Madhurasrecipe in marathi story/मधुरा यांचा न ऐकलेला जीवनप्रवास.

आपल्या सर्वांना नवनवीन रेसिपी शिकवून यशस्वी Youtuber झालेल्या मधुरा बाचल यांचा जीवनप्रवास पहा. मधुरा बाचल यांनी युट्युब channel पासून आपल्या करीअरची सुरुवात केली. व यातूनच त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. मधुराज रेसिपी या युट्यूब channel मधील मधुरा बाचल यांना आज प्रत्तेक महिला ओळखत आहे. यांचाच आज आपण न पाहिलेला व न ऐकलेला युट्यूब चा प्रवास या लेखामधून आपण पाहणार आहोत. हा लेख प्रत्तेक स्त्री साठी एक प्रेरणा देणारा लेख ठरणार आहे. त्यामुळे प्रत्तेक स्त्री ने हा लेख संपूर्ण वाचा.

Madhurasrecipe in marathi story

Madhurasrecipe in marathi story- मधुराज रेसिपी मराठी हे पहिले मराठी यूट्यूब Channel आहे. ज्याने फक्त पाककृतीचा व्हिडिओ वरती चार दशलक्ष Subscribers मिळवले आहेत. या चैनल वर 3000 पेक्षा जास्त पाककृती व्हिडिओज आहेत.

मधुराज रेसिपी मराठी हे Channel मधुरा बाचल हिने 2009 मध्ये चालू केले. गेल्या काही वर्षात मधुराने फक्त मराठी यूट्यूब Channel वर चार दशलक्ष हून अधिक Subscribers मिळवले. तसेच ती अनेक सोशल प्लॅटफॉर्म वरती ऍक्टिव्ह असते. मधुराचे स्वतःचे वेगवेगळ्या मसाल्याचे उत्पादने आहेत. तसेच तिचे अनेक रेसिपी बुकही उपलब्ध आहेत. मधुराने अनेक पुरस्कार ही मिळवले आहेत.

Madhura Bachal Education

मधुरा बाचल यांचे शिक्षण

मधुरा बाचल ही इयत्ता दहावीत असताना त्यांना बेघर व्हावे लागले. त्यांच्या घरची परिस्थिती खूप वाईट होती. मधुरा हिने सतराव्या वर्षी घराची जबाबदारी घेतली. मधुरा बाचल हिला दहावी नंतर सायन्स साईट मध्ये ऍडमिशन घ्यायचे होते पण घरची परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी कॉमर्स साईडला ऍडमिशन घेतले.

मधुराज रेसिपी मराठी यांचा न ऐकलेला जीवन प्रवास .

12 वी नंतर त्यांनी जॉब करण्याचा निर्णय घेतला. त्या कॉलेज व जॉब एकत्र करू लागल्या. सकाळी सात ते नऊ कॉलेज व नऊ ते सहा जॉब असं त्यांचं रुटीन होते. 6 नंतरही थोडेफार पैसे मिळावे या हेतूने त्या रांगोळी व मेहंदी याच्या ऑर्डर्स घेत होत्या. व त्यातून पैसे मिळवत होत्या. अशातूनच त्यांनी आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले व त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर त्यांना एका खूप मोठ्या मल्टि नॅशनल कंपनी मध्ये जॉब मिळाला व त्यांना चांगले पेमेंट मिळू लागले.

Madhurasrecipe Youtube Journey

लग्नानंतर त्यांनी 2007 साली ब्लॉगिंग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिने खूप मेहनत केली. ब्लॉगिंग नंतर त्यांनी यूट्यूब वरती व्हिडिओ टाकण्यास सुरुवात केली. यूट्यूब वरती मधुराज रेसिपी नावाने चैनल सुरू केले. या वेळी मधुरा बाचल यांनी खूप मेहनत केली. यूट्यूब मुळे मधुराज रेसिपी मराठी हे चैनल खूप फेमस झाले. व त्यातून मधुराची एक स्वतःची ओळख निर्माण झाली. मधुरा ही प्रत्येक स्त्रीसाठी जी घरातून बाहेर पडू शकत नाही किंवा ज्या महिलांना वाटते की घराच्या जबाबदारीतून त्यांचं करिअर करू शकणार नाहीत अशा महिलांसाठी एक Inspiration आहे.

