निरुपमा भावे.
निरुपमा भावे यांचे बालपण खूप छान गेले. त्या अभ्यासामध्ये ही खूप हुशार होत्या त्यामुळे त्यांना इंजीनियरिंग मध्ये मध्ये करिअर करायचे. पण घरून परमिशन नसल्यामुळे त्यांनी एम एस सी मधून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. एम एस सी मधून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्या त्यांची पीएचडी पूर्ण करून गणित विषयाची युनिव्हर्सिटी मध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. आणि त्यानंतर त्या हेड म्हणून रिटायर झाल्या.
निरुपमा भावे यांच्या 52 व्या वर्षी एक त्यांचे मित्र त्यांच्या घरी आले. त्यांच्या मित्राचे वय 62 होते. त्यांचे मित्र त्यांच्या घरी आले होते. व ते रोज सायकलने औंध पासून ते वाडिया कॉलेज पर्यंत म्हणजेच सात ते आठ किलोमीटर ते सायकल वरून ये जा करत असेल. आणि ते एके दिवशी निरुपमा भावे यांच्या घरी गप्पा मारण्यासाठी आले होते. त्यांनी त्यांच्या घरी आल्यानंतर जे सायकलचे वर्णन केले आणि कौतुक केले ते ऐकून निरुपमा भावे या खूप प्रेरित झाल्या. आणि त्यांना सायकलिंग बद्दल आवड निर्माण झाली. आणि त्यांनी त्यांच्या पुतणीची सायकल चालवायला चालू केली आणि दोन-तीन किलोमीटर सायकलिंग केल्यानंतर त्यांना स्वतःवर आत्मविश्वास वाटू लागला. आणि त्यानंतर त्यांनी सायकलिंग ला सुरुवात केली.
पुणे सायकल प्रतिष्ठान.
एके दिवशी त्यांनी वर्तमानपत्रांमध्ये असे वाचले की पुणे सायकल प्रतिष्ठान नावाची एक अशी इन्स्टिट्यूट आहे तिथे लोक महिन्याच्या पहिल्या रविवारी पुण्याच्या भागांमध्ये जाऊन लोकांना सायकलचे महत्त्व सांगत घोषणा देत जातात. हे ऐकून निरुपमा भावे सुद्धा त्यांच्यासोबत जाऊ लागल्या. आणि त्यावेळी ते लोक खूप लांब लांब चा प्रवास ते सायकल वरून करत असेल. निरुपमा भावे यांनी असे ऐकले की यावर्षीचे वाघा बॉर्डर ते आग्रा या ठिकाणी जाणार आहे. हे ऐकून त्या सुद्धा सायकलींचे प्रॅक्टिस करू लागल्या आणि त्या देखील सायकलिंग करून खूप लांब लांब चा प्रवास त्या सायकलवरून करू लागल्या. त्यानंतर त्यांनी वाघा बॉर्डर ते आग्रा, दिल्ली ते कोलकत्ता, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, मनाली या सर्व ठिकाणी त्यांनी सायकलवरून प्रवास केला . तेव्हा त्या 59 वर्षाच्या होत्या. आणि त्यांच्यासोबत सतरा अठरा वर्षाची तरुण मुले देखील त्यांच्यासोबत सायकलिंग साठी ग्रुप मध्ये होते पण त्या मुलांसोबत सायकलिंग करायच्या पण त्या खाली मान घालून मस्त सायकल चालवायची थांबायचं नाही आणि टेम्पो वगैरे सगळं म्हणजे सपोर्ट वेहिकल सगळं होतं पण त्या जेव्हा तिथे पोहोचायच्या करून तेव्हा ती सर्व तरुण मुले पोचून दीड एक तास व्हायचा पण ती सर्व मुले निरुपमा भावे यांची वाट पाहत तिथेच थांबलेली असायची त्या मुलांना देखील त्यांचे कौतुक वाटायचे की एवढे वय झाले तरी त्या अजूनही एवढ्या जिद्दीने सायकल चालवतात. ते पाहूनही त्यांना खूप त्यांचे कौतुक वाटायचे. एकदा एका ठिकाणाहून येत असताना एका ठिकाणी त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला अगदी थोड्या प्रमाणात फॅक्टर झाला होता. त्यानंतर त्यांना पाया प्लास्टर घालण्यात आले. त्यामुळे त्यांचा सायकलचा प्रवास तिथे थांबला. पण प्लास्टर असल्यामुळे त्यांनी गंगासागर पासून गोमुख पर्यंत रोज 20 किलोमीटर गंगेच्या काठाने त्यांनी चालत जाण्याचे ठरवले. पण त्यांचा पाय प्लास्टर मध्ये असल्यामुळे त्यांना प्रश्न पडला. पण त्यांची मैत्रीण त्या त्यांच्यासोबत असल्यामुळे त्या म्हणाल्या की तू कशी असलीस तरी आमच्या बरोबर आहे तुझी आम्ही