Pragati Sangale Biography In Marathi- प्रगती आणि शरन्या या माय लेकीची जोडीला तुम्ही सोशल मीडिया साईट वरती अनेक वेळा पाहिले असेलच. सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म वरती या दोन्हीचे लाखांमध्ये फॅन फॉलोवर्स आहेत. हि आई आणि मुलीची जोडी सोशल मीडिया साईट वरती अनेक वेगवेगळे व्हिडिओज बनवताना दिसत आहे. प्रगती आई व शरन्या तिची मुलगी आहे. तिच्या सोशल मीडिया साईट वरती हास्य विनोद , रोजच्या आयुष्यातील गोष्टी प्रेरणादायी पोस्ट ही शेअर करत असतात. हा कंटेंट ती मराठी भाषेमध्ये शेअर करत असते. व याच कन्टेन्ट मुळे तिने अनेक मराठी चाहत्यांचे मन जिंकलेली आहेत. तसेच आपल्या कन्टेन्ट मधून प्रगती आणि शरन्या या संस्कृतीचे प्रदर्शन करत असतात. ज्यामध्ये भारतीय सांस्कृतिक , पारंपारिक रीती रिवाज आणि शैक्षणिक विषय यांच्या प्रदर्शनावर भर दिला जातो. या दोघींच्या कन्टेन्ट मधून संस्कृतीचे महत्त्व आणि वैभव लोकांपर्यंत पोहोचवले जात आहे. याचबरोबर प्रगती व शरन्या या मायलेकीची जोडी कौटुंबिक जीवन , लहान मोठ्या घटकांवर आधारित विषय तसेच शैक्षणिक विषय याचबरोबर प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण रिल्स बनवत असतात. प्रगती आणि शरन्या यांच्या रिल्स मधून पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळते. तसेच अनेक लोकांना प्रेरणा देण्याचे कामही प्रगती व शरण्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहेत.
Pragati Sangale –
प्रगती हि एक प्रेरणादायी वक्ता म्हणून ओळखली जाते. याच प्रगतीचा संपूर्ण जीवन प्रवास आपण या लेखामधून पाहणार आहोत. आजपर्यंत अनेक आपण अनेक लोकांची बायोग्राफी पाहिली आहे पण आज आपण या लेखांमधून एका मायलेकीचा जीवन प्रवास पाहणार आहोत.
About The Pragati Sangale –
प्रगती सांगळे या बारामती येथील करावा गस या छोट्याशा गावातील आहेत. प्रगती सांगळे यांचे बालपण अगदी सुखात गेले. प्रगती सांगळे या त्यांच्या आई-वडिलांच्या लाडक्या होत्या तसेच त्यांचा स्वभाव हा हट्टी होता. लहान वयात त्यांना कोणत्या गोष्टीची कमतरता त्यांच्या आई-बाबांनी भासू दिली नाही. तसेच त्यांनी कॉलेज पर्यंतचे आपले आयुष्य खूप चांगल्या व रॉयल पद्धतीने व्यतीत केले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रगती यांनी बारामती येथील शारदा नगर मध्ये कॉलेजला ऍडमिशन घेतले. प्रगती सांगळे यांनी बीबीए ला ऍडमिशन घेतले. पण त्यांना शिक्षणात फारसा रस नव्हता. शिक्षणाव्यतिरिक्त प्रगती सांगळे या इतर गोष्टींसाठी जास्त महत्त्व देत होत्या. उदाहरणार्थ भांडण करणे, मारामारी करणे, वाद घालणे, उचापती करणे अशा पद्धतीने त्या कॉलेजमधील आयुष्य घालवत होत्या. याचाच परिणाम म्हणून शेवटच्या वर्षात त्यांचे दोन विषय बॅक लॉक ला राहिले.
Pragati Sangale Biography In Marathi.
यानंतर त्यांना त्यांच्या मित्र वर्गाकडून माहिती मिळाली की आयसीआयसीआय फाउंडेशन कडून तीन महिन्यांचा कोर्स फ्री मध्ये केला जाऊ शकतो. या कोर्ससाठी त्यांनी पुण्यामध्ये ऍडमिशन घेतले व त्या पुणे येथे जाऊन राहू लागल्या. याच दरम्यान त्यांना त्यांच्या सेल्स टेक्निक मुळे जस्ट डायल सारख्या कंपनीमध्ये टेली कॉलर च्या पोझिशन वर जॉब मिळाला. 2016साली त्यांनी पहिला जॉब जॉईन केला. जॉब जॉईन केल्यानंतर त्या नॉर्मल आयुष्य जगत होत्या.
Pragati Sharanya Image –
प्रगती सांगळे यांनी एक गोष्ट ठरवली होती की आपल्या आई-वडिलांना मान खाली घालावी लागेल अशी कोणतीही गोष्ट करायची नाही. ते म्हणतील तीच गोष्ट करायची असं त्याने ठरवले होते. थ्रोट इन्फेक्शन झाले यामुळे त्यांना जस्ट डायल चा जॉब सोडावा लागला. यानंतर त्यांनी पुणे पोलीस मुख्यालयात एका ट्रस्ट द्वारे काउंसलर म्हणून जॉब करण्यास सुरुवात केली. तिथे त्यांनी जवळजवळ दीड वर्षे कौन्सिलर म्हणून काम केले.
