Gautami patil biography/ गौतमी पाटील बायोग्राफी

Gautami patil/ गौतमी पाटील चा जीवनप्रवास

Gautami patil biography- आपल्या लावणीच्या ठेक्यावर सगळ्या महाराष्ट्राला नाचणारी गौतमी पाटील तर तुम्हाला माहीत असेलच. आपल्या लावणीच्या कलेने अख्ख्या महाराष्ट्रातील मुलेच नाही तर मुली व महिलांना गौतमी पाटील ने भुरळ घातली आहे. एक Back dancer म्हणून आपल्या करीअरची सुरुवात करणारी गौतमी पाटील Maharashtra’s dancing queen कशी झाली गौतमी पाटील चा प्रवास आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

About the Gautami patil

Gautami patil biography

गौतमी पाटील चे खरे नाव वैष्णवीदेवी नेरपगारे पाटील हे आहे. गौतमी पाटील यांचे शिक्षण आठवीपर्यंत झालेले आहे. गौतमी पाटील हे मुळची खेडा शिंद या गावची आहे.

Gautami patil age

गौतमी पाटील 4 फेब्रुवारी 1996 साली जन्माला आली. गौतमी पाटील ही 27 वर्षाची आहे.

Gautami patil dance currier

Gautami patil biography

गौतमी पाटील हे लहान असताना तिच्या वडिलांनी तिला व तिच्या आईला सोडले. त्यानंतर त्या दोघी गौतमीच्या आईच्या वडिलांकडे राहू लागल्या. गौतमी आठवीत असताना त्या दोघी पुण्यात आल्या आपल्या आई-वडिलांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. पण गौतमी पाटील चे वडील यांना दारूचे व्यसन होते. ते गौतमीच्या आईला मारहाण करायचे. त्यांची कधी पटले नाही. गौतमी ची आई ही लहान मोठी कामे करायची. वा आपले घर सांभाळायचे. यातूनच गौतमी चे शिक्षणही करत होती. गौतमी आठवीत असताना गौतमीच्या आईचा अपघात झाला. त्यानंतर घरातील परिस्थिती खूप खालावली. घरातील खर्च आईचे आजारपण यामुळे घरात पैशाची चणचण भासू लागली. त्यामुळे गौतमी ने घराची जबाबदारी स्वतःवर घ्यायचा निर्णय घेतला.

Gautami patil dancer

गौतमीला लहानपणापासूनच नृत्य करण्याची आवड होती. ती लहानपणापासून नृत्याचे प्रशिक्षण घेत होते. गौतमी ने लावणी करून आपले घर सांभाळण्याचा निर्णय घेतला व लावणी तर आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला. यालाच तिने आपले पैसे मिळवण्याचे साधन बनवले.

Dancer to maharashtra’s dancing queen

गौतमी पाटील हिने अकलूज येथील लावणी महोत्सवात पहिल्यांदा सहभाग घेतला. तिथे तिला ₹500 मानधन मिळाले. या क्षेत्रातील नवीन असल्याने सुरुवातीला तिला बॅक डांसर म्हणून काम करावे लागत होते. त्यानंतर तिने आपल्या लावणीच्या अदाकारीने गाडीची लावणी कलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळवली. यासाठी गौतमी पाटील येणे लहान वयात खूप मेहनत घेतली व आघाडीची लावणी सम्राज्ञी हा मान मिळवला. यानंतर गौतमी पाटील ला अनेक लावणी कार्यक्रमाच्या सुपाऱ्या मिळत गेल्या. तीला वेगवेगळ्या शहरातून वेगवेगळ्या गावातून कार्यक्रमाच्या सुपाऱ्या मिळू लागल्या. संपूर्ण महाराष्ट्रातून गौतमी पाटीलला भरभरून प्रेम मिळू लागले.