काळजी घेऊ असे बोलून त्यांच्या मैत्रिणीने त्यांना त्यांच्यासोबत घेऊन गेल्या प्लास्टर मध्ये पाय असताना सुद्धा त्यांनी एअरपोर्टवर गेले असताना त्यांना खुर्चीतून उचलून विमानतळावरून त्यांनी प्रवास केला आणि त्यांनी गंगासागर चा प्रवास केला. तिथे गेल्यावर त्या वेळेला नुसार गर्भवती स्त्रियांचे कॅम्प घेतो होत्या . गर्भवती स्त्रियांना तपासायच्या हिमोग्लोबिन चे महत्व समजावून सांगायच्या , काय खावे काय खाऊ नये या सर्व गोष्टी. त्यांचा कॅम्पमध्ये सांगितल्या जायच्या. आणि निरुपमा भाव्यांचा पाय फ्रॅक्चर असल्यामुळे त्या काय चालू शकत नव्हता पण त्या बस मध्ये बसून असायच्या आणि त्यांच्या कॅम्पमधून सर्व गोष्टी निरीक्षण करायच्या. त्यानंतर त्यांचे प्लास्टर काढल्यानंतर त्यांचा पाय पूर्णपणे बरा झाला आणि त्यानंतर त्यांनी लगेचच पाच किलोमीटर चालायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कॅम्प सोबत चालायला सुरुवात केली. उरलेले 50 दिवस त्यांनी त्यांसोबत चालू लागल्या. गंगासागर गोमुख मध्ये त्या रोज 20 किलोमीटर चालायच्या.
त्यानंतर त्यांना एक चान्स मिळाला त्यांच्या कॉलेजमधील एक विद्यार्थिनी तिचा नवरा गिर्यारोहक सेक्रेटरी असल्यामुळे त्यांचा ग्रुप एव्हरेस्टला जाणार होता त्यांची प्रॅक्टिस चालू होती. तर त्यासाठी उषा पागे एकटीच होती ती बाकी सगळे पुरुष होते त्यांना अजून एक महिला हवी होती . त्या विद्यार्थिनींनी निरुपमा भावे त्यांना विचारले .त्यांच्या विद्यार्थिनीचा नवरा गिर्यारोहक सेक्रेटरी असल्यामुळे त्यांनी तिला विचारले आणि ती मुलगी म्हणाली आमच्या मॅडमना सांगा तसे करतील राफलिंग आणि रॉक लाइफिंग या गोष्टी सुद्धा त्यांनी गिर्यारोहकांना बेस्ट लक देण्यासाठी केल्या.
काही वर्षांनी त्यांना एकदम आजारपण आले त्यांच्या मेंदूला आणि त्यामुळे सूज आली आणि त्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या त्यामुळे त्यांना आपण काय करतोय या गोष्टीचे छान राहिले नाही. त्यानंतर त्यांच्या मिस्टरांनी त्यांना डॉक्टरांकडे नेले आणि त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले चार दिवस त्या अन काँशियन्स होत्या आणि मला रोज त्यानंतर त्यांना रोज 50 हजार रुपयाचे इंट्रा व्हीनस चे सात आठ तास चालणारे इंजेक्शन देण्यात येत होते हे इंजेक्शन पाच दिवस चालू होते आठवडाभराने नंतर त्या थोडा बऱ्या होऊ लागल्या आणि शुद्धी देऊ लागल्या. त्यांना थोडे बरे वाटायला लागल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले आणि त्यांनी परत व्यायाम, योग्य आहार, चालणे, फिरणे या सर्व गोष्टी त्याच प्रमाणात चालू ठेवल्या त्यामुळे त्यांचा आजार वर्षभर बरा होण्यास लागतो. त्यासाठी त्या पुण्यातच बऱ्या झाल्या.
पुणे ते कन्याकुमारी.
काही दिवसानंतर यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या मैत्रिणीने असं ठरवले की निरुपमा भावे यांच्यासोबत आपण पुणे ते कन्याकुमारी असा प्रवास करूया. थोडा विचार करून त्यांना जाण्यासाठी होकार दिला.
त्यानंतर त्यांनी थोड्या दिवसानंतर पुणे ते कन्याकुमारी असा सायकलने प्रवास केला. पण त्यांनी आपली सायकलिंग करण्याची आवड कायमस्वरूपी जोपासली. त्यानंतर त्यांनी परत सायकलिंग करण्यास सुरुवात केली. असे लक्षात येते की कितीही अडचणी आल्या तरी आपण आपली आवड जोपासली गेली पाहिजे. आवडीला वयाचे बंधन नसते. कोणत्याही वयात आपण आपली आवड जोपासू शकतो. पण त्या साठी योग्य मेहनत आणि जिद्द असायला हवी. हेच आपल्याला निरुपमा भावे यांनी शिकवले आहे.
हेही वाचा – असा सुरू झाला ZOMATO चा प्रवास.