Lavni king Ashish patil Biography / आशिष पाटील यांचा जीवनप्रवास.

Lavni king ashish patil

आत्महत्येचा प्रयत्न ते लावणी किंग पर्यंतचा जीवनप्रवास –

Ashish patil Biography / लावणी किंग आशिष पाटील यांचा जीवनप्रवास – एखाद्या क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणे ही काही छोटी गोष्ट नाही. पर्यंतचा प्रवास हा थक्क करणारा असतो. प्रत्येकाचा प्रवास वेगवेगळा असतो. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात. तसेच प्रत्येकाचे कष्टही वेगवेगळे असतात. आज आपण लावणी किंग, सेलिब्रिटी, कोरिओग्राफर, आपल्या लावणीच्या स्टेप्स वर थीरकायला लावणारा लावणी कलाकार आशिष पाटील यांचा थक्क करणारा प्रवास पाहणार आहोत.

Ashish patil’s ‘kalangan dance studio’

कलांगण स्टुडिओ

आशिष पाटील हे नाव लावणी कलावंतांसाठी काही नवीन नाही. आशिष पाटील यांची मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत लावणी किंग या नावाने ओळख आहे. आशिष पाटील यांनी मराठीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीला ही आपल्या लावणीच्या कौशल्याने मंत्रमुग्ध केले आहे. तसेच आशिष पाटील यांनी अनेक वेगवेगळ्या चित्रपटात लावणीचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. आशिष पाटील यांनी अनेक रियालिटी शोज मध्ये प्रेक्षकांची भूमिकाही बजावली आहे. नुकतेच आशिष पाटील यांनी कलांगण हा स्वतःचा डान्स स्टुडिओ चालू केला आहे. आज आपण एका पुरुषाचा लावणीतील थक्क करणारा प्रवास पाहणार आहोत.

आशिष यांना लहानपणापासूनच नृत्य करण्याची खूप आवड होती. आशिष पाटील यांचे बालपण खूप खडतर होते. आशिष पाटील यांना मित्र-मैत्रिणी नव्हत्या. त्यांना शाळेत चिडवले जायचे की ते मुलींसारखे वागतात, मुलींसारखे बोलतात. आशिष पाटील यांना खूप हिणवले जात होते. आशिष पाटील यांना समाजातही नाकारले जायचे. आशिष पाटील यांना वडिलांचाही सपोर्ट मिळाला नाही. त्यांच्या वडिलांचा नृत्य करण्यास नकार होता. आशिष पाटील यांना लहान वयात खूप त्रास सहन करावा लागला. आशिष पाटील सातवीत असताना त्यांना त्यांच्या वडिलांनी घराबाहेरही काढले होते. अशा वातावरणातही आशिष पाटील यांच्या आईने त्यांना खूप सपोर्ट केला. आशिष पाटील यांनी इयत्ता आठवीत असताना पहिल्यांदाआत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आशिष पाटील जेव्हा कॉलेजला जायचे घाणेरडा नजरेने पाहिले जायचे. त्यांना खूप घाण नावाने बोलावले जायचे. आशिष पाटील यांना कॉलेजमध्ये नाचा व अशा अनेक टोपण नावाने बोलावले जायचे. या काळातही आशिष पाटील यांनी दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आशिष पाटील यांनी तीन वेळा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