Gautami patil instagram account

गौतमी पाटील हिने आपल्याला लावणीचे व्हिडिओ @official_gautami941_ या इंस्टाग्राम अकाउंट वर टाकण्यास सुरुवात केली. सोशल मीडियातही तिच्या अदाकारीची लोकांना भुरळ पडत गेली. तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती 3 लाखापेक्षाही जास्त फॉलोवर्स आहेत. यातून ती एक सक्सेसफुल इंस्टाग्राम इन फ्लॉवर बनली. यानंतर गौतमी पाटील चे विश्वच बदलून गेले. हाती खूप लोकप्रिय बनू लागली.

अशाच एका डान्स शोमध्ये गौतमी पाटील वरती अश्शील Dance केल्याची टीका झाली होती. त्यावेळी गौतमी ने सांगितले की टेन्स शोदरम्यान एकसारखी लावणी चालत नाही. त्यामध्ये DJ च्या गाण्यावरही डान्स करावा लागतो. तरीही गौतमी ने परत असला प्रकार होणार नाही व लावणी चा अपमान होणार नाही असे सांगितले.

Gautami patil changing video viral

पुणे येथील एका स्टेजवर च्या वेळी गौतमी पाटील चा कपडे बदलताना चा व्हिडिओ (Gautami patil viral video) केला गेला. व तो व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. गौतमी ने खूप त्रास सहन केला. गौतमी पाटील ची खूप बदनामी करण्यात आली. गौतमी पाटील ची वाढती लोकप्रियता बघून तिला बदनाम करण्यासाठीच असा घाणेरडा प्रकार करण्यात आला. अशा बिकट परिस्थितीत आहे गौतमी ने आपली जिद्द सोडली नाही व या सगळ्या गोष्टींना गौतमी पाटील खूप हिमतीने सामोरे गेली. यावेळी गौतमी पाटील हिला खूप मानसिक त्रास सहन करावा लागला. गौतमी पाटील चा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला. समाजासमोर तिची खूप बदनामी झाली. यावेळी गौतमी पाटील हिने कोणताही चुकीचा निर्णय न घेता पोलिसांकडून मदत घेतली. यानंतर गौतमी पाटील हिने आपल्या कलेच्या व प्रेमळ स्वभावाच्या जोरावर पुन्हा महाराष्ट्रातील लोकांच्या मनात घर केले. व पुन्हा आपले स्थान निर्माण केले.

Gautami patil dance fees

गौतमी पाटील हिचा स्वतःचा लावणी चा डान्स ग्रुप आहे. गौतमी पाटील ही एका स्टेज डान्स शो साठी दीड ते दोन लाख रुपये एवढी fees घेते. हे मानधन गौतमी पाटील च्या पूर्ण ग्रुप चे मानधन आहे. व त्यात पूर्ण ग्रुप चा खर्चही घेतला जातो.

गौतमी पाटील ही खूप लहान वयातच अनेक संकटांना सामोरे गेली आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने आपले नाव कमावले आहे. तिच्यावरती अश्शील dance केल्याची टीका करण्यात आली. ती वादाच्या कचाट्यात अडकली गेली. तिचा अश्शील video viral करण्यात आला. समाज्यासमोर तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला. अशा परिस्थितीतही न डगमगता न खचता गौतमी पाटील हिने आपला प्रवास चालूच ठेवला. तिच्या प्रेमाळ स्वभावामुळे तिने महाराष्ट्रातील बंधू भगिनी व महिलांना आपलेसे केले.

Education of gautami patil / Gautami patil biography

आपले शिक्षण खूप कमी झाले आहे. हे गौतमी पाटील मान्य करते. शिक्षण जरी कमी झाले असले तरी ती आपल्या कलेचा आदर करते. व समाजात गौतमी पाटील हिने आपले स्थान व ओळख निर्माण केली आहे.

आपले वय कितीही लहान असले तरी जिद्द जर मोठी असेल तर कोणतेच संकट आपल्याला पुढे जाण्यासाठी अडवू शकत नाही. जिद्दीने व चिकाटीने जर आपण मेहनत करत राहिलो तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते. त्यामुळे कितीही संकट आली तरी आपले प्रयत्न सोडू नयेत व जिद्दीने काम करत राहावे. ही शिकवण आपल्याला गौतमी पाटील हिच्या कथेतून मिळते.

हेही वाचा – Royal the group of business/ abhi gaikwad