर संग्राम आर्थिक दृष्ट्या स्टेबल झाला होता. या सगळ्यातून सावरल्यानंतर संग्रामने पुन्हा एकदा आपल्या शरीरावर काम करण्यास सुरुवात केली. यावेळीही त्याने शून्यातून सुरुवात केली व भरपूर मेहनत केली. व पुन्हा एकदा संग्राम चौगुले याने मिस्टर वर्ल्ड हा किताब मिळवला. पुन्हा एकदा संग्राम चौगुले याने आकाशाला साद घातली होती. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. 2015 साली संग्राम चौगुले यांचा कार अपघात झाला. या अपघातात संग्राम चौगुले यांच्या छाती आणि खांद्याला मार लागला. या अपघातात संग्रामच्या शरीराचे भरपूर नुकसान झाले. यानंतरही संग्रामने हार मानली नाही. त्याने पुन्हा स्वतःला तयार केले.
संग्राम चौगुले यांनी बॉडी बिल्डिंग सोबतच अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केले व याच बरोबर मोडेलिंग ही केले. 2014 मध्ये धतिंग धिंगाणा या मराठी चित्रपटां मधून संग्राम चौगुले याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. व प्रेम साथी कमिंग सून यामध्ये अभिनय केला. याचबरोबर दंडम, आलाय माझ्या राशीला व द मॅग्नेटिक फायर्स अशा चित्रपटात काम केले.
in Bigg Boss
संग्राम चौगुले याला बिग बॉस सीजन 5 या कार्यक्रमात वाइल्ड एंट्री मिळाली. संग्राम चौगुले याला प्रेक्षकां कडून भरपूर प्रेम व पाठिंबा मिळत आहे. बिग बॉस मराठी या शो मध्ये संग्राम चौगुले यांनी अनेक दिग्गज कलाकारां सोबत काम केले. या शोमध्ये त्यांचा परफॉर्मन्स एकदम चांगला होता. अंकिता वालवलकर , धनंजय पवार , सुरज अशा नवीन कलाकारां सोबत संग्राम चौगुले यांनी काम केले आहे. व या कलाकारां सोबत संग्राम चौगुले यांची ही ओळख महाराष्ट्राला नव्याने झालेली आहे. या शोमुळे संग्राम चौगुले यांना मराठी मनोरंजन क्षेत्रात अनेक करिअरच्या संधी उपलब्ध होणार आहेत. व संग्राम चौगुले हे पुढे चित्रपटातही दिसू शकतील हे नाकारता येत नाही. बिग बॉस मराठी हा संग्राम चौगुले यांच्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येणार आहे.
संग्राम चौगुले यांचा जीवन प्रवास आजच्या पिढीसाठी एक प्रेरणादायी प्रवास आहे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपले आयुष्य उद्ध्वस्त करणारे अनेक तरुण आपल्याला या पिढीत पाहायला मिळतात. पण आपल्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम्स येऊ नये त्या अडचणींना दूर सारत शून्यातून आपले आयुष्य पुन्हा घडवण्या ची तयारी असेल तर कोणतीच समस्या आपल्याला पुढे जाण्यापासून आढळत नाही हे संग्राम चौगुले यांच्या कथेतून आपल्याला पाहायला मिळते.
Sangram chougule protein brand
Sangram Chougule Instagram id
हेही वाचा – Dhananjay Powar DP Dada यांचा संपूर्ण जीवन प्रवास पहा येथे.