About the ashish patil

आशिष पाटील हे खूप एकटे राहायचे. त्यांना लहानपणापासूनच कोण मित्र-मैत्रिणी नव्हत्या. त्यामुळे त्यांनी लहानपणापासूनच नृत्यांमध्ये स्वतःला सोपवून दिले. ज्यावेळी आशिष पाटील यांनी लावणीच्या प्रवासाला सुरुवात केली तो काळ त्यांच्यासाठी खूप खडतर प्रवास होता. आशिष पाटील यांना या प्रवासात खूप अडथळे आले. एक पुरुष नऊवारी साडी नेसून लावणी करतो ही गोष्ट समाज मान्य करत नसे. साडी नेसून स्त्री पात्र करणाऱ्या पुरुषाकडे खूप वेगळ्या व घाणेरड्या नजरेने पाहिले जायचे. अनेक वेळा स्त्री पात्र करणाऱ्या पुरुषाला घाणेरडा स्पर्श केला जायचा. आशिष पाटील यांनी अनेकदा हा स्पर्श अनुभवला आहे. समाजातील लोकांनी आशिष पाटील यांना खूप त्रास दिला. समाज त्यांना स्वीकारण्यास तयार नव्हता. अशा परिस्थितीतही आशिष पाटील यांनी माघार घेतली नाही.

Positive point of view

वाईट काळात, वाईट परिस्थितीत आशिष पाटील हे माघार घेत नव्हते. आशिष पाटील यांनी खूप मेहनत केली. खूप कष्ट केले. आशिष पाटील यांनी स्वतःला लावणी झोकून दिले. ते पूर्णपणे लावण्याच्या आधीन झाले. त्यांनी समाजाचा विचार करणं बंद केलं. आशिष पाटील यांनी आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा विडा उचलला. आशिष पाटील हे प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहू लागले. आशिष पाटील यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला.

Lavni king ashish patil

आशिष पाटील वेगवेगळ्या लावणी स्पर्धेत सहभागी होऊ लागले. आशिष पाटील लावणी करताना स्वतःला त्यात झोकून देऊ लागले. हळूहळू लावणी कलावंतांना आशिष पाटील यांच्यातील कला दिसू लागली. आशिष पाटील प्रत्येक लावणीत, लावणीतील प्रत्येक स्टेप खूप चांगल्या पद्धतीने सादर करायचे. त्यांच्या कष्टाने आशिष पाटील हे नाव फेमस होऊ लागले. या नावाची वेगळी ओळख निर्माण होऊ लागली.

यानंतर आशिष पाटील यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. आशिष पाटील यांनी लावणी शिकण्यासाठी कधीच कोणता क्लास लावला नाही. कधीच कोणाकडून धडे घेतले नाहीत. त्यांनी त्यांच्या आईकडून ही कला आत्मसात केली. ते अनेक वेगवेगळ्या रियालिटी शोज मध्ये भाग घेऊ लागले. त्यानंतर आशिष पाटील हे अनेक रियालिटी शोचे परीक्षक म्हणून काम करू लागले. आशिष पाटील यांनी अनेक हिंदी-मराठी लावण्यांचे दिग्दर्शन केले आहे. आज आशिष पाटील हे नाव झाली आहे. आपल्या वाईट काळात ठाम उभे राहून मेहनत करून कष्ट घेऊन आशिष पाटील यांनी आपली परिस्थिती बदलली. आशिष पाटील यांनी कारण सोबतही काम केले आहे. आशिष पाटील यांना लावणी विश्वात लावणी किंग म्हणून ओळखले जाऊ लागले. आशिष पाटील यांचा नाच्या पासूनचा ते लावणी किंग पर्यंतचा प्रवास खरच खूप खडतर होता. आशिष पाटील यांचा प्रवास थक्क करणारा आहे. आशिष पाटील यांनी आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून आपले आयुष्य सकारात्मक केले आहे. आज आशिष पाटील हे खूप यशस्वी आहेत. या यशामागे आशिष पाटील यांचा जवळजवळ 18 वर्षाचा प्रवास आहे. हा प्रवास थक्क करणारा असून खूप काही शिकवणार आहे.

Ashish patil instagram account

ashishpatil_the_lavniking

आशिष पाटील लावणी

हेही वाचा – Fun with prasad’ Biography marathi / प्रसाद गेंगजे यांचा जीवनप्रवास.

हेही वाचा – Tanmay patekar biography / तन्मय पाटेकर यांचा जीवनप्रवास.

हेही वाचा – Vishvas nangrepatil biography marathi / विश्वास नांगरेपाटील जीवनप्रवास