‘जोशी वडेवाले’ यांचा जीवनप्रवास / Joshi wadewale Marathi Story .

‘जोशी वडेवाले’ यांचा जीवनप्रवास – तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या तत्त्वावर विश्वास ठेवून आपल्या कामात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन अतोनात कष्ट करून स्वतःचा नशीब बदलणाऱ्या शैलेश यांच्या जोशी वडेवाले या एका वडे वाल्याचा 18 हॉटेलचा मालक इथपर्यंतचा प्रवास आपण पाहणार आहोत.

क्षेत्र कोणतेही असो जर कष्ट प्रामाणिक असेल तर यश हे मिळतेच. कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाची नसते पण जो ही तयारी दाखवतो आणि प्रामाणिक कष्ट करतो त्याला यश हे मिळतेच. आणि याच कष्टाला जर आपल्या जोडीदाराच्या कष्टाची सांगड मिळाली तर एक वेगळे अस्तित्व निर्माण होतो. एक वेगळे साम्राज्य स्थापन होतं. आज आपण शैलेश जोशी व माया जोशी यांचा जीवन प्रवास पाहणार आहोत.

‘जोशी वडेवाले’ यांचा जीवनप्रवास / Joshi wadewale Marathi Story –

About the Shailesh joshi –

शैलेश जोशी यांचे बालपण खूप कष्टात गेले. ज्या वयात खेळणं , बागडणं , शाळा , मज्जा यांचा अनुभव घ्यायला हवेत अशा वयात शैलेश जोशी यांनी अनेक कटू अनुभव घेतले. शैलेश जोशी लहानपणापासूनच अनेक वेगवेगळी कामे करत असत. शैलेश जोशी शालेय शिक्षण घेत असताना भाजी विकत, गजरे विकत, दिवाळीसारख्या सणाला ते मातीचे दिवे विकत असत, शैलेश जोशी गाड्या धुण्याचे देखील काम करत असत. अशा परिस्थितीत शैलेश जोशी यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. अशा कटू परिस्थितीत शैलेश जोशी यांचे संगोपन होत गेले. व ते अनेक वेगवेगळे अनुभव घेत लहानाचे मोठे झाले.

Quafication

B.COM च्या पहिल्या वर्षात असताना माया जोशी व शैलेश जोशी यांची ओळख झाली. यांच्यात मैत्री झाली व मैत्रीचे रूपांतर थोड्या दिवसांनी प्रेमात झाले.

‘जोशी वडेवाले’ यांचा जीवनप्रवास –

शैलेश जोशी यांच्या परिस्थितीपेक्षा माया जोशी यांची परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती व पूर्णपणे विरुद्ध होतील. माया यांच्या घरची परिस्थिती खूप चांगली होती. त्यांच्या घरी अनेक नोकर चाकर कामाला होते. त्यामुळे दोन्ही घरातून माया जोशी व शैलेश जोशी यांचा विवाहाला विरोध होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघांना घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केले. संसार करण्यासाठी शैलेश जोशी व माया जोशी हे दोघे झेरॉक्स चा व्यवसाय करू लागले. शैलेश जोशी व माया जोशी यांनी आंतरजातीय विवाह केल्यामुळे त्यांच्या घरचे दरवाजे पूर्णपणे त्या दोघांसाठी बंद झाले होते. शैलेश व माया मित्राचा रूम वरती काही दिवस तसेच हॉटेल वरती काही दिवस असे आपले दिवस काढू लागले. झेरॉक्सचा व्यवसाय करते आपला उदरनिर्वाह करू लागले. शैलेश झेरॉक्स काढण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून कागदपत्रे घेऊन येत असतात व माया झेरॉक्स काढत असे काढलेले झेरॉक्स शैलेश परत आहे त्या ठिकाणी पोच करत असे. असा त्यांचा व्यवसाय चालू होता. त्यांनी डेक्कन येथे १० बाय १० ची पत्र्याची खोली भाड्याने घेतली. व या खोलीत शैलेश जोशी व माया जोशी यांचा संसार थाटला.