या दरम्यान प्रगती सांगळे यांनी टिक टोक वरती व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. टिकतोक च्या माध्यमातून त्या आपली मतं आपल्या आवाजात मांडण्यास सुरुवात केली. त्यांना त्यांच्या विचारांमुळे व आवाजामुळे भरपूर प्रसिद्धी मिळाली. त्यांचे फॅन फॉलोवर्स वाढत गेले. त्या एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. टिकतोक मुळे त्या फेमस झाल्या.
याच काळात 2019 साली सत्यजित दादा तांबे यांनी राबवलेली संकल्पना म्हणजेच मी महाराष्ट्राचा एक दिवसाचा मुख्यमंत्री या संकल्पनेतून हा लाख लोकांनी मत दिल्यानंतर प्रगती सांगळे यांची एक दिवस मुख्यमंत्री बनण्यासाठी निवड झाली. त्यांना मुंबईमधील विधानसभेमध्ये जाऊन स्वतःची मतं मांडण्याची संधी मिळाली . तसेच राजस्थानचे मुख्यमंत्री होते अशोक गेहलोट यांच्यासोबत त्यांच्या मुख्यमंत्री निवासा ठिकाणी जाऊन काम करण्याची आणि तिथे राहण्याची संधी प्रगती सांगळे यांना मिळाली होती. तसेच तेथील खेळ मंत्री अशोक जी चांदना सर दिवसाचं कामकाज करण्याची संधी मिळाली होती. या सगळ्यांमुळे प्रगती सांगळे या खूप फेमस झाल्या. टीव्ही वरती, न्यूज मध्ये, पेपर मध्ये, अशा अनेक ठिकाणी त्यांची माहिती व फोटो येऊ लागले. 2019 साली प्रगती सांगळे यांनी एक सेलिब्रिटी व एक आदर्श व्यक्तिमत्व अशी इमेज क्रिएट केली होती.
प्रगती सांगळे यांनी आपल्या आई-वडिलांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. आणि हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा चुकीचा निर्णय ठरला. लग्नानंतर त्यांनी अनेक गोष्टींचा सामना केला. त्यांनी ज्या व्यक्तीला निवडले होते ती त्यांची चुकीची निवड होती. लग्नानंतर प्रगती सांगळे यांनी खूप त्रास सहन केला. त्यांचा नवरा त्यांना मारहाण करत. एक म्हणून जी मुलगी होती तिच्याकडे आपल्या आई-वडिलांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी साधा की पॅड चा मोबाईलही त्यावेळी नव्हता. प्रगती आणि अनेक वेळा आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. पण देवाच्या कृपेने त्या बचावल्या .अशातच त्यांना त्या गरोदर असल्याची बातमी मिळाली. प्रगती सांगळे त्यावेळी खूप वाईट परिस्थितीत होत्या. अनेकांनी त्यांना सांगितले की तू या मुलाला जन्म देऊ नकोस. पण त्यांनी आपला निर्णय बदलला नाही व त्या बाळाला आपल्या पोटात वाढवले. त्यानंतर त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे नाव प्रगती आणि शरन्या असे ठेवले. भरपूर गोष्टी व खूप त्रास सहन केल्यानंतर प्रगती यांनी आपली मुलगी दीड वर्षाची असताना घर सोडण्याचा निर्णय घेतला. व त्या आपल्या मुलीसोबत घराबाहेर पडल्या. अशा परिस्थितीत प्रगती यांना त्यांच्या घरच्यांनी ही साथ दिली नाही. त्यांच्या आई बाबांनीही त्यांना मदत केली नाही . प्रगती या आपल्या मुलगी शरन्या सोबत एकट्या राहू लागल्या. आपल्या मुलीच्या पायातील पैंजण मोडून थोड्याफार पैशाची जोडणा केली. व त्यातून नवीन आयुष्याची सुरुवात केली.
या काळात त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी त्यांना खूप मदत केली. प्रगती या आपल्या एका मित्राच्या आयडी वरून टोमॅटो मध्ये डिलिव्हरी चे काम करू लागल्या. काम करताना त्या शरण्या ला आपल्याजवळ बेबी कॅरियर मध्ये ठेवून काम करत असत. प्रगती यांचे सुरुवातीचे एक वर्ष खूप कठीण परिस्थितीमध्ये गेले. पण त्या जिद्दीने काम करत व आपल्या मुलीचा सांभाळ करत. प्रगती सांगळे यांनी पुन्हा आपला सोशल मिडिया चा प्रवास चालू केला. व स्वत्ताच अस्तित्व निर्माण केल. आज त्या अनेक लोकांना प्रोत्साहन देतात. सोशल मिडिया च्या साईट वर प्रगती सांगळे यांचे लाखोंमध्ये फोल्लोवर्स आहेत.
Pragati Sangale Biography In Marathi.
Pragati Sangale Instagram Id
हेही वाचा – हिंदवी पाटील यांचा जीवनप्रवास / Hindavi Patil Biography In Marathi.
हेही वाचा – रविराज साबळे पाटील जीवनप्रवास / Raviraj Sable Patil Biography.