Akash thosar biography in marathi / आकाश ठोसर यांचा जीवनप्रवास .

Akash thosar biography in marathi / आकाश ठोसर यांचा जीवनप्रवास –

Akash thosar biography

Akash thosar biography in marathi / आकाश ठोसर यांचा जीवनप्रवास – 2016 साली प्रदर्शित झालेला व मराठी चित्रपटसृष्टीसाठी ऐतिहासिक ठरलेल्या सैराट सिनेमा मध्ये आकाश ठोसर यांनी परश्या म्हणजेच प्रशांत काळे ही भूमिका बजावून अख्ख्या महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला आहे. आकाश ठोसर याने याच चित्रपटातून आपल्या सिनेमासृष्टीतील प्रवासाला सुरुवात केली. आज आपण आकाश ठोसर म्हणजेच परश्या याचा जीवन प्रवास पाहणार आहोत.

About the akash thosar

Akash thosar family

आकाश ठोसर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील आहे. आकाश चा जन्म 24 फेब्रुवारी 1993 साली झाला. आकाश ठोसर हा सर्वसामान्य कुटुंबातील आहे. आकाशचे वडील हे गवंडी काम करतात. आकाश ठोसर ला लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती. तसेच आकाशला याच क्षेत्रात स्वतःचे करिअर करायचे होते. आकाशने अभिनेता होण्याचा कधीच विचार केला नव्हता. आकाशला या क्षेत्रात जास्त रसही नव्हता. आकाश ठोसर ने लहानपणापासूनची कुस्ती या क्षेत्राकडे जास्त कल दिला होता. आकाश ठोसर हा पैलवान आहे. आकाशने महाविद्यालयीन शिक्षण घेताना दोन ते तीन वेळेस महाविद्यालयांमधील नाटकांमध्ये सहभाग घेतला होता.

शिक्षण घेत असताना नागराज मंजुळे सैराट या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते. याच वेळेस नागराज मंजुळे यांच्या भावाने आकाश ठोसर याला पाहिले. व आकाशी काही फोटो काढून नागराज मंजुळे सरांना पाठवले. नागराज मंजुळे सरांना आकाशाचा चेहरा खूप आवडला. तसेच सैराट या मराठी सिनेमा मधील प्रशांत काळे म्हणजेच परशा याच्या भूमिके साठी आकाश ठोसर चा चेहरा व शरीराला यष्टी अनुकूल होती. म्हणून आकाश ठोसर ला सैराट या मराठी चित्रपटासाठी निवडण्यात आले. व आकाश ठोसर चे प्रमुख भूमिकेसाठी निवड करण्यात आली. येथूनच आकाश ठोसर यांनी आपल्या मराठी सिनेसृष्टीतील प्रवासाला सुरुवात केली.

आकाश ठोसर ने सैराट या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली. या चित्रपटासाठी आकाश ठोसर ने जवळ जवळ 13 किलो वजन कमी केले. खूप मेहनतीने व कष्टाने आकाश ठोसर ने या चित्रपटात काम केले. या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळवले. मराठी सिनेसृष्टीत या चित्रपटाने सर्वात जास्त कमाई केली. मराठी चित्रपट सृष्टीत सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट हा सैराट ठरला. तसेच सैराट या चित्रपटाने मराठी सिनेमा सृष्टीत एक ऐतिहासिक छाप उमटवली आहे. सैराट या चित्रपटाचे फक्त मराठीतच नाही तर अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये डबिंग करण्यात आले. मराठी सिनेसृष्टी कडून सैराट या चित्रपटाला भरपूर प्रतिसाद मिळाला. तसेच इतर भाषांमध्येही सैराट चित्रपटाला भरभरून प्रेम मिळाले.

या सिनेमामुळे आकाश ठोसर यांच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. ज्या क्षेत्रात येण्याचा आकाश ठोसर यांनी कधी विचारही केला नव्हता त्या क्षेत्रात येऊन आकाश ठोसर ने पहिल्याच प्रयत्नात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. या चित्रपटामुळे आकाश ठोसर ला अभिनय क्षेत्रात अनेक वेगवेगळ्या संधी उपलब्ध होऊ लागल्या. या चित्रपटानंतर आकाश ठोसर याने अनेक वेगवेगळ्या मराठी सिनेमात तसेच वेगवेगळ्या वेब सिरीज मध्ये हे काम केले. सैराट या सिनेमा झुंड, फ्रेंडशिप या चित्रपटात हे उत्तम अभिनय करून आकाश ठोसर ने स्वतःला सिद्ध केले. आकाश ठोसर ने अनलिमिटेड, लस्ट स्टोरीज अशा अनेक मराठी वेब सिरीज मध्ये हे काम केले आहे. या चित्रपटात व वेब सिरीज मध्ये आकाश ठोसर ने अनेक वेगवेगळ्या नामवंत कलाकारांसोबत काम केले आहे. आकाश ठोसर च्या अभिनयाचे महेश मांजरेकर, नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, संस्कृती बालगुडे, अशा मोठमोठ्या कलाकारांनी कौतुक केले आहे.

आकाश ठोसर यांनी अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. आकाश ठोसरणे सैराट या चित्रपटात परश्या म्हणजे प्रशांत काळे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील कथा सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात आर्ची आणि परश्या यांचे प्रेम कहानी दाखवली आहे. पण या प्रेम कहाणीचा अंत अत्यंत दुःखद असा आहे. याच चित्रपटाने आकाश ठोसर सृष्टीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. यानंतर आकाशवाणी फ्रेंडशिप या चित्रपटात काम केले. या चित्रपटात कॉलेजमध्ये मित्र-मैत्रिणींची कथा दाखवली आहे. यात आकाश ठोसर साधने प्रमुख भूमिका साकारली आहे. अशा अनेक चित्रपटात व वेब सिरीज मध्ये आकाश ठोसर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. आकाश ठोसर ने खूप कमी काळात स्वतःला सिद्ध केले आहे.

Akash thosar new movie

आकाश ठोसर लवकरच घर बंदूक बिर्याणी या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट नागराज मंजुळे हे प्रदर्शित करत आहेत. तसेच या चित्रपटात आकाश ठोसर यांच्यासोबत सयाजी शिंदे हेही झळकणार आहे. सैराट या चित्रपटानंतर आकाश ठोसर अनेक वेगवेगळ्या भूमिकेमध्ये काम करत आहेत.

AKASH THOSAR INSTAGRAM ACCOUNT

akashthosar

हे हि वाचा – Jui gadkari biography in marathi / जुई गडकरी यांचा जीवनप्रवास.

हे हि वाचा – Kirti Jadhav Biography Marathi / दर्जा उद्योग समूह संपूर्ण माहिती.

हे हि वाचा – Purnbramha restorant biography/ जयंती काठाळे यांचा जीवनप्रवास.