बिग बॉस फेम सुरज चव्हाण / suraj chavan Biography Marathi.

बिग बॉस फेम सुरज चव्हाण / suraj chavan Biography Marathi. –

Social Media Influencer Suraj Chavan .

आजच्या काळात सोशल मीडिया हा सुद्धा एक करिअर बनवण्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म तयार झाला आहे. या सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्मवरून अनेक लहान-मोठे युवक युवती यांपासून ते लहान मुले व वृद्ध वयोगट असे प्रत्येक वयातील इन्फ्ल्यूंसर फेमस होत आहेत. एखाद्या व्हिडिओमुळे एखादा छोटा कलाकार रातोरात फेमस होत चालला आहे. तसेच हे एक पैसे कमावण्याचे साधन देखील झाले आहे. या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून अत्यंत गरीब परिस्थितीतून वरती आलेला व आता एक फेमस यूट्यूब वर व इंस्टाग्राम इन्फ्ल्यूंसर म्हणून चर्चेत असलेला मराठी बिग बॉस हा कार्यक्रम गाजवणारा सुरज चव्हाण याचा संपूर्ण प्रवास आपण या लेखात पाहणार आहोत.

Suraj Chavan Age

Suraj Chavan Birthplace

बिग बॉस फेम सुरज चव्हाण / suraj chavan Biography Marathi.

सुरज चव्हाण हा अमरावती जिल्हा येथील आहे. सुरज अत्यंत गरीब घरातील मुलगा आहे. सुरज ला एकूण सात बहिणी आहेत. सुरज चे वय 25 वर्षे आहे. सुरज चार ते पाच वर्षाचा असताना सुरत चे वडील लहान वयातच वारले. सुरतचे वडील वारल्यानंतर सुरज ची आई वेड्यासारखे वागू लागली. सुरज च्या आईला सुरजचे वडील वारल्या चा धक्का सहन झाला नाही. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले. सुरजला आई-वडील नसल्यामुळे सुरतचे व त्याच्या सात बहिणींचे पालनपोषण हे सुरतच्या आत्याने केले. सुरज ने लहान वयातच खूप हलाखीचे दिवस पाहिले आहेत. सुरज व त्याच्या बहिणी मिळेल ते काम करू लागल्या. सुरज ने लहान वयात मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली. सुरज गवंडी काम करू लागला, तसेच तो अनेक वेगवेगळी कामेही करू लागला. अशा परिस्थितीत सुरज लहानाचा मोठा झाला.

Suraj Chavan Dialogue

 सुरज च्या गरीब परिस्थितीमध्ये सुरज कधी शाळेत जाऊ शकला नाही. तू लहानपणापासूनच काम करत होता. अशातच सुरजला टिक टोक वरती व्हिडिओ बनवण्याचा छंद लागला. सुरज अनेक वेगवेगळे कॉमेडी व्हिडिओ बनवत असत. सुरज त्याच्या घरातील बहिणी व भावांच्या मदतीने कॉमेडी व्हिडिओ बनवायला लागला. कॉमेडी व्हिडिओ मुळे सुरज व्हायरल होऊ लागला. त्याची बोलीभाषा लोकांना आवडू लागली. गोलीगत , बुक्कीत टेंगुळ , असे अनेक डायलॉग सुरज चे फेमस होऊ लागले. व सुरज चे व्हिडिओ ही फेमस होऊ लागले. सुरज आठवडाभर मिळेल ते काम करत असे. व शनिवार रविवारी भावा बहिणीच्या मदतीने अनेक वेगवेगळे व्हिडिओज शूट करत असे. टिक टोक या प्लॅटफॉर्मवर सुरज भरपूर प्रमाणात व्हायरल होऊ लागला. पण थोड्याच दिवसात भारतातला बॅन केले गेले. टिक टोक हे ॲप बंद झाल्यानंतर सुरज ला इंस्टाग्राम बद्दल माहिती मिळाली. यानंतर सुरजने लगेचच इंस्टाग्राम वर आपले व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. टिक टोक वर फेमस असल्यामुळे इंस्टाग्राम वर फेमस होण्यास सुरज ला जास्त कालावधी लागला नाही. तो कमी कालावधीत फेमस होऊ लागला. मराठी पण वेगळ्या बोली भाषेतून तो लोकांना आपलेसे करू लागला. सुरज चे कॉमेडी व्हिडिओ लहान मुलांना, तरुण पिढीला, तसेच वृद्ध लोकांना मोठ्या प्रमाणात आवडू लागले.

