निशाताई सोनावणे यांचा प्रवास / Nishatai Sonavne.

कॉम्प्युटर रिपेअरिंग क्षेत्रात हातखंड असणाऱ्या निशाताई सोनवणे

निशाताई सोनावणे

शिक्षण बारावी वय 40 वर्षे त्यांना दोन मुलगे असून पती खाजगी कंपनीत हार्डवेअर सॉफ्टवेअरचे काम करतात त्यांचे माहेर धुळे येथील असून लग्नानंतर त्या ठाण्यात आल्या.

त्यांचे पती नोकरीच्या ठिकाणी हार्डवेअर सॉफ्टवेअरचे काम पाहत होते आताही पाहत असतात. त्याप्रमाणे ते काही पेंडिंग कामे करण्यासाठी कम्प्युटरचा कॅबिनेट बॉक्स घरी घेऊन येत असत होते. घरी ते दुरुस्त करत असताना निशाताई त्यांचे काम पाहत होत्या संबंधित प्रश्न विचारत असतात त्यांची जिज्ञासा श्री शेखर सोनवणे यांना लक्षात आली आणि त्यांनी निशा ताईंना कॉम्प्युटर संबंधीची माहिती द्यायला समजून सांगायला सुरुवात केली. हळूहळू निशाताईंना कामाची आवड लागत गेली त्यांना कामात रस वाटू लागल्याने त्यातल्या अडचणी समजून घेता येऊ लागल्या त्यावरचे उपाय श्री सोनवणे यांच्या सल्ल्याने कळायला लागले. काही महिन्याच्या सरावाने त्यांना बऱ्याच गोष्टींचा अंदाज आला. त्यांनी त्यातली माहिती द्यायला सुरुवात केली.

निशाताई सोनावणे / Nishatai Sonavne.

श्री. सोनावणे यांनी निशाताईंचा इंटरेस्ट ओळखून त्यांना कॉम्प्युटर दुरुस्ती प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. आणि ते सगळी माहिती त्यांना देऊ लागले . त्याप्रमाणे निशाताई सगळे माहिती येऊ लागल्या आणि त्याप्रमाणे शिकवू लागल्या .त्यानुसार त्यांचे कोराखादी केंद्र, या शासकीय प्रशिक्षण संस्थेत कॉम्प्युटर दुरुस्तीचे शिक्षण घेण्यासाठी ऍडमिशन करून घेतले. इतनीषाताई ना अनेक गोष्टी समजल्या. विषयांच्या आधी खोलात जाता आले. लॅपटॉप रिपेरिंग, क्लिप लेवल वर्क समजले. रॅम रिपेरिंग चा पुरेसा अंदाज आला. त्याची नवनवीन माहिती त्यांना मिळू लागली. कोणता प्रॉब्लेम कसा सोडवू शकतो याची त्यांना कल्पना येऊ लागली. प्रत्येक प्रॉब्लेम च्या व्यवस्थित हाताळू लागल्या. कम्प्युटर रिपेरिंग करण्याची पद्धत त्यांना व्यवस्थित समजू लागली. या पद्धतीने त्या प्रयत्न करू लागल्या आणि व्यवस्थित पद्धतीने प्रशिक्षण घेऊन त्या तेथून प्रशिक्षणाचे रीतसर प्रमाणपत्र घेऊन त्या बाहेर पडल्या आणि त्यांना आता या कामाचा पुरेसा आत्मविश्वास आला होता. घरी सराव चालू होताच पण त्यामुळे त्यांच्या कामावर छान हात बसला होता. वेगवेगळे प्रॉब्लेम आणि त्यावरचे सोल्युशन याचा अंदाज बांधता येऊ लागला होता. रिपेरिंग बदलते त्यांना काहीच माहिती नसताना त्यांनी त्यात लक्ष देऊन त्याची माहिती घेऊन व्यवस्थित रित्याच्या आपले काम पूर्ण करू लागल्या. त्यामुळे त्यांना त्यात आणखी रस वाटू लागला आणि त्या आपले काम चोख करू लागल्या. त्यामुळे त्यांना रिपेरिंग ची भरपूर कामे येऊ लागली.

कॉम्प्युटर दुरुस्ती, लॅपटॉप दुरुस्ती, सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन, मदरबोर्ड रिपेरिंग, रॅम रिपेरिंग ची कामे करतात. वरील कामे करण्याकरता मार्केटमध्ये अनेक लोक आहेत मात्र मदरबोर्ड रिपेरिंगला सहसा कोणी हात घालत नाही त्यासाठी थेट कंपनीलाच मदरबोर्ड पाठवले जातात. कारण ते काम अतिशय टेक्निकली अँड बारीक असते. त्यामुळे त्याला व्यवस्थित रित्या हाताने खूप गरजेचे असते. त्यामुळे अनेक लोक हे निशाताईंकडे रिपेरिंग ची कामे घेऊन येऊ लागले.अगदी कलाकुसरीच्या कामासर्गाच्या कामात जीव ओतावा लागतो. कलाकुसरीच्या कामाला पट्टीचा कारागीरच लागतो तर निशाताई मदरबोर्ड च्या संबंधाने अशाच पट्टीच्या कारागीर झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना भरपूर कामे येऊ लागली . खूप कठीण काम आहे ते अगदी सहजपणे चालू लागल्या . त्यामुळे त्यांना त्यातील प्रत्येक गोष्ट बारकाईने कळू लागली .बारीक-सारी आयडेंटिफाय करून त्यांचे उपाय शोधण्याकडे त्यांचा कल असतो. त्यात आतापर्यंत झालेल्या सरावाने त्यांना यशही मिळत होते. त्या कामातील बारीक सारे गोष्टीही त्यांना कळू लागल्या होत्या. तुमच्या पद्धतीने काम करायचे कसे करायचे या सर्व गोष्टी त्यांना समजू लागला. टेक्निकली प्रॉब्लेम त्या व्यवस्थित हाताळू लागल्या.

