Jui gadkari biography in marathi / जुई गडकरी यांचा जीवनप्रवास-
पुढचं पाऊल या मराठी टेलिव्हिजन मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली कल्याणी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गायकवाड यांच्या बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
मराठी सिनेमा सृष्टी हे क्षेत्र खूप स्पर्धात्मक झाले आहे. या क्षेत्रात काम मिळून स्वतःचे स्थान निर्माण करणे व ते टिकवून ठेवणे खूपच अवघड झाले आहे. या क्षेत्रात तेच टिकून राहतात जे दिवस रात्र मेहनत करतात.व कष्ट करून स्वत्ताचे स्थान भक्कम करतात. याच सिनेमा सृष्टीत कष्ट करून आपले स्थान भक्कम करणारा सितारा म्हणजेच जुई गडकरी यांचा जीवनप्रवास आपण पाहणार आहोत.
स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवर 2022 मध्ये चालू झालेली मराठी मालिका ठरलं तर मग यातील सावलीची भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री जुई गडकरी खूप झोतात येत आहे. याआधी जुई गडकरी यांनी मराठी सिनेसृष्टीतून तीन वर्षाचा ब्रेक घेतला होता. तीन वर्षात जुनी गडकरी यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांचा हा प्रवास खरच खूप खडतर आहे. आज आपण जुई गडकरी यांचा जीवन प्रवास पाहणार आहोत.
Jui gadkari biography in marathi
Jui gadkari age
जुई गडकरी यांचा जन्म ८ जुलै १९८८ साली कर्जत , महाराष्ट्र येथे झाला. जुई गडकरी यांच्या वडिलांचे नाव नितीन गडकरी हे आहे. यांचे वडील MTNL मध्ये काम करतात व ते नाटककार ही आहेत. जुई गडकरी या 36 वर्षाच्या आहेत.
Jui gadkari family
जुई गडकरी यांचे बालपण कर्जत येथे खूप छान गेले. त्यांचे कुटुंब एकत्र कुटुंब असल्याने त्यांना लहानपणापासून खूप चांगले व प्रेमळ संस्कार झाले आहेत. यानंतर जुई गडकरी या महाविद्यालयीन शिक्षणासाठी उल्हासनगर येथे त्यांच्या आत्या कडे राहू लागल्या. उल्हासनगर येथिल CHM महाविद्यायातून शिक्षण घेतले.यानंतर जुई गडकरी यांनी मास मिडिया मधून पदवी घेतली.सोबतच जुई यांनी मार्केटिंग मध्ये MBA केले असून जाहिरात आणि पीआर मध्ये पी.जी केले आहे.यानंतर जुई गडकरी वाहिनीमध्ये सहाय्यक नोकरी करू लागल्या.
2009 साली जुई गडकरी आपले शिक्षण घेत असताना त्या आपल्या एका मैत्रिणीसोबत N.D स्टुडीओमध्ये गेल्या होत्या. जुई गडकरी यांनी अभिनय क्षेत्रात येण्याचा कधीच विचार केला नव्हता. मैत्रिणी सोबत ऑडिशन ला गेल्यानंतर तेथे त्यांनाही ऑडिशन देण्यास सांगितले. व त्यांनी ते ऑडिशन दिले. या ऑडिशनमध्ये जुई गडकरी यांना निवडण्यात आले. हे ऑडिशन बाजीराव मस्तानी या मालिकेतील चंदा या भूमिकेसाठी होते. जय गडकरी यांनी ही ऑफर स्वीकारली व यानंतर जुई गडकरी यांचा सिनी सृष्टीतील प्रवासाला सुरुवात झाली. अनेक कामाच्या संधी येऊ लागल्या. व जुई गडकरी आपल्या कामातून स्वतःला सिद्धही करू लागल्या.