मधुरा बाचल यांनी सुरुवातीला फक्त मराठीतूनच व्हिडिओ करण्यास सुरुवात केली होती. मधुरा वाचल्या मराठी भाषेतून वेगवेगळ्या पदार्थांची रेसिपी यूट्यूब च्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवत असत. त्यांची जेवण बनवण्याची एक खास पद्धत लोकांना व खास करून स्त्रियांना खूप जास्त प्रमाणात आवडू लागली. यानंतर मधुरा बाचल यांनी इंग्रजी भाषेमधून ही व्हिडिओ करण्यास सुरुवात केली. मधुरा वाचल यांना फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर भारतातून व भारताबाहेरून आहे प्रसिद्धी मिळू लागली. यातून त्यांनी स्वतःचा मसाल्याचा व्यवसाय चालू केला. त्या स्वतः घरात वेगवेगळ्या पदार्थांपासून अनेक प्रकारचे उत्कृष्ट मसाले बनवतात. या मसाल्याच्या वेगळ्या चवीमुळे हे मसाले ही लोकांना खूप जास्त प्रमाणात आवडू लागले. व अशा पद्धतीने मधुरा बाचल यांनी घरातून फक्त यूट्यूब च्या सहाय्याने आपला एक छोटासा व्यवसाय चालू केला. व यास यू ट्यूब मुळे मधुरा बाचल या आज एक फेमस यू ट्यूब वर व एक खूप मोठ्या उद्योजक बनल्या आहेत.

सुरुवातीला जेव्हा मधुरा बाचल यांनी यूट्यूब वरती व्हिडिओ टाकण्यास सुरू केले तेव्हा त्यांना यू ट्यूब कडून कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नव्हता. त्या फक्त आवड म्हणून यूट्यूब वर व्हिडिओ टाकत असत. पण त्या व्हिडिओला खूप जास्त प्रसिद्धी मिळत गेली. त्यांचे व्हिडिओज खूप जास्त प्रमाणात पाहिले गेले. त्यांच्या व्हिडिओ ना प्रसिद्धी मिळू लागली. त्यांनी बनवलेल्या रेसिपीज लोकांना आवडू लागल्या. त्यांचे जेवण बनवण्याची अनोखी पद्धत लोकांना आवडू लागली. यामुळे त्यांच्या यूट्यूब चैनल वरती सबस्क्राईब ची संख्या वाढू लागली. व यानंतर मधुरा बाचल यांना यूट्यूब कडून पैसे मिळण्यास सुरुवात झाली. यानंतर त्या न चुकता आपले वेगवेगळे पदार्थांच्या रेसिपी चे व्हिडिओज पोस्ट करत असत.

आपल्या यूट्यूब चैनल वरती व्हिडिओ बनवताना मधुरा बाचल या जेवण करताना कोण कोणती काळजी घ्यावी तसेच अनेक छोट्या-छोट्या टिप्स सांगत असत. त्यांनी सांगितलेल्या या छोट्या छोट्या टिप्स दैनंदिन जीवनात व चविष्ट आणि रुचकर जेवण बनवण्यासाठी उपयोगी ठरत. तसेच एखाद्या पदार्थाचे व त्या पदार्थाच्या रेसिपीचे मधुरा बाचल या आपल्या व्हिडिओ मध्ये उत्तम प्रकारे स्पष्टीकरण देतात. यामुळे व त्यांच्या या स्वभावामुळे त्यांना खूप जास्त प्रमाणात नाव लौकिक मिळाला. व त्यांचे यूट्यूब चैनल वरील व्हिडिओज व्हायरल होऊ लागले.

मधुरा बाचल यांनी घरातूनच फक्त यूट्यूब च्या माध्यमातून स्वतःचे करिअर उत्तम बनवले. याचबरोबर मधुरा बाचल यांनी मसाल्यांचा स्वतःचा व्यवसाय उभा केला. तसेच त्यांनी अनेक वेगवेगळ्या रेसिपी बुक ही लिहिल्या. फक्त घरात राहूनही एक स्त्री आपले करिअर उत्तम करू शकते. व आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू शकते हे मधुरा बाचल यांच्या प्रवासातून आपल्याला पाहायला मिळते.

मधुराज रेसिपी Youtube channel – MadhurasRecipe Marathi

मधुरा बाचल यांचा सविस्तर प्रवास पाहण्यासाठी खालील विडीओ पाहू शकता –

हेहि वाचा – Ashok todmal life story/ अशोक तोडमल जीवनप्रवास

हेही वाचा-Sanju rathod biography in marathi / संजू राठोड बायोग्राफी.

हेही वाचा-किरण गायकवाड यांची बायोग्राफी / kiran Gaikwad Biography in Marathi .