शैलेश व माया आयुष्याची कठीण लढाई लढत असताना त्यांच्या आयुष्यात एक अत्यंत आनंदाची गोष्ट घडली. त्यांना विकी नावाचा मुलगा झाला. याबरोबरच शैलेश व माने यांच्या आनंदात आणखी भर पडली शैलेश यांना जुडो खेळण्यासाठी जपान ला जाण्याची संधी मिळाली. शैलेश जोशी मित्रमंडळी व हितचिंतकांच्या मदतीने जपानला गेले. व परतले ते ब्लॅक बेल्ट घेऊनच.

शैलेश जोशी ब्लॅक बेल्ट चे मानकरी ठरले पण जपानी माणसांच्या जीवनशैलीचा शैलेश जोशी यांच्यावर खूप प्रभाव पडला होता. जपानी माणसांचे नेहमी कार्यरत असणे व सातत्याने उद्योगी राहणे यातून एक नवीन प्रेरणा घेऊन शैलेश जोशी परतले होते. नंतर शैलेश व माया यांनी पुन्हा व्यवसायात उडी घेतली.

जोशी वडेवाले

शैलेश व माया जोशी यांनी पुणे येथील सारसबाग या ठिकाणी खाद्यपदार्थांचा स्टॉल लावला. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी खाद्यपदार्थाचे दुकान चालू करण्याचे ठरवले. पूर्वीच्या झेरॉक्स दुकान शेजारीच विकी स्नॅक सेंटर या नावाने छोटेसे हॉटेल चालू केले. पण या व्यवसायात म्हणावा तसा जम बसत नव्हता. तेव्हा माया जोशी यांनी वडापाव चा व्यवसाय चालू करण्याचे ठरवले. शैलेश जोशी यांचा या व्यवसायासाठी पूर्णपणे विरोध होता. पण माया जोशी यांनी हट्ट करून 1989 ला जोशी वडेवाले नावाने वडापाव विक्रीला सुरुवात केली. आणि पहिल्याच दिवसापासून ग्राहकांनी या व्यवसायाला खूप चांगला प्रतिसाद दिला. चविष्ट गरमागरम वडापाव, स्वच्छता, आपलेपणाची भावना, ग्राहकांना आपलंसं करण्याची वृत्ती यामुळे जोशी वडेवाले हे नाव पुण्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचले. जोशी वडेवाले यांच्या अनेक शाखा तयार झाल्या. ‘ जोशी वडेवाले ‘ हे वडापावचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात पसरू लागले. यातच शैलेश व माया यांना गौरी नावाची मुलगी झाली. सगळ सुरळीत होत होते. समृद्धी, पैसा, प्रसिद्धी मिळत होते. शैलेश आणि माया यांचे आयुष्य सुंदर बनत गेलं.

सद्गुरु श्री वामनराव पै यांचे मार्गदर्शन

अचानक काळाने घात केला. विकी शाळेच्या ट्रीप साठी गेला असता एका भीषण अपघातात तो कायमचा निघून गेला. या प्रसंगामुळे शैलेश जोशी व माया जोशी पूर्णपणे खचून गेले. पण ते गौरीसाठी सावरले. त्याचं सार आयुष्य कोलमडून गेले. त्यांना सगळ अर्थहीन वाटू लागले. यावेळी शैलेश व माया यांना सद्गुरु श्री वामनराव पै यांचे मार्गदर्शन मिळाले. गौरीनंतर जीवनविद्या हि मुलगी व आनंद हा मुलगा झाला. आयुष्य पुन्हा एकदा मार्गी लागले.

गाड्या पुसून आणि महिन्याला २० रुपये मिळवणारा आज १८ होटेल्स चा मालक आहे. हे सर्व झाले ते प्रामाणिक कष्ट आणि मेहनत यामुळे. क्षेत्र कोणतेही असो पण कष्टाला पर्याय नाही.

‘ जोशी वडेवाले ‘ या शाखेसाठी खालील नंबर वर संपर्क करा. व माहिती मिळवा.

7972083368

जोशी वाडेवाले यांचे Instagram account –

joshi_wadewale_official

हेही वाचा – नवनाथ दरेकर यांचा जीवनप्रवास / Owner of NMD Pvt . Ltd Success Story.

हेही वाचा – Akash thosar biography in marathi / आकाश ठोसर यांचा जीवनप्रवास .

हेही वाचा – Jui gadkari biography in marathi / जुई गडकरी यांचा जीवनप्रवास.

प्रसिद्ध जोशी वडेवाले