Kokan hearted girl Ankita Walawalkar

कोकण कन्या अंकिता वालावलकर हिला आपण सगळे ओळखतो. या कोकण कन्या ची माहिती आपण या लेखातून घेऊन आलो आहोत. हा लेख आजकालच्या तरुण पिढीसाठी एक उत्तम उदाहरण असणार आहे. आपण आयुष्यात घेत असलेल्या निर्णय हा पूर्णपणे विचार करून घ्यावा हे आपल्याला कोकण कन्या अंकिता वालावलकर हिच्या प्रवासातून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचावा.

Ankita Walwalkar Biography

kokanheartedgirl या इंस्टाग्राम पेजवरून फूड, लाइफ स्टाइल, व कोकण एक्सप्लोर करणारी मुलगी कोकण कन्या अंकिता प्रभू वालावलकर ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आज आपण अंकिताची प्रेम कहानी व तिचा जीवन प्रवास पाहणार आहोत.ankita walawalkar

Kokanheartedgirl अंकिता वालावलकर

Kokanheartedgirl अंकिता वालावलकर हिचे पूर्ण नाव अंकिता प्रमोद प्रभू वालावलकर हे आहे. अंकिता सिंधुदुर्ग येथील आहे. अंकिता चा जन्म 14 जानेवारी 1993 रोजी झाला. अंकिताने सिविल इंजिनियर या क्षेत्रातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. अंकिताने MITM या कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आहे.

Kokanheartedgirl अंकिताचे professional

अंकिता वालावलकर ही कंटेंट क्रियेटर बिझनेस वुमन तसेच Vlogger आहे. अंकिता वालावलकर हिच्या Kokanheartedgirl या इंस्टाग्राम अकाउंट वरती 500K+ फॉलोवर्स आहेत. अंकिताचे वालावलकर Resort नावाचे मालवण येथे स्वत्ताचे Resort आहे.

अंकिता वालावलकर ही खूप जास्त शिस्तीत वाढलेली आहे. तिच्या घरातील वातावरण हे खूप जास्त कडक होते. अशा वातावरणात अंकिता सोळा वर्षाची असताना प्रेमात पडली. त्या वेळी अंकिता इंजिनीअरिंग चे शिक्षण घेत होती. ती ज्या मुलाच्या प्रेमात पडली. तो मुलगा तिच्या पेक्षा 10 ते 12 वर्षांनी मोठा होता. 18 वर्षाची झाल्यानंतर अंकिता त्या मुलासोबत पळून गेली.

व त्याच्या घरात राहू लागली. पण त्यांनी लग्न केले नाही. एक ते दीड महिन्यात तिला तिची चूक समजून आली. अंकिताला त्या मुलाने खूप त्रास दिला. तो तिला मारायचा. शिव्या द्यायचा. तिला त्यामुळे खूप मानसिक त्रास झाला. या सगळ्यात त्या मुलाच्या आईने अंकिताला शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. ती कायम अंकिताला सपोर्ट करायची. अश्या वातावरणात अंकीता वालावलकर हिने जवळ जवळ दीड वर्ष काढले. व अंकिताने आपले शिक्षण पूर्ण केले.

Toxic relationship मधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न

दीड वर्ष हे सगळं सहन केल्यानंतर अंकिताने या नात्यातून बाहेर पडण्याचा विचार केला. व आपल्या आई-वडिलांकडे परत जाण्याचा निर्णय घेतला. या वेळी तिच्या आई व वडिलांनी तिला पूर्ण पाठींबा दिला. व तिच्या आई-वडिलांनी तिचा निर्णयाचा स्वीकार केला. आणि तिने ते नाते तोडले. या सगळ्या गोष्टीतून अंकिताला बाहेर पडताना खूप त्रास सहन करावा लागला. आणि यानंतर खूप कष्ट करून अंकिताने Kokanheartedgirl हि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. हे सर्व करताना अंकिताने अनेक अडचणींना मागे टाकले. व स्वत्ताचे अस्तित्व निर्माण केले. तिच्या आयुष्यात अडचणींपेक्षा तिची जिद्द खूप होती.

अंकिताची Instagram journey

यानंतर अंकिताने सुरुवातीला tiktok वरती व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. पण थोड्याच दिवसात tiktok बंद झाले. त्यानंतर तिने Instagram या ॲप वरती व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. तिने एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये अंकिताने आपल्या वडिलांना एक ब्रँडेड शर्ट गिफ्ट केला होता असा तो व्हिडिओ होता. हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला. व तो व्हिडिओ खूप व्हायरल होऊ लागला. यातूनच अंकिता व्हायरल होऊ लागली. व Kokanheartedgirl नावाने फेमस झाली. या Journey मध्ये तिला खूप प्रॉब्लेम आले. तिला खूप ट्रोल करण्यात आलं. पण तरीही ती या प्लॅटफॉर्म वरती टिकून राहिली. असे अंकिताने स्वतःचे अस्तित्व निर्माण केले.

Ankita walawalkar.

अंकिता वालावलकर हिच्या प्रसिद्धीमुळे अंकिताला Bigg Boss मराठी या झी मराठी वाहिनी वरील मराठी शो मध्ये जाण्याची संधी मिळाली. या शो मध्ये अंकिताने अनेक वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम केले. व उत्कृष्ट कामगिरी बजावली. या शो मुले अंकिता संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. या नंतर अंकिता वालावलकर यांना अनेक करिअरच्या संधी उपलब्ध झाल्या. या शो मध्ये अंकिता वालावलकर यांनी आपल्या हुशारीने व चिकाटीने top 5 यात आपले नाव नोंदवले आहे.

आज कालच्या तरुण मुलींनी Kokanheartedgirl अंकिता वालावलकर हिच्या प्रेम कहानी तून अनुभव घेण्याची गरज आहे. मुलींनी भावनेच्या भरात घेतलेले निर्णय पुढे जाऊन किती त्रासदायक ठरू शकतात याची जाणीव करून देणारी Kokanheartedgirl अंकिताची प्रेम कहानी आहे. त्यामुळे आजच्या Generation मधील मुलींनी एखादा निर्णय घेताना विचारपूर्वक घेतला पाहिजे. तसेच आपल्या आईवडीलांचा सल्ला घेतला पाहिजे.

Ankita walawalkar

Bigg Boss 5 मराठी या शो नंतर अंकिता प्रभू वालावलकर हिने दसर्याच्या मुहूर्तावर आपल्या नवर्याचे नाव जाहीर केले. कोकणचा होणारा जावई हा म्युझिक डिरेक्टर कुणाल भागात हा आहे. या वेळी अंकिताने आपल्या सोशल मिडिया च्या अकाऊंट वर पोस्ट शेअर करत सूर जुळले ….. असे Caption दिले होते. सोबतच कुणाल भगत याने हि आपल्या सोशल मिडिया च्या अकाऊंट वर आपल्या प्रेमाची कबुली दिली. लवकरच ते दोघे लग्न करणार आहेत. ते दोघे फेब्रुवारी या महिन्यात लग्नात अडकणार आहेत. अंकिता वालावलकर हिने आपला भूतकाळ मागे टाकत एका नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे.

हेही वाचा : -प्रतिक्षा थोरात यांची सक्सेस स्टोरी