Akshay raskar biography/ अक्षय रासकर जीवनप्रवास.
Akshay raskar biography – मराठी ब्लॉगिंग क्षेत्रात अक्षय रासकर हे नाव खूप मोठे आहे. आज आपण याच नावाची प्रेरणादायी कथा घेऊन आलो आहोत. अक्षय रासकर यांचा ब्लॉगिंग क्षेत्रातील प्रवास आज आपण पाहणार आहोत.
About the Akshay raskar
बीड जिल्हा म्हटलं की दुष्काळग्रस्त भाग आपल्या डोळ्यांसमोर येतो.येथील तरुण नोकरीसाठी वेगवेगळ्या शहरात पलायन करतात. अक्षय रासकर यांनी बीड जिल्ह्यातील कोळगाव गावाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. या गावाला आज ब्लॉगर्सचे गाव म्हणून ओळखू लागले आहेत. अक्षय रासकर यांनी गावातील अनेक तरुणांना एकत्र करून ब्लॉगिंग शिकवले. व त्यांना लखपती बनवले.
Akshay raskar education
अक्षय रासकर हे मूळ बीड जिल्ह्यातील कोळगाव येथील रहिवासी आहेत. त्यांनी M.A, Computer diploma केलेले आहे. 2004 साली दहावीनंतर अक्षय रासकर यांनी कॉम्प्युटर शिकण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना कॉम्प्युटर बद्दल आकर्षण वाटू लागले. त्यानंतर अक्षय रासकर यांनी कॉम्पुटर डिप्लोमा करण्याचा निर्णय घेतला.
Akshay raskar’s Adsense approval
अक्षय रासकर यांनी 2007 साली आपले यूट्यूब चैनल चालू केले. यूट्यूब चैनल वरती ते शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहितीचे व्हिडिओ टाकत होते. अक्षय रासकर यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात नोकरी केली. पण शेवटी अक्षय रासकर यांनी आपल्या गावी जाऊन स्वतःचा व्यवसाय चालू करण्याचा निर्णय घेतला. ते गावी आले व त्यांनी स्वतःचे मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्सचे शॉप चालू केले. त्यावेळी त्यांना गुगल कडून व्हेरिफिकेशन लेटर आले. अक्षय रासकर यांना एडसेंस अप्रूवल मिळाले होते. अक्षय रासकर यांना 2012 साली गुगल कडून पहिले पेमेंट मिळाले. 222 डॉलर चे पहिले पेमेंट अक्षय रासकर यांना मिळाले होते. हे त्यांचे यूट्यूब कडून आलेले पहिले पेमेंट होते.
Akshay raskra’s blogging journey
यानंतर अक्षय रासकर यांनी ऑनलाइन काम करून पैसे कसे मिळवावे यासाठी रिसर्च सुरू केले. त्यावेळी त्यांना लॉगिन बद्दल माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी ब्लॉगिंग करण्यास सुरुवात केली. पहिला ते स्वतः ब्लॉगिंग करू लागले. ब्लॉगिंग बद्दल ची संपूर्ण माहिती त्यांनी यूट्यूब वर गुगल वरून मिळवली. ब्लॉगिंग सुरु केल्यानंतर त्यांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी ब्लॉगिंग करण्यासाठी एक ग्रुप बनवण्याचे ठरवले. त्यांनी सुरुवातीला पाच जणांचा ग्रुप बनवला. त्यामुळे त्यांना खूप फायदा होऊ लागला. लिंक शेअर होऊ लागली. व क्लिक्स वाढू लागले.
अक्षय रासकर यांनी ब्लॉगिंग करण्याची सुरुवात केली त्यावेळी त्यांच्या गावात दिवसभर लाईट नसायची. तसेच त्यांच्या गावात इंटरनेटची ही सोय नव्हती. अक्षय रासकर यांना काम करण्यासाठी इन्वर्टर चा उपयोग करावा लागत असे. तसेच इंटरनेटची सोय नव्हती त्यामुळे त्यांना दोन ते तीन किलोमीटर पाई चालत जावे लागायचे. नंतर त्यांना इंटरनेटची रेंज मिळत असे. त्यानंतर ते आपले काम पूर्ण करायचे. अशा कठीण परिस्थितीत अक्षय रासकर यांनी आपला ब्लॉगिंग प्रवास चालूच ठेवला.
