Gaurav more biography in marathi / गौरव मोरे यांचा जीवनप्रवास.

comedy king gaurav more biography in marathi / कॉमेडी किंग गौरव मोरे यांचा जीवनप्रवास.- हास्य जत्रा हा महाराष्ट्राचा आवडता कार्यक्रम गाजवणारा फिल्टर पाड्याचा मुलगा गौरव मोरे याची नवीन ओळख करून देण्याची गरज नाहीये. आज आपण गौरव मोरे यांचा ताडपत्री च्या घरातून लंडन पर्यंतचा प्रवास पाहणार आहोत.

Gaurav more age

गौरव मोरे यांचा जन्म 1 जानेवारी 1998 मध्ये झाला होता. मुंबई सारख्या एका गजबजलेल्या शहरातून व फिल्टर पद्याचा बच्चन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गौरव मोरेने मनोरंजन विश्वात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. हे स्थान निर्माण करताना गौरव मोरे याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. चिखलात उगवणाऱ्या कमळाप्रमाणे गौरव मोरे एका छोट्याशा वस्तीतून बाहेर पडून भारत व भारताबाहेरील मनोरंजन सृष्टीमध्ये गाजलेला आहे.

Gaurav more family

गौरव मोरे हे 26 वर्षाचे असून ते मुंबई येथील पवई मधील फिल्टर पाडा येथे राहतात. गौरव मोरे हे शिक्षणात खूप कमी होते. फारसा रस नव्हता. त्याने कसतरी आपले शिक्षण पूर्ण केले. गौरव मोरे यांचे बालपण अतिशय अडचणीतून गेले. गौरव मोरे हे उल्हासनगर येथील रेल्वे स्टेशनच्या बाजूला एका ताडपत्रीचा घरात राहायचे. त्यानंतर गौरव मोरे हे विठ्ठलवाडी येथे राहू लागले. तेथील परिस्थिती ही सारखीच होती. त्यावेळी गौरव मोरे यांचे वडील C.S.T ला B.M.C मध्ये काम करायचे. फिल्टर पाडा येथे राहू लागले. तेथेही ते ताडपत्री च्या घरात राहायचे. पावसाच्या वेळेत त्या घरात पाणी गळायचे. गौरव मोरे यांनी खूप कष्ट सहन केले. गौरव मोरे यांच्या आईने गौरव मोरे यांच्यावर व त्यांच्या भावंडांवर ती खूप चांगले संस्कार केले. गौरव मोरे यांना सिनेमे , टीव्ही बघण्याची खूप आवड होती. त्यावेळी त्यांच्या घरात टीव्ही नव्हती. ते लोकांच्या घरात टीव्ही बघण्यासाठी जायचे. अशा परिस्थितीत गौरव मोरे यांनी आपले बालपण काढले आहे.

गौरव मोरे यांना लहानपणापासूनच सिनेमा पाहायला आवडायचे. त्यांनी पाहिलेल्या सिनेमाची ते शाळेत जाऊन मिमिक्री करायचे. ते एक्टिंग करण्याचा प्रयत्न करत असत. गौरव मोरे ज्यावेळी कॉलेजमध्ये होते त्यावेळी त्यांच्या कॉलेजमध्ये फेस्टिवल चालू होते. त्यांच्या कॉलेजमध्ये एकपात्री स्पर्धा होती. दलितांना जाणवले की त्यांना यातच करिअर करायचा आहे. ही गोष्ट त्यांनी त्यांच्या एका मित्राला सांगितले. त्यांच्या मित्राने गौरव मोरे यांना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले व सपोर्ट ही केला.

गौरव मोरे यांच्या आई-वडिलांना त्यांनी घेतलेला निर्णय कधीच आवडला नाही. पण तरीही ते कष्ट करत राहिले. गौरव मोरे हे पवई मधून वेगवेगळ्या ठिकाणी ऑडिशन देण्यासाठी जात असत. त्यावेळी त्यांच्याकडे प्रवासासाठी पैसे नसायचे. ते पायी चालत चालत जात व ऑडिशन देत असत.

गौरव मोरे यांनी नाटक शिकण्याकडे जास्त भर दिला. ते वेगवेगळ्या नाटकात काम करू लागले. ते नाटकातील वेग वेगळ्या गोष्टी शिकत गेले. गौरव मोरे यांनी ही कला शिकण्याकडे जास्त भर दिला. त्यांनी कलेला जास्त महत्व दिले. व दिवस रात्र ते मेहनत घेऊ लागले.

