Abhi Gaikwad – रॉयल उद्योग समूहाचे नाव आपल्यातील भरपूर लोकांनी ऐकले असेलच. आज आपण या उद्योग समूहाची सुरुवात व अभी गायकवाड यांचा युवक ते युवक ते यशस्वी उद्योजक हा प्रवास पाहणार आहोत.
Abhi Gaikwad Age
अभि गायकवाड हे 28 वर्षाचे आहेत. अभि गायकवाड यांना लहानपणापासूनच अभ्यासात जास्त रस नव्हता. त्यांनी 10 वी पर्यंतचे शिक्षण कसेतरी पूर्ण केले. त्यांनी कॉलेजनंतर बिझनेस करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पहिल्यांदा ज्यूस बार चालू केला. पण यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर त्यांनी आईस्क्रीम पार्लर चालू केले. यातही त्यांना यश मिळाले नाही. असे त्यांनी अनेक व्यवसाय सुरू केले पण कशातच त्यांना यश आले नाही. त्यांनी एमआयडीसी मध्ये काम करण्यास सुरुवात केली.
Abhi gaikwad’s business
अभि गायकवाड हे त्यांच्या मित्रासोबत दिवाळीची खरेदी करण्यासाठी गेले होते. एका कपड्याच्या दुकानात गेले. त्यांना त्यावेळी आपण सुद्धा कपड्याचे दुकान टाकावे अशी कल्पना सुचली. ही कल्पना त्यांनी घरात सांगितली. पण घरच्यांनी या गोष्टीला विरोध केला. कारण त्यांनी पहिलाच दोन ते तीन व्यवसायात लॉस मिळवला होता.
Abhi Gaikwad Royal Shop
ज्यावेळी अभि गायकवाड यांनी बिझनेस करायला सुरुवात केली त्यावेळी ते सतरा वर्षाचे होते. त्यावेळी त्यांना अनुभव नव्हता व बिझनेस करण्यासाठी सीरियसनेस नव्हता. ते बिजनेस मध्ये फारसे लक्ष देत नव्हते. या कारणामुळे त्यांना बिझनेस मध्ये लॉस मिळाले पण यावेळी ते या बिझनेस बाबत खूप सिरीयस होते. त्यांना मनापासून कपड्याच्या बिजनेस मध्ये उतरायचे होते. पण त्यांच्या घरचे त्यांना सपोर्ट करायला तयार नव्हते.
ROYAL the group of business
अभी गायकवाड यांना कपड्याचा बिजनेस करण्याची खूप इच्छा होते. ही गोष्ट त्यांनी त्यांच्या मामाला सांगितले. त्यांच्या मामांनी अभी गायकवाड यांना या व्यवसायासाठी पूर्ण सपोर्ट करण्याची तयारी दाखवली. व अभि गायकवाड यांच्या घरच्यांनाही कन्व्हेन्स केले. अभी गायकवाड यांच्याकडे ही शेवटची संधी होती. अभी गायकवाड यांना स्वतःला सिद्ध करायचे होते. त्यांना कपड्याचे दुकान टाकण्याची घरातून परवानगी मिळाली.
बिझनेस ची सुरुवात करताना अभी गायकवाड यांना खूप अडचणी आल्या. त्यांना दुकान चालू करण्यासाठी जागा भेटत नव्हती. त्यांनी खूप कष्ट केले आणि रॉयल उद्योग समूहाला सुरुवात केली. त्यांना या बिझनेस ची काहीच माहिती नव्हती. म्हणून त्यांनी माहिती घेण्यासाठी आपल्या मित्राकडे मदत मागितली. पण त्यांनी अभि गायकवाड यांना फसवले. त्यानंतर अभि गायकवाड हे स्वतः दुकानात काम करू लागले. स्वतः सगळ्या गोष्टी शिकू लागले. ते सकाळी आठला दुकानात जायचे व रात्री 11 पर्यंत काम करायचे. ते दुकानात दिवसभर कष्ट करायचे. अशा प्रकारे रॉयल उद्योग समूहाला सुरुवात झाली.
Abhi Gaikwad Wedding Photos
त्यानंतर अभी गायकवाड यांनी माघार घेतली नाही. त्यांनी खूप कष्ट केले एक सामान्य युवक ते यशस्वी उद्योजक झाले. त्यांच्या रॉयल उद्योग समूह या व्यवसायाच्या आतापर्यंत 70 पेक्षा जास्त शाखा आहेत. व त्या शाखा ही सक्सेसफुली आपला बिझनेस चालवत आहेत.
आज अभी गायकवाड यांच्यामुळे कितीतरी तरुण मुलांना रोजगार मिळाला आहे. कितीतरी लोकांचे संसार चालत आहेत. अभी गायकवाड हे तरुण मुला-मुलींना व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करतात व मदतही करतात. अभी गायकवाड यांच्याकडून तरुण पिढीला प्रोत्साहन घेण्याची गरज आहे.
हेही वाचा : – मेकओव्हर क्वीन प्रतिक्षा थोरात यांची सक्सेस स्टोरी पहा