हॉटेल सातबारा चा न ऐकलेला प्रवास./ सोनाली सावंत व राहुल सावंत बायोग्राफी.
हॉटेल सातबारा हे नाव खवय्यांसाठी नवीन नाहीय. आज आपण हॉटेल सातबारा ची प्रेरणादायी कहाणी घेऊन आलो आहोत.
सोनाली सावंत व राहुल सावंत
हॉटेल सातबारा हे सोनाली सावंत व राहुल सावंत यांनी चालू केलेले आहे. सोनाली सावंत या मूळच्या सोलापूरच्या आहेत. सोनाली सावंत च्या लग्नानंतर कोल्हापूर येथे आल्या. सोनाली सावंत या मिडल क्लास फॅमिली तून आहेत त्यांची घरची परिस्थिती बेताची होती. त्यांचे वडील आर्मीत होते. तीन बहिणी व दोन भाऊ अशी पाच भावंडे आहेत.
12 वी मध्ये असताना त्यांचे लग्न झाले सोनाली सावंत यांनी बारावीची परीक्षा ही लग्नानंतर दिली. राहुल सावंत हे लग्नाच्या वेळी रियल इस्टेटचा बिझनेस करायचा आहे.
HOTTEL BUSINESS
सात ते आठ वर्षे त्यांचा संसार सुरळीत चालू होता. त्यानंतर सोनाली सावंत व राहुल सावंत यांनी काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यात कष्ट करण्याची जिद्द होती. म्हणून त्यांनी हॉटेल व्यवसायात उतरण्याची हिंमत केली. त्यानंतर कोल्हापुरातील राजारामपुरी या भागात चहाचा व्यवसाय चालू केला. त्यावेळी त्यांच्याकडे 10 प्रकारचे चहा मिळायचे. चहा साठी लागणारे मसाले सोनाली सावंत या स्वतः बनवायच्या. या व्यवसायात 10 ते 12 हजार पर्यंत डेली इन्कम होत होती. त्यावेळी त्यांच्या गाडीचा नंबर हा सातबारा हा होता. म्हणून त्यांनी हॉटेलचे नाव आहे हॉटेल सातबारा असे ठेवले. चहाचा व्यवसाय हा दुपारी 4 ते संध्याकाळी साडेआठ पर्यंत चालू असायचा. पण सोनाली सावंत व राहुल सावंत यांची 12:00 वाजेपर्यंत काम करण्याची तयारी असायची. म्हणून त्यांनी याच जागेत काहीतरी अजून चालू करण्याचा विचार केला.
कोल्हापुरात तांबडा व पांढरा रस्सा फेमस आहे. हे खाण्यासाठी लांबून खावे कोल्हापुरात येतात. सोनाली सावंत वर राहुल सावंत यांनी पदार्थ बनवण्याचे ठरवले. त्यांनी सोलापूर मधील काळ्या मसाल्यातील काळं मटण बनवण्याचा विचार केला. त्यांनी सुरुवातीला हा पदार्थ घरात बनवला. घरच्यांना तो पदार्थ खूप आवडला त्याने चहाच्या व्यवसायाच्या जागेतच हे काळं मटण चालू केले. हा पदार्थ लोकांना प्रचंड आवडू लागला. व खवय्यांचे गर्दी होऊ लागली. ती जागा या व्यवसायासाठी कमी पडू लागली. त्यानंतर त्यांनी 5000 स्क्वेअर फुट जागा घेतली. व तेथे वाडा पद्धतीचे सेटअप केले. त्यानंतर सातबारा हे खूपच फेमस होऊ लागले. व ती 5000 स्क्वेअर फुट जागा कमी पडू लागली. ग्राहक यायचे व दोन-दोन तास वेटिंग ला असायचे. हॉटेल सातबारा मधील जेवण लोकांना प्रचंड आवडायचे पण त्या जेवणासाठी लोकांना दोन-दोन तास वेटिंग करावे लागत होते. ही खंत खवय्ये सोनाली सावंत व राहुल सावंत यांना सांगायचे. सोनाली सावंत व राहुल सावंत यांच्यासमोर परत तोच प्रश्न उभा राहिला.
अचानक काही तांत्रिक अडचणींमुळे हॉटेल सातबारा हे बंद झाले. त्यावेळी परत हॉटेल चालू करण्यासाठी सोनाली सावंत व राहुल सावंत यांच्याकडे पैसे नव्हते. पण त्यांच्याकडे जिद्द होती. त्याने उजगाव मुडशिंगी या भागात 20 गुंठे जागा पाहिल्या. ती जागा पूर्णपणे शेत जमीन होती. या जागेत हॉटेल चालेल याची गॅरंटी सोनाली सावंत व राहुल सावंत यांना नव्हते. त्यांनी निर्णय घेतला व त्या जागी हॉटेल सातबारा चालू केले.
