Kirti Jadhav Biography Marathi / दर्जा उद्योग समूह संपूर्ण माहिती.

Kirti Jadhav Biography Marathi-

Kirti Jadhav Biography Marathi / दर्जा उद्योग समूह संपूर्ण माहिती.

आज अनेक तरुण तरुणी व्यवसायात उतरण्याचे धाडस करत आहेत. युवा पिढी व्यवसाय करण्यास पसंती देत आहेत. पण मराठी माणसे व्यवसायात मागे पडत आहेत. मराठी माणसाने व्यवसाय करणे काळाची गरज आहे. पण मराठी माणसाला व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात नाही. त्याला मागे ओढले जाते. खरतर हीच सत्य परीस्थिती आहे. यामुळेच मराठी माणूस व्यवसायात उतरण्याचे धाडस करत नाही. त्यातूनच जर एखादी मुलगी व्यवसाय करत असेल तर तिला घरातून आणि समाजाकडून प्रोत्साहन मिळत नाही. तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याच परंपरेला मोडीत काढत एका मुलीने कसा स्वत्ताचा दर्जा सेट केला हे आपण पाहणार आहोत.

एक मुलगी म्हंटल कि तिला घरातून व समाजातून अनेक बंधन येतात. तिला घातलेल्या कपड्यांपासून ते शिक्षण या पर्यंत अनेक गोष्टीवर आक्षेप घेतला जातो. मुलींना प्रत्तेक गोष्टीसाठी आडवले जाते. पण अनेक विरोध पत्करून स्वत्ताचा व्यवसाय चालू करणारी व तो व्यवसाय सेट करणारी मराठी मुलगी , मराठी उद्योजिका किर्ती जाधव यांचा जीवनप्रवास आपण पाहणार आहोत. कोणत्याही पाठिंब्याशिवाय शून्यातून उभा केलेला व्यवसाय दर्जा उद्योग समूह आणि बरेच काही……! याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

Kirti Jadhav Biography Marathi

Darja udyog samuh owner

कीर्ती जाधव शुभम जाल गायकवाड यांनी 2022 साली दर्जा उद्योग समूह आणि बरंच काही या उद्योगात सुरुवात केली. कीर्ती जाधव आणि शुभम गायकवाड हे दोघे एकाच ठिकाणी नोकरी करत होते. कीर्ती जाधव यांना सुरुवातीपासूनच स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. यातूनच कीर्ती जाधव शुभम गायकवाड यांचे विचार जुळून आले व त्यांनी एकत्र व्यवसाय चालू करण्याचा निर्णय घेतला.

Kirti jadhav information in marathi

कीर्ती जाधव यांना व्यवसाय करण्यासाठी घरातून पूर्णपणे विरोध होता. कीर्ती जाधव यांनी योग्य वेळी शिक्षण व नंतर लग्न करावे अशी त्यांच्या घरातील लोकांची इच्छा होते. त्यामुळे कीर्ती जाधव यांना घरातून पाठिंबा मिळाला नाही. पण त्यांनी तरीही मागे घेतले नाही व व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. यानंतर कीर्ती जाधव यांनी शुभम गायकवाड यांच्या सोबत मिळून व्यवसाय सुरू केला. पण कीर्ती जाधव यांच्या घरातील व समाजातील लोकांनी एक मुलगा बिझनेस पार्टनर म्हणून का? यावरही आक्षेप केला. कीर्ती जाधव यांना व्यवसाय चालू करण्यासाठी पैशांची गरज होती. पण घरच्यांचा सपोर्ट नसल्यामुळे कीर्ती जाधव यांनी स्वतः पैसा उभा करण्याचा प्रयत्न केला. कसेबसे त्याने थोडेफार पैसे जमवले. यानंतर कीर्ती सदाभाऊ शुभम गायकवाड यांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी अभ्यास चालू केला. अनेक वेगवेगळ्या व्यवसायाची काही माहिती घेतली. अनेक ठिकाणी सर्वे केले. शेवटी कीर्ती जाधव शुभम गायकवाड यांनी दर्जा चहा आणि बरेच काही हा चहाचा व्यवसाय चालू करण्याचा निर्णय घेतला.

दर्जा चहा आणि बरेच काही…..!