 टिकतोक या ऐप नंतर इंस्टाग्राम या ॲपवर फेमस झाल्यानंतर सुरज ने यूट्यूब या ॲपवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. या ॲपवर ही तो फेमस होऊ लागला. लोक त्याच्या व्हिडिओला पसंती देऊ लागले. यातूनच सुरज कडे पैसे कमावण्याचा मार्ग तयार झाला. यूट्यूब व इंस्टाग्राम वरून त्याला पैसे मिळू लागले. सोबतच त्याला फेम ही मिळू लागली.

 सुरज चव्हाण चे शिक्षण पूर्ण झालेले नाही. तो फक्त इयत्ता आठवी पर्यंत शिकलेला आहे. तसेच त्याला व्यवहार ज्ञान बिलकुल नाही. यूट्यूब वर इंस्टाग्राम या ॲपवर फेमस झाल्यानंतर सुरजला अनेक वेगवेगळ्या ठिकाणी उद्घाटने , प्रचार, इव्हेंट्स , अशा ठिकाणी बोलावले जात असे. पण त्यावेळी अनेक लोकांनी सुरजच्या साध्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेतला. त्याला कमी पैशात बोलावले जात असे. सुरज ला व्यवहार ज्ञानाचे काही कळत नव्हते. या गोष्टीचा लोक फायदा घेत असत. तसेच त्याला सांगितलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम दिली जात असे. अशाप्रकारे लोक त्याचा फायदा घ्यायचे.

Suraj Chavan Big Boss Marathi

 सुरज चव्हाण ला यूट्यूब आणि इंस्टाग्राम वर फेम मिळाल्यानंतर त्याच्या घरची परिस्थिती थोडीफार सुधारली. यानंतर सुरज रेगुलर व्हिडिओ बनवू लागला. सुरजचे इंस्टाग्राम व यूट्यूब वर लाखोंमध्ये फॉलोवर्स आहेत. चा व्हिडिओ टाकू लागला. व दररोज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना हसवण्याचे काम करू लागला. यातूनच सुरज ची फेम आणि त्याचे वाढते फॉलोवर्स तसेच त्याची एक्टिंग व काम पाहून सुरज ला बिग बॉस मराठी या मोठ्या शोमध्ये बोलवण्यात आले. सुरुवातीला सुरज या शोसाठी तयार नव्हता. पण त्याच्या बहिण व घरातील लोकांनी सांगितल्यानंतर सुरज या शोमध्ये येण्यासाठी तयार झाला. या शोमध्ये सुरज चांगल्या पद्धतीने खेळत आहे. यावर्षीचा मराठी बिग बॉस हा शो रितेश देशमुख हे होस्ट करत आहेत. रितेश देशमुख हेही सुरजला खेळण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.

Suraj Chavan Movie

अत्यंत गरीब व हलाखीच्या परिस्थितीतून सुरज ने स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. तो बिग बॉस मराठी यासारख्या मोठ्या शो मध्ये खेळत आहे. ही त्याच्यासाठी व त्याच्या घरच्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. बिग बॉस मराठी या शोमुळे सुरजला अनेक वेगवेगळे मार्ग खुले होणार आहेत. बिग बॉस मराठी या शोमुळे सुरज ला एक नवीन ओळख मिळाली मिळणार आहे. पुढे जाऊन सुरज चव्हाण हा अनेक वेगवेगळ्या चित्रपटात देखील दिसण्याची शक्यता आहे.

Suraj Chavan Instagram Id

official_suraj_chavan1151

Suraj Chavan In Big Boss Marathi

हेही वाचा – ‘जोशी वडेवाले’ यांचा जीवनप्रवास / Joshi wadewale Marathi Story .

हेही वाचा – नवनाथ दरेकर यांचा जीवनप्रवास / Owner of NMD Pvt . Ltd Success Story.

हेही वाचा – Akash thosar biography in marathi / आकाश ठोसर यांचा जीवनप्रवास .