अशोक तोडमल यांचा खडतर संगर्षमय जीवनप्रवास –
About the ashok todmal
Ashok todmal famile
Ashok todmal life story/ अशोक तोडमल यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास.- आपल्या धारदार शब्दांनी आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देणाऱ्या अशोक तोडमल यांची अनेक भाषणे, व्हिडिओज तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती पाहिली असतीलच. आपण आज अशोक तोडमल यांचा संघर्ष व प्रेरणादायी प्रवास पाहणार आहोत. अशोक तोडमल यांचा प्रवास म्हणजेच आयुष्य संपवण्याचा निर्णय, रेल्वे रुळावर ती जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न इन्स्पिरेशन , प्रोत्साहन व एक पब्लिक स्पीकर इथपर्यंतचा प्रवास आपण पाहणार आहोत.
Ashok todmal Education journey –
अशोक तोडमल यांचा एका छोट्याशा गावात एकदम गरीब परिवारात जन्म झाला. त्यांच्या घरची परिस्थिती खूप गरीब होती. अशोक तोडमल यांच्या घरात खूप जास्त अडचणी होत्या. त्यांच्या घरात पैशाची चणचण होती. अशोक तोडमल हे फाटके कपडे घालायचे. दोन वर्षातून एखादा ड्रेस त्यांना मिळत असत. तसेच त्यांच्या घरात जेवणाचे ही हाल होत असत. अशा परिस्थितीत अशोक तोडमल यांनी 15 वर्षे आपले शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना शहरात कामासाठी जाण्यास सांगितले. शहरात गेल्यानंतर त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये इंटरव्यू दिले. त्यानंतर त्यांना एका कंपनीत नोकरी मिळाली. तिथे त्यांना 3000 रुपये पगार मिळू लागला. अशोक तोडमल यांनी आपले शिक्षण पुन्हा चालू केले. ते काम करत करत शिक्षण घेत होते. अशोक तोडमल हे मित्रांसोबत येऊन शहरात एका भाड्याच्या खोलीत राहत असत. अशोक तोडमल हे पैसे मिळवण्यासाठी खूप कष्ट करत. ते कंपनीत ओव्हर टाईम काम करत असत. त्यांच्या कामा व्यतिरिक्त प्रत्येक महिन्याला त्यांचे ओव्हर टाइम चे 80 ते 90 तास भरून निघत असत.

याच वेळी त्यांच्या भावाचा अपघात झाला. त्यांच्या भावाच्या पायाला दुखापत झाली होती. डॉक्टरांनी पायाचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. अशोक तोडमल यांच्या भावाच्या पायाला इन्फेक्शन झाले होते. त्यांचा पाय ऑपरेशन करून काढणे गरजेचे होते. असे जर केले नाही तर पायाची इन्फेक्शन संपूर्ण शरीरात पसरण्याचा धोका होता. अशोक तोडमल हे मोठे होते व त्यांचा भाऊ लहान होता. घराची संपूर्ण जबाबदारी अशोक तोडमल यांच्या वरती होती. त्यांनी हॉस्पिटल चा पूर्णपणे खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली. या काळात अशोक तोडमल यांनी जवळजवळ सात ते आठ लाख रुपये कर्ज केले होते. अशोक तोडमल यांचा लहान भाऊ पूर्णपणे खचून गेला होता. अशा परिस्थितीतही अशोक तोडमल हे आपल्या भावाला आधार देत होते. अशोक तोडमल हे कर्जाला कंटाळले होते. त्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. ते आत्महत्या करण्यासाठी रेल्वेच्या रुळावर ती जाऊन उभारले. पण काही वेळातच त्यांनी आपला निर्णय बदलला. व तेथून माघारी घरी आले. हा काय त्यांच्यासाठी खूप त्रासदायक होता. या काळात अशोक तोडमल अनेक चुकीचे निर्णय घेण्याचाही प्रयत्न केला. पण त्यांच्या नशिबात काही वेगळेच होते. त्यांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय बदलून स्वतःला घडवण्याची सुरुवात केली. अशोक तोडमल यांना मिळालेल्या संधीचं त्यांनी सोन्याचा रूपांतर केले.