निशाताई सोनावणे.

ग्रामीण भागातून येऊन अन केवळ बारावीपर्यंत शिक्षण असं नाही या क्षेत्रात गेल्या काही वर्षात त्यांनी उत्तम जम बसवला आहे मोठमोठ्या इंजिनीयरला पण जमणार नाही अशी कामे ते त्या करत होत्या. यावर कदाचित कुणाचा विश्वास बसणार नाही पण हे खरोखर आहे मोठ मोठ्या कंपनीतील प्रशिक्षण इंजिनिअर जेव्हा एखादी मशीन खूप डोके फोडून करूनही रिपेरी होत नाही तेव्हा ते निशा ताईकडे घेऊन जातात आमच्या अडचणीवर तोडगा काढत त्यांना मशीन दुरुस्त करून देतात. कम्प्युटर दुरुस्त करताना कोणते प्रॉब्लेम सोडवू शकतो याची त्यांना पुरेपूर माहिती मिळू लागली. आणि त्या पद्धतीने त्या काम करू लागल्या.

सध्या त्यांना ठाणे, मुलुंड, एलोरा येथून बरेच क्लाइंट मिळतात त्याचबरोबर मुंबईतूनही लॅपटॉप दुरुस्तीसाठी त्यांच्याकडे येतात. गॅरेंटेड कामामुळे त्यांचे ग्राहक इतरांना त्यांच्या कामाबाबत माहिती देत असतात त्यामुळे नवीन लोकांनाही त्यांना माहितीमुळे त्यांना अनेक ग्राहक मिळतात. त्यांनी केलेल्या कामाची त्यांना चांगली पोचपावती मिळू लागली. आणि म्हणून त्यांच्याकडे भरपूर गिऱ्हाईक येऊ लागले. प्रत्येक जण आपल्या कंप्यूटर लॅपटॉप ची दुरुस्ती करण्यासाठी त्यांच्याकडे येऊन आपले प्रॉब्लेम सोडून होऊ लागले. प्रत्येक गिऱ्हाईक त्यांना चांगला रिस्पॉन्स देऊ लागले. आणि त्यांना भरपूर काम करण्याची इच्छा होऊ लागली.

त्यांचे पती श्री. सोनावणे यांचीही त्यांना विशेष मदत होते तसेच मुलगा वरूनही आता आईकडून बरेच काम शिकला आहे या कामातून त्या उत्तम कमाई करत आहेत. त्या आपल्या मोहोळ प्रगती करू लागल्या. त्या खूप मेहनतीने आपले काम व्यवस्थितपणे पार पाडू लागल्या. त्यांनी हळूहळू आपल्या आयुष्यात प्रगती करण्याचा मार्ग स्वीकारला. आणि

चार वर्षांपूर्वी त्यांनी एक्टिवा बाईक स्वतःच्या कमाईतून घेतली तेव्हा त्यांना विशेष आनंद झाला होता शेवटी स्वतःच्या कष्टाने विकत घेतलेल्या कोणत्याही वस्तूचे विशेष मूल असते. या व्यवसायाने त्यांना आर्थिक बाबतीत बऱ्याच पैकी उन्नती केली आहे असे त्या सांगतात. निशाताईंनी दीड वर्षापूर्वी नाशिकला फ्लॅट घेतला आहे त्या फ्लॅटचे ठरलेले हप्ते या व्यवसायातून मिळवलेल्या उत्पन्नातूनच भरतात या कामाने त्यांना खरंच आत्मभान दिले आहे.

एका गावातील केवळ बारावी शिकलेली महिला शहरात येऊन स्वतःच्या बळावर कुटुंबियांच्या मदतीने एका अतिशय टेक्निकली व्यवसायात प्रगती करू शकली याचे निशाताई या जिवंत उदाहरण आहे त्यांच्याकडून निश्चितच अनेक गोष्टी शिकण्यासारखे आहेत. शिकण्यासारख्या म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती नसताना त्या गोष्टीबद्दल माहिती करून घेऊन त्यात करिअर बनवणे ही खूप मोलाची गोष्ट आहे. त्या गोष्टीबद्दल आपल्याला काहीतरी करण्याची इच्छा आपल्या मनात इच्छा असणे गरजेचे आहे.एका छोट्याशा गावातून आलेली मुलगी आपल्या स्वतःच्या बळावर प्रगती करू इच्छिते याहून कोणती चांगली बाब असू शकते.

हेही वाचा – महाराष्ट्राचे उद्योजक अनिल मेहता / अजब पुस्तकालय.