Dhananjay Powar DP dada- धनंजय पवार म्हणजे DP दादा हे नाव महाराष्ट्रासाठी नवे नाहीये. धनंजय पवार हे एक फेमस रील स्टार आहेत. आज हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात गाजत आहे . यासाठी कारणही तसेच आहे. BIG BOSS MARATHI या शो मध्ये जाऊन धनंजय पवार हे कोल्हापूरचे नाव मोठं करत आहेत. धनंजय पवार यांचा हा प्रवास इंस्टाग्राम वरून सुरू झाला. डीपी दादांचा हा प्रवास आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. धनंजय पवार म्हणजे डीपी दादा हे कोल्हापुरातील एक रांगडा पैलवान आहेत. कोल्हापुरातील रांगड्या पैलवानाची सोशल मीडिया इन्फ्ल्यूं सर ते बिग बॉस मराठी या मोठ्या प्लॅटफॉर्म वरील शो मध्ये जाण्यापर्यंत चा प्रवास आपण या लेखामधून घेऊन आलो आहोत.
Dhananjay Powar DP dada

Dhananjay Powar Age
धनंजय पवार यांचा जन्म कोल्हापूर येथील इचलकरंजी या ठिकाणी 13 जुलै 1986 रोजी झाला.
Dhananjay Powar Shop
धनंजय यांचे वडील अजित पवार हे सोसायटी फर्निचर चे ओनर आहेत. सोसायटी फर्निचर ची सुरुवात 1980 साली अजित पवार यांनी केली. सुरुवातीला अजित पवार यांनी लहानशा व्यवसायातून सुरुवात केली यानंतर त्यांनी या व्यवसायाचे वटवृक्षात रुपांतर केले.
Dhananjay Powar Biography
धनंजय पवार यांनी आपले शालेय व्यंकटेश माध्यमिक विद्यालय येथून शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी गोविंदराव ज्युनियर कॉलेज येथून आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर धनंजय पवार यांनी अजित पवार यांनी सुरुवात केलेला द सोसायटी फर्निचर या व्यवसायात हातभार लावला. पण धनंजय पवार यांना लहानपणापासूनच ॲक्टिंग ची आवड होती. हीच आवड जोपासण्यासाठी धनंजय पवार यांनी 2020 साली आपला सोशल मीडियाचा प्रवास चालू केला.
धनंजय पवार यांनी इंस्टाग्राम व यूट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून आपल्या विनोदी शैलीतून व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. यूट्यूब वर इंस्टाग्राम वरती धनंजय पवार आपल्या परिवारा सोबत तसेच सोसायटी फर्निचर मधील कर्मचारी , दुकानात येणारे ग्राहक , या सोबतच मित्र परिवार यांच्या सोबत विनोदी शैलीत व्हिडिओ बनवतात. धनंजय दादा म्हणजेच डीपी दादा यांच्या सोशल मीडियाच्या प्रवासात त्यांना आई, बायको, बहिण, वडील, परिवार या सर्वांची सोबत लाभली. यामुळे डीपी दादांचा एक मोठा चाहता वर्ग निर्माण झालेला आहे. धनंजय पवार यांचे इंस्टाग्राम वरती जवळ जवळ 1.2 मिलियन फॉलोवर्स आहेत. तसेच त्यांनी 3000 पेक्षा जास्त व्हिडिओ बनवले आहेत. तसेच धनंजय पवार यांच्या यूट्यूब चैनल वरती जवळ जवळ 979K Subscibers आहेत. या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून धनंजय पवार आज महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचलेले आहेत. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ते आपल्या फॅन्सचे मनोरंजन करत असतात. धनंजय पवार यांच्या फॅन्स मध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत समावेश आहे. यामुळे धनंजय पवार यांना महाराष्ट्रात खूप जास्त प्रसिद्धी मिळाली.