Gaurav more career

गौरव मोरे यांनी आपल्या करिअरची सुरुवात माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून केली. या मालिकेतील साकारलेल्या भूमिकेतून गौरव मोरे यांनी मनोरंजन विश्वात पहिले पाऊल ठेवले. पण महाराष्ट्राची हास्य जत्रा हा महाराष्ट्रातील हास्य विनोदी कार्यक्रमातील त्याच्या पदार्पणा नंतर गौरव मोरे याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळू लागली. या शोमुळे गौरव मोरे याला प्रचंड लोकप्रियता मिळाली व मनोरंजन क्षेत्रात एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून स्थानही मिळाले. याचबरोबर गौरव मोरे यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

गौरव मोरे यांनी हास्यसम्राट या मालिकेसाठी ऑडिशन दिले. त्यानंतर त्यांना सिलेक्ट करण्यात आले. इथूनच गौरव मोरे यांचा. महाराष्ट्राची हास्य जत्रा हा प्रवास चालू झाला. व त्यांच्या करिअरला सुरुवात झाली.

गौरव मोरे यांनी 2008 मध्ये बॉलीवूड क्षेत्रात पदार्पण केले. यामध्ये त्यांनी हा चित्रपट थोडा प्यार थोडा मॅजिक या चित्रपटात सैफ अली खान, ऋषी कपूर, अमिषा पटेल आणि राणी मुखर्जी या बड्या हस्ती सोबत काम केले. यानंतर संजू या हिंदी चित्रपटात गौरव मोरे यांनी छोटीशी भूमिका साकारली. संजू या चित्रपटामध्ये गौरव मोरे यांनी स्पॉट बॉय ही भूमिका साकारली होती. त्याचबरोबर गौरव मोरे यांनी अनेक हिंदी चित्रपटात देखील काम केलेले आहे

गौरव मोरे यांनी आयुष्यात खूप स्ट्रगल केले. त्यांना कुठल्याच प्रकारचा सपोर्ट नव्हता. मोरे यांना खूप लोक म्हणायचे की तू आयुष्यात काहीच करू शकणार नाहीस, खूप लोकांनी त्यांना मागे ओढण्याचा प्रयत्न केला. पण गौरव मोरे यांनी स्वतःला सिद्ध केले.

गौरव मोरे यांनी पैसा मिळवला. त्यांनी त्यांचे नाव मोठे केले. गौरव मोरे यांना आयुष्यात खूप रिजेक्शन मिळाली. पण तरीही त्यांनी आपली जिद्द सोडली नाही. अनेक वर्ष कष्ट करून व मेहनत घेऊन गौरव मोरे हे नाव खूप मोठे झाले आहे.

Gaurav more movie

आज गौरव मोरे हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात झाले आहे. यानंतर गौरव मोरे यांनी अनेक मराठी सिनेमात काम केले. त्यांनी Boyz 4 , अंकुश, बाळकडू, गावठी, असे अनेक मराठी सिनेमे केले आहेत. तसेच गौरव मोरे यांनी भारताबाहेर जाऊन लंडन मिसळ हा सिनेमाही केलेला आहे. गौरव मोरे यांना अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्ट साठी मराठी सिनेमांसाठी तसेच हिंदी सिनेमांसाठी ही कामाच्या ऑफर्स येत आहेत.

Gaurav more income

गौरव मोरे हे महाराष्ट्राची हस्याजत्रा या शोमधील एका एपिसोड साठी ३५००० पर्यंत पैसे घेतात.

Gaurav more instagram account

गौरव मोरे instagram account – im_gaurav_more20

गौरव मोरे यांच्या instagram account वरती 4 लाखाहून जास्त followers आहेत. गौरव मोरे यांना महाराष्ट्रातून व महाराष्ट्रा बाहेरून खूप प्रेम मिळाले आहे. इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गौरव मोरे अनेक लोकांशी जोडले गेलेले आहेत. या प्लॅटफॉर्मवर ते आपले कामाबाबत चे फोटोज तसेच आपले दैनंदिन जीवनातील फोटोज , व्हिडिओज स्पेशल डेज असे फोटोज व व्हिडिओज शेअर करत असतात. या माध्यमातून ते आपल्या फॉलोवर्स सोबत जोडले गेलेले आहेत.

हेही वाचा – Shiv thakare biography in marathi / मराठी माणूस शिव ठाकरे यांचा जीवनप्रवास.

हेही वाचा – Sanju rathod biography in marathi / संजू राठोड बायोग्राफी.

हेही वाचा – Saurabh bhosale biography in marathi /सौरभ भोसले जीवनप्रवास .