अक्षय रासकर यांनी आपल्या मित्रांना ब्लॉगिंग बद्दल माहिती दिली. व त्यांनाही ब्लॉगिंग करण्यासाठी प्रेरणा दिली. यानंतर अक्षय रासकर यांनी आपल्या संपूर्ण गावातील तरुण मुलांना लॉगिन शिकवण्यास सुरुवात केली. आज अक्षय रासकर यांनी 400 ते 450 मुलांना आपल्या सोबत घेतले आहे. या गावातील सर्व मुले ब्लॉगिंग करतात. प्रत्येक मुलगा हा महिन्याला दोन ते अडीच लाख रुपये कमवत आहे.
अक्षय रासकर जेव्हा स्वतःचा व्यवसाय चालू करण्याचा विचार केला त्यावेळी त्यांना घरातून सपोर्ट मिळाला नाही. तरीही त्यांनी स्वतःला सिद्ध केले तसेच अक्षय रासकर यांनी गावातील अनेक तरुणांना पैसे कमावणे शिकवले. व स्वतः सोबत त्यांनाही ब्लॉगिंग शिकवण यशस्वी केले.
Akshay raskar’s blog
अक्षर रासकर यांनी यूट्यूब नंतर ब्लॉगिंग करण्यास सुरुवात केली. त्यांनी पहिला ब्लॉग हा टेक्निकल सपोर्ट या आपल्या यूट्यूब चैनल च्या नावाने लिहिण्यास सुरुवात केली. अक्षय रासकर यांनी शेतकरी लोकांना शासकीय योजनांची माहिती मिळावी याविषयी ब्लॉग बनवले. त्यानंतर अक्षय यांना ब्लॉगिंग मधून छान प्रतिसाद मिळू लागला. त्यानंतर अक्षय रासकर यांनी आपल्या ब्लॉगिंगसाठी अनेक वेबसाईट्स बनवल्या. या माध्यमातून डॉलर्स मध्ये पैसे मिळवत आहेत. ब्लॉगिंग मध्ये यश मिळाल्यानंतर अक्षय यांनी गावातच स्वतःचे ऑफिस थाटले. या ऑफिस मधून त्यांनी मुलांना ब्लॉगिंग शिकवले. व त्यांना आपल्या वेबसाईट वरती काम देण्यास सुरुवात केली. लॉगिन करून आलेल्या पैशातून 60% मिळकत हे घेतात. व 40% रक्कम ही मुलांना दिली जाते. अक्षय रासकर हे महिन्याला 30 ते 40 लाख रुपये कमावतात.
अक्षय रासकर यांना अनेक सरकारी नोकरीच्या संधीही आल्या होत्या. पण त्यांनी त्या नाकारल्या. अक्षय रासकर यांचा स्वतःवरती विश्वास होता. त्यांनी ब्लॉगिंग लाच आपले करिअर निवडले. ते स्वतः ब्लॉगिंगच्या माध्यमातून फेमस झाले. आपल्या गावाचे व जिल्ह्याचे नाव मोठे केले. अक्षराने ब्लॉगिंग करून डॉलर्स मध्ये पैसे मिळवले. आपले ज्ञान इतर तरुण मुलांनाही दिले. त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. आज जवळपास 400 ते 500 मुलांना अक्षय रासकर यांनी पैसे कमावण्याचा मार्ग दाखवला आहे. अक्षय रासकर हे अजूनही अनेक तरुणांना ब्लॉगिंग शिकण्यासाठी व पुढे जाण्यासाठी सपोर्ट करत आहेत.
अक्षय रासकर हे ज्यावेळी वेगवेगळ्या जिल्ह्यात नोकरीसाठी जात होय त्यावेळी कोळगाव व बीड आम्हाला कोणाला माहीत नसायची. तसेच बीड हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जात होता. बीड जिल्हा हा मिनी बिहार या नावानेही ओळखला जात होता. अक्षय रासकर यांना या गोष्टीचे वाईट वाटायचे. त्यांना आपल्या जिल्ह्याचे नाव मोठे करायचे होते. व त्यांनी ते करून दाखवले आहे. अक्षय रासकर यांना मराठी ब्लॉगिंग किंग म्हणून ओळखले जाते. तसेच आज कोळगाव व बीड ला ब्लॉगर चे गाव म्हणून ओळखले जाते.
अक्षय रासकर यांच्याकडून आजच्या तरुण पिढीने जिद्द व चिकाटीने कसे काम केले पाहिजे आपल्यासमोर आलेल्या संकटांवर कशी मात केली पाहिजे याचे धडे घेतले पाहिजेत. कोणतेही संकट आले तरी आपण हार मानली नाही पाहिजे हे अक्षय रासकर यांच्या जीवन प्रवासातून आपल्याला शिकायला मिळते.
अक्षय रासकर instagram accoun – Akshay raskar
हेही वाचा-हॉटेल सातबाराचा न ऐकलेला प्रवास