Dhananjay Powar Bigg Boss Marathi

धनंजय पवार यांच्या प्रसिद्धीमुळे धनंजय पवार म्हणजेच डीपी दादा यांना मराठी बिग बॉस मध्ये जाण्याची संधी मिळाली. यामध्ये डीपी दादा सगळ्यांना आपलेसे करून घेत आहे. व खूप चांगल्या पद्धतीने खेळ खेळत आहे. बिग बॉस मराठी मुळे धनंजय दादाला एक नवीन ओळख मिळाली आहे. व बिग बॉस मराठी या शो मुळेच धनंजय पवार यांना संपूर्ण महाराष्ट्रात ओळख मिळालेली आहे. यामुळे भविष्यात धनंजय पवार यांना मनोरंजन क्षेत्रात अनेक करिअरच्या संधी उपलब्ध होणार आहेत यात शंका नाही. या शोमुळे धनंजय पवार यांच्या आयुष्यात एक नवीन वळण येणार असल्याची शक्यता आहे. व धनंजय पवार हे मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करण्याच्या संधी आहेत.
धनंजय पवार यांना मटन खाण्याचे प्रचंड आवड आहे. व हीच आवड ते वेळोवेळी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून विनोदी शैलीत सादर करत. यामुळे धनंजय दादांना मटन प्रेमी म्हणून ओळखले जाते. यात व्हिडिओमुळे धनंजय दादा यांची मटन प्रेमी धनंजय अशी ओळख निर्माण झालेली आहे. दादा यांनी अनेक कॉमेडी व्हिडिओ बनवले आहेत. यामध्ये आईचे आणि बायकोचे भांडण , आईचा आणि बहिणीचे भांडण, असे अनेक व्हिडिओ आहेत. या कॉमेडी व्हिडिओ ना सोशल मीडिया वरती मिलियन मध्ये लाइक्स व व्ह्यूज आहेत. महाराष्ट्रामधील चाहता परिवार वर्ग धनंजय दादांचे कॉमेडी व्हिडिओ आवडीने पाहतो. व या कॉमेडी व्हिडिओज मधून हास्याचा आनंद घेत असतो.
Dhananjay Powar Income
धनंजय पवार आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून महिन्याला जवळजवळ दोन लाखां पर्यंत इन्कम मिळवतात. या सोबतच त्यांचे इतरही उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. त्यांच्या व्यवसायातून म्हणजेच सोसायटी फर्निचर यामधून लाखोंमध्ये कमाई करत आहेत.
Dhananjay Powar Family
Dhananjay Powar Wife Name
धनंजय पवार हे विवाहित आहेत व त्यांच्या पत्नीचे नाव कल्याणी पवार आहे. धनंजय पवार व यांची पत्नी कल्याणी पवार यांना दोन मुले आहेत. कल्याणी पवार हा साड्यांचा व्यवसाय करतात. कल्याणी पवार यांच्या साड्यांच्या व्यवसायाचे नाव आईसाहेब वस्त्रम असे आहे. आईसाहेब वस्त्रम हा साड्यांचा ब्रँड आहे. तसेच कल्याणी पवार याही सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसत असतात. तसेच त्या चाहत्यांसोबत अनेक रिल्स शेअर करत असतात. कल्याणी पवार या ही एक रील स्टार आहेत. आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंट वर कल्याणी पवार यातील शेअर करून आपल्या आईसाहेब वस्त्रम या व्यवसायाचे मार्केटिंग ही करत असतात.
धनंजय पवार यांच्या परिवारामध्ये त्यांचे वडील अजित पवार, आई अश्विनी पवार, पत्नी कल्याणी पवार, बहीण अंकिता पवार हे आहेत. या सर्वांनी धनंजय दादा यांना या प्रवासात खूप साथ दिली आहे. तसेच त्यांचा मित्र परिवार त्यांच्या व्यवसायातील लोक यांनीही धनंजय पवार यांना भरपूर पाठिंबा दिला आहे. या सर्वांच्या पाठबळा मुळेच धनंजय पवार कोल्हापूर चे रील स्टार म्हणून नावाजले जातात.
डीपी दादा यांचे इंस्टाग्राम अकाउंट – Dhananjay Powar Instagram Id
डीपी दादा यांचे यूट्यूब चैनल- Dhananjay Powar Youtube Channel
हेही वाचा – सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे शीला दीदी यांचा जीवन प्रवास.
हेही वाचा – प्रदीप मराठे यांचा जीवनप्रवास / Pradip Marathe Success Story .
हेही वाचा – निकिता तांबोळी यांचा जीवनप्रवास / Nikki tamboli biography in marathi.