यानंतर अशोक तोडमल यांनी एक प्रेरणादायी लेक्चर अटेंड केले. यानंतर त्यांच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यांना आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा मिळाली होती. ते पुन्हा जिद्दीने उभे राहिले. व त्यांनी नव्याने सुरुवात केली.
Ashok todmal income
याच वेळी अशोक तोडमल यांना झिरो इन्व्हेस्टमेंट एका बिझनेस प्लॅन ची ऑफर आली. त्यांनी जवळ जवळ सहा तास या बिझनेस ची संपूर्ण माहिती घेतली. अशोक तोडमल यांनी या बिजनेस प्लॅन ची सखोल माहिती घेतली. अनेक वेळा त्यांनी या बिझनेस बद्दलची शंका निचरा करून घेतले. संपूर्ण ज्ञान व प्रशिक्षण घेऊन अशोक तोडमल यांनी या बिजनेस प्लॅन चा पाया रचला. व याच बिझनेस प्लॅन मधून अशोक तोडमल यांनी नवीन आयुष्याची सुरुवात केली. सहा तास युक्तिवाद केल्यानंतर त्यांनी ही ऑफर स्वीकारली. व ते या मार्केटिंग बिजनेस प्लॅन मध्ये उतरले. यानंतर अशोक तोडमल यांनी खूप मेहनत घेतली. पहिले सहा महिने अशोक तोडमल यांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यांनी अफाट कष्ट केले. यानंतर त्यांना यश मिळू लागले. त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले. या क्षेत्रात यशस्वी होत गेले. त्यांनी एका वर्षात 27 लाख रुपये पैसे कमावले. यानंतर ते मागे फिरले नाहीत. अशोक तोडमल यांनी भरपूर फेम व पैसा मिळवला.
अशोक तोडमल यांनी खूप मेहनतीने व कष्टाने यश मिळवले. प्रसिद्धी मिळवली. त्यांनी आपल्या जिद्दीने परिस्थिती बदलली. आपल्या परिस्थिती वर मात करून व आपल्या येणाऱ्या अडचणींना दुर्लक्ष करून अशोक तोडमल यांनी यश मिळवले , फेम मिळवले व आज ते एक प्रसिद्ध युवक म्हणून ओळखले जातात. तसेच ते अनेक युवक व युवतींना प्रोत्साहन देण्याचे काम करतात. यश मिळवण्यासाठी त्यांना अनेक गोष्टींचा व अडचणींचा सामना करावा लागला. व यातूनच त्यांच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळाले.
Ashok todmal status download
Ashok todmal video
Ashok todmal sir
अशोक तोडमल यांनी अनेक महिला, मुली, गृहिणी, तरुणांना मार्गदर्शन केले आहे. ते एक उत्तम बिजनेस कोच आहेत. अशोक तोडमल हे बिझनेस कन्सल्टंट, लोकप्रिय इन्स्पिरेशनल स्पीकर तसेच ते लाईफ कोच ही आहेत. अशोक तोडमल यांनी आपल्या इंस्पिरेशनल स्पीच ने अनेक लोकांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. अनेक लोकांना सक्सेस चा गुरु मंत्र दिलेला आहे. अशोक तोडमल हे आपल्या भाषणातून लोकांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतात. अशोक तोडमल यांचे अनेक मोटिवेशनल स्टेटस डाउनलोड केले जातात. त्यांचे अनेक व्हिडिओज व्हायरल आहेत. अनेक लोकांची, युवक युवतींची अनेक गृहिणींची रोजची सकाळ ही अशोक तोडमल यांच्या वेगवेगळ्या भाषणाने व प्रोत्साहन करणाऱ्या स्टेटस ने होते.
अशोक तोडमल यांचे youtube channel येथे पहा – Ashok Todmal
हेही वाचा – Salgar Amruttulya chaha story/ सलगर अमृततुल्य चहा यशोगाथा.
हेही वाचा – Sunny jadhav biography in marathi / ( रुबाब मेन्स वेअर ) यांची वाटचाल.
हेहि वाचा – Tanaji galgunde biography in marathi/तानाजी गलगुंडे यांचा जीवनप्रवास