Jui gadkari relationship
यानंतर लगेचच जुई गडकरी यांनी माझ्या प्रियाला प्रीत कळेना या मराठी मालिकेत काम केले. तसेच पाठोपाठ तुजविण सख्या रे, पुढचं पाऊल, सरस्वती, बिग बॉस सीजन 1, वर्तुळ, ठरलं तर मग अशा अनेक मराठी मालिकेत काम केले. पण जुई गडकरी यांना खरी ओळख मिळाली ती पुढचं पाऊल या मालिकेतील कल्याण या भूमिकेमुळे. या भूमिकेमुळे जुई गडकरी या महाराष्ट्रातील घराघरात पोहोचल्या. दरम्यानच्या काळात जुई गडकरी यांनी आपले शिक्षणही चालू ठेवले. जुई गडकरी शिक्षणासोबतच कामही करत असत. या दोन्ही गोष्टी सोबत सांभाळताना जुई गडकरी यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. पण तरीही जुई गडकरी यांनी मराठी सिनेसृष्टीत आपले स्थान टिकवून ठेवले. याच काळात जुई गडकरी हे पुढचं पाऊल या मालिकेतील प्रसाद लिमये यांच्या सोबत प्रेमसंबंधात होती.
दरम्यानच्या काळात जुई गडकरी यांनी तीन वर्षे या क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. या काळात जुई गडकरी यांची तब्येत खूप खालावली होती. जुई गडकरी यांना प्रोलाक्टीनोमा नामक एक आजार आहे. तसेच जुई गडकरी यांना संधिवाताचा ही त्रास आहे. जुई गडकरी यांच्या प्रोलाक्टीनोमा या आजाराचे निदान अनेक वर्ष झाले नाही. जुई गडकरी यांना अनेक शारीरिक समस्या जाणवायच्या. त्यांनी अनेक वर्ष शारीरिक त्रास सहन केला आहे. जुई गडकरी यांनी या काळात अनेक अडचणींचा सामना केला आहे. हा काळ असा होता की जुई गडकरी यांनी जगण्याची उमेद पूर्णपणे सोडली होती. या काळात शारीरिक त्रासावर मानसिक त्रासही जुई गडकरी यांना सहन करावा लागला. जुई गडकरी यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या परिवाराने व मित्रमंडळींनी खूप प्रयत्न केले. या अवस्थेतून सुई गडकरी बाहेर पडल्यावर त्यांनी ठरलं तर मग या मालिकेतून पुन्हा सेमी सृष्टीत कम बॅक केले.
स्तर प्रवाह या वाहिनीवरील 2023 रोजी सुरू झालेली मालिका ठरलं तर मग या मालिकेला चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळत आहे. मालिकेतील जुई गडकरी यांनी साकारलेली सायली या भूमिकेला खूप प्रेम मिळत आहे. या मालिकेतील कथा रंजक असल्यामुळे ही मालिका खूप उत्साहाने पाहिली जात आहे. या मालिकेतील जुई गडकरी यांनी स्वतःला सिद्ध करून प्रेक्षकांच्या मनात अजून भक्कम स्थान निर्माण केले आहे. या मालिकेमुळे जी गडकरी यांनी साकारलेली सायली ही भूमिका प्रचंड झोतात आहे.
जय गडकरी यांनी सुरुवातीपासूनच आपल्या कामाच्या प्रती प्रेमळ व प्रामाणिक भावना ठेवली. जुई गडकरी यांच्या प्रवासात अनेक अडथळे आले. जुई गडकरी यांना अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागले. याबरोबरच त्यांना मानसिक त्रासही खूप मोठ्या प्रमाणात सहन करावा लागला. अशा परिस्थितीतही त्या डगमगल्या नाहीत व त्यांनी आपल्या आजारावर मात करून परत या सेने सृष्टीत पदार्पण केले. जुई गडकरी यांना आपल्या अथक प्रयत्नांनी व कष्टाने मराठी सिनेसृष्टीत व मराठी मालिकेत आपले एक वेगळे व भक्कम स्थान निर्माण केले आहे. जय गडकरी यांनी आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.
हेही वाचा – Kirti Jadhav Biography Marathi / दर्जा उद्योग समूह संपूर्ण माहिती.
हेही वाचा – Purnbramha restorant biography/ जयंती काठाळे यांचा जीवनप्रवास.
हेही वाचा – प्रतिक्षा थोरात बायोग्राफी/PRATIKSHA THORAT BIOGRAPHY
Jui gadkari instagram account
jui gadkari – juigadkariofficial
ठरलं तर मग
Jui gadkari biography in marathi