बाजारात अनेक ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारचे चहा पाहायला मिळतात. या क्षेत्रातही अनेक नामांकित ब्रँड आपण पाहत आहोत. या क्षेत्रातही भरपूर प्रमाणात स्पर्धा वाढलेली आहे. अनेक प्रकारचे आणि अनेक फ्लेवर्स चे चहा आपल्याला बाजारात उपलब्ध होत आहेत. याच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी किती जाधव यांनी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला. कीर्ती जाधव यांनी आपल्या चहाच्या व्यवसायात एडीबल कप वापरण्यास सुरुवात केली. हे कप चहा पिण्यासाठी वापरले जातात तसेच हे कप खाल्लेही जातात. या कपांचा वापर बाहेर देशात जास्त केला जातो. याचाच उपयोग कीर्ती जाधव यांनी आपल्या व्यवसायात केला. या कपातून आहे त्यांनी वेगवेगळे फ्लेवर्स आणण्याचा प्रयत्न केला. या वेगळेपणामुळे दर्जा चहा आणि बरेच काही…..! या व्यवसायात लोकांकडून उत्तम प्रतिसाद मिळू लागला. कीर्ती जाधव यांनी या व्यवसायात आपले पाय भक्कम रोवले.

Darja Fashion

किती जाधव शुभम गायकवाड यांनी दर्जा उद्योग समूह वाढवण्याचा निर्णय घेतला. दर्जा उद्योग समूह वाढवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याचा विडा उचलला. दर्जा उद्योग समूह आणि बरेच काही……! हा व्यवसाय दर्जा चहा व दर्जा फॅशन या व्यवसायात उतरण्यासाठी सज्ज झाला. दर्जा चहा पदरच्या फॅशन यात दर्जा उद्योग समूह कार्यरत आहे. दर्जाच्या हा या उद्योगात चहा सोबतच अनेक सेवा आपल्याला उपलब्ध होतात. यामध्ये चहा सोबत कॉफी, बर्गर, पिझ्झा, शेक्स, याबरोबरच मिसळपाव यासारखे अनेक पदार्थ आपल्याला मिळतात. तसेच कीर्ती जाधव या तरुण पिढीला व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देतात. कीर्ती जाधव या झिरो इन्व्हेस्टमेंट वरती दर्जा उद्योग समूहाची शाखा देतात. दर्जा फॅशन या उद्योगात ही किर्ती जाधव या उत्तम सेवा देत आहेत. यात कीर्ती जाधव यांनी फॅशन व संस्कृती जुनी परंपरा यांची उत्तम सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात प्रिंटेड टी-शर्ट त्यावरती वेगवेगळे फनी कोट्स, संस्कृतीशी निगडित प्रिंट, वेगवेगळ्या सण उत्सव यांचे प्रिंट असे अनेक वेगवेगळे प्रिंट अवेलेबल आहेत. याची क्वालिटी ही उत्तम आहे. खणे अजून या परंपरेतील कापडाचा उपयोग करून अनेक फॅशन स्टाईलचे ड्रेस आपल्याला दर्जा फॅशन कडून उपलब्ध होत आहेत. तसेच हॅन्डमेड ज्वेलरी सुद्धा दर्जा फॅशन उपलब्ध करून देत आहे. कीर्ती जाधव यांनी दर्जा उद्योग समूह या व्यवसायातून बरेच काही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

Darja Fashion Darja Fashion

कीर्ती जाधव शुभम गायकवाड यांनी एका वर्षात आपल्या व्यवसाय खूप मोठा केला आहे. आपल्या मेहनतीने व जिद्दीने किती जाधव शुभम गायकवाड यांनी दर्जा उद्योग समूह हा व्यवसाय अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात आपले पाय भक्कमपणे रोवले आहेत. तसेच अनेक तरुण तरुणींनी व्यवसाय चालू करण्यासाठी मार्गदर्शनही देत आहेत. कीर्ती जाधव सोशल मीडियाचा उपयोग करून आपला व्यवसाय वाढवत आहेत.

Kirti jadhav instagram account

kirtijadhav_darja

हेही वाचा – Purnbramha restorant biography/ जयंती काठाळे यांचा जीवनप्रवास.

हेही वाचा – Pruthvik pratap biography in marathi / पृथ्विक प्रताप यांचा जीवनप्रवास.

हेही वाचा – Lavni king Ashish patil Biography / आशिष पाटील यांचा जीवनप्रवास.

हेही वाचा – Fun with prasad’ Biography marathi / प्रसाद गेंगजे यांचा जीवनप्रवास.