ज्यावेळी हॉटेल सातबारा बंद पडले त्यावेळी हॉटेल सातबाराचे मालक एक्सपायर झाले अशी अफवा उठवली गेली. अशा परिस्थितीतही सोनाली सावंत व राहुल सावंत यांनी माघार घेतली नाही. त्यांनी नव्याने हॉटेल सातबाराची उभारणी करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर उजगाव मोरसिंग रोडवर हॉटेल सातबाराच्या उभारणीसाठी 36 दिवस सलग काम सुरू केले. त्यानंतर हॉटेलचे ओपनिंग करण्यात आले. ओपनिंग खूप छान झाले. हॉटेल सातबारा या हॉटेलच्या ओपनिंग साठी दीड ते 2000 लोकांचा प्रतिसाद होता. हीच खूप मोठी गोष्ट होती हॉटेल सातबारा साठी.
2nd Branch in satara
उजगाव मुडशिंगी या रोडवर हॉटेल हे कोल्हापुरातील खवय्यांना सेवा देऊ लागले. या हॉटेलमध्ये कोल्हापुरातच नाही तर अनेक भागातून लोक येऊ लागले. सातारा-पुणे या भागातून या हॉटेलला भरभरून प्रेम मिळू लागले. लांबून लोक यायचे , जेवायचे जेवणाचे भरपूर कौतुक करायचे. पण जाताना एक खंत सांगायचे की सातारा पुणे या भागातून आम्हाला सातबारा मध्ये जेवणासाठी यावे लागते. व ते लोक त्या भागातही हॉटेल 7/12 चालू करावे अशी मागणी करू लागले. त्यानंतर तीन महिन्यानंतर राहुल सावंत व सोनाली सावंत यांनी आपल्या हॉटेलची दुसरी शाखा चालू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हॉटेल सातबारा ची दुसरी शाखा सातारा येथे चालू केली. आज तीन वर्षात सोनाली सावंत व राहुल सावंत यांनी आपल्या हॉटेल 7/12 च्या 11 शाखा चालू केल्या आहेत. या 11 शाखा महाराष्ट्रातील अनेक भागात खवय्यांना उत्तम सेवा देत आहेत.
आजच्या परिस्थितीत रेस्टॉरंट आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतील. आजच्या पिढीला आपले कल्चर बघायला मिळणे हे अवघड आहे. शेणाने सारवलेले घर, गाईचा गोठा, कौलाचे घर, झुलवा चुलीवरील भाकरी, पाठावर मंठा या सगळ्या गोष्टी आत्ताच्या मुलांना माहीत नाहीत. या गोष्टी आत्ताच्या पिढीला पहायलाही मिळत नाहीत. सावंत व राहुल सावंत यांनी आपले जुने कल्चर जोपासावे आजच्या पिढीला आपल्या जुन्या परंपरेची माहिती व्हावी या उद्देशाने हॉटेल सातबारा आहे याच थीम चा उपयोग करून बनवले. हॉटेल मध्ये जुनी बैठक व्यवस्था आहे. तसेच तेथे चुलीवरील भाकरी मिळते. पाटा वरवंटा याचा उपयोग करून तेथे मसाले बनवले जातात. या पद्धती या गोष्टी खवय्यांना खूप आवडतात. लोकांनी याला खूप प्रतिसाद दिला त्यामुळे हे हॉटेल लोकांच्या पसंतीस उतरले आहे.
Monthly turnover
हॉटेल उभा करताना राहुल सावंत व सोनाली सावंत यांच्या खिशात पैसे नव्हते. त्यांना अनेक लोकांनी मागे ओढण्याचा प्रयत्न केला. त्यांचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केला अशा परिस्थितीत त्यांनी अनेक प्रसंगांना डावलून कष्ट करून स्वतःचे नाव मिळवले व एक वेगळी ओळख निर्माण केली. हॉटेल सातबारा हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात तसेच भारतातही झाले आहे आज हॉटेल सातबारा या हॉटेलच्या सगळ्या शाखांचा Monthly टर्न ओव्हर तीन ते साडे तीन कोटी एवढा आहे. या हॉटेलमध्ये शेतकरी व जवान यांना 25% डिस्काउंट ही आहे. यातून सोनाली सावंत व राहुल सावंत यांनी आपल्या जवान व शेतकरी बांधवांना बाबत आदर व्यक्त केला आहे.
Instagram link- hottel_712
हे हि वाचा -प्रतीक्षा थोरात बायोग्राफी