NMD Pvt . Ltd
नवनाथ दरेकर यांचा जीवनप्रवास / Owner of NMD Pvt . Ltd Success Story –
आजचे युग हे टेक्नॉलॉजी चे व डिजिटल युग आहे. आताचे विज्ञान खूप प्रगत झालेले आहे. हे जनरेशन फास्ट जनरेशन आहे. या पिढीचे जीवन खूप स्पर्धात्मक झाले आहे. प्रत्येक क्षेत्रात दररोज काही ना काही शोध लागतात. प्रत्येक क्षेत्रात नवीन काहीतरी घडत असते. रोजच्या घडामोडीत 5G Network , Apps , Data analysisi , Digital marketing या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व आहे. त्यामुळे या क्षेत्रातही खूप करिअरच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या क्षेत्रातही तरुणांसाठी खूप मोठा प्लॅटफॉर्म तयार झाला आहे. फक्त गरज आहे ती चिकाटीने मेहनत करण्याची. याच क्षेत्रात स्वकष्टाने व स्वकर्तुत्वाने स्वतःची छाप उमटवलेले नवनाथ दरेकर यांची आज आपण यशोगाथा पाहणार आहोत.
MBA In dubai university
नवनाथ दरेकर हे मूळ अहमदनगर येथील सामान्य कुटुंबातील आहेत. नवनाथ दरेकर यांनी D.Y. Patil या महाविद्यालयांमधून आपले इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. या दरम्यान नवनाथ दरेकर हे ऑनलाइन फ्रीलान्सर म्हणून काम करू लागले. वेगवेगळ्या वेबसाईटच्या माध्यमातून व वेगवेगळे ॲप्सच्या माध्यमातून अनेक प्रकारचे प्रोजेक्ट मिळवत असत. हे प्रोजेक्ट पूर्ण करून दिल्यानंतर त्यांना पैसे मिळत असे. हे काम करत असताना त्यांना या कामात भरपूर रस वाढू लागला. नवनाथ दरेकर यांना अनेक प्रकारचे अनुभव येत गेले. या डिजिटल क्षेत्रात कार्यरत असताना त्यांच्या लक्षात असे आले की या क्षेत्रातही शिकण्यासारखे खूप काही आहे. व आपण या क्षेत्रात स्वतःचे करिअर करू शकतो. म्हणून नवनाथ दरेकर यांनी दुबई येथील यूनिवर्सिटी मध्ये या क्षेत्रातील पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. नवनाथ दरेकर यांनी दुबई येथील युनिव्हर्सिटी मध्ये डिजिटल मार्केटिंग ( Digital marketing ) मधून एमबीए ( MBA ) चे शिक्षण पूर्ण केले.
Revamping Business with Modern Marketing
दुबई मधून MBA चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नवनाथ दरेकर हे HOTSTAR या कंपनी मध्ये काम करू लागले. तेथे नवनाथ दरेकर यांनी उत्तम कामगिरी बजावली. कोरोना या जागतिक महामारीच्या वेळी नवनाथ दरेकर हे भारतात परतले. भारतात येऊन नवनाथ दरेकर यांनी पुन्हा फ्रीलान्सिंग करण्यास सुरुवात केली. पण नवनाथ दरेकर यांच्या अनुभव व शिक्षणामुळे त्यांना भारतात खूप जास्त संधी उपलब्ध होऊ लागल्या व मोठे प्रोजेक्ट त्यांना मिळू लागले. हे काम करताना नवनाथ दरेकर यांच्या लक्षात आले कि ते एकटे सर्व प्रोजेक्ट वरती काम करू शकत नाहीत. यावरती पर्याय म्हणून नवनाथ दरेकर यांनी लोकांना Digital marketing , Data analysis , App development , व SEO शिकवण्यास सुरुवात केली. यातूनच NMD Pvt . Ltd या कंपनीची सुरुवात झाली. नवनाथ दरेकर यांनी तरुणांना शिकवण्यासाठी खूप मेहनत घेतली. आपले ज्ञान तरुणांना देण्याचा पूर्ण प्रयत्न त्यांनी केला. याच प्रयत्नातून नवनाथ दरेकर यांनी Revamping Business with Modern Marketing हे पुस्तक लिहिले. तरुण पिढीला त्यांच्या या पुस्तकाचा शिक्षण घेण्यासाठी खूप उपयोग झाला. नवनाथ दरेकर यांच्या NMD Pvt . Ltd या कंपनी मधून जवळ जवळ ५००० पेक्षा जास्त तरुण व तरुणींनी शिक्षण घेतले आहे. तसेच या कंपनीमध्ये नवनाथ दरेकर यांच्या नेतृत्वाखाली ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी कार्यरत आहेत.
IT services & Business Consulting Comapny
नवनाथ दरेकर यांच्या दूरदृष्टीमुळे व त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे NMD Pvt . Ltd या कंपनीला आज आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट वरती काम करण्याची संधी उपलब्ध झाल्या आहेत. NMD Pvt . Ltd हि कंपनी App devlopment , Data analytics , Digital marketing , Game devolapment , किंवा Business Grow करण्यासाठी कार्यरत आहेत.व उत्तम सेवा देत आहेत.
Tycoons of Maharastra 2024
Most popular IT Institute in pune
NMD Pvt . Ltd Turnover
नवनाथ दरेकर यांच्या मेहनतीने व कष्टाने नुकताच नाशिक येथे पार पडलेल्या Tycoons of Maharastra 2024 या पुरस्कार सोहळ्यात NMD Pvt . Ltd या कंपनीला Most popular IT Institute in pune पुरस्कार मिळवला आहे. हे यश नवनाथ दरेकर यांनी कठोर परिश्रम घेऊन मिळवले आहे. नवनाथ दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आज NMD Pvt . Ltd या कंपनीचा टर्नओवर 5.5 कोटी रुपये इतका आहे.
क्षेत्र कोणतेही असो यश मिळवणे इतके सोपे नाही. यश मिळवण्यासाठी व या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी धाडसी निर्णय घेण्याची गरज असते. चिकाटी , परिश्रम व मेहनतीच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतो. तसेच यासाठी योग्य शिक्षणाची सांगड असावी लागते. गरज असते ती योग्य वेळी निर्णय घेण्याची आणि योग्य दिशेने वाटचाल करण्याची.
Official website of NMD Pvt . Ltd
हे हि वाचा – Akash thosar biography in marathi / आकाश ठोसर यांचा जीवनप्रवास .
हे हि वाचा – Jui gadkari biography in marathi / जुई गडकरी यांचा जीवनप्रवास.
हे हि वाचा – Kirti Jadhav Biography Marathi / दर्जा उद्योग समूह संपूर्ण माहिती.