महाराष्ट्राची हस्याजात्रा फेम पृथ्विक प्रताप – Pruthvik pratap biography
Pruthvik pratap biography in marathi / पृथ्विक प्रताप यांचा जीवनप्रवास. आजच्या जगात जगण्यासाठी पैसा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट झाली आहे. अन्न वस्त्र निवारा याबरोबरच पैसा ही सुद्धा एक जीवनावश्यक गोष्ट झाली आहे. पैसा मिळवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पर्याय उपलब्ध आहेत. यातीलच एक पर्याय म्हणजे अभिनय क्षेत्र. आपल्या अभिनयाच्या कलेने लोकांचे मनोरंजन करून अनेक तरुण-तरुणी या क्षेत्रात आपले भविष्य उज्वल करत आहेत.
आजच्या काळातील तरुण पिढीला प्रत्येकाला पैसा व प्रसिद्धी हवी असते. अभिनय क्षेत्र हे एक असे क्षेत्र आहे ज्यात पैसा व प्रसिद्धी या दोन्ही गोष्टी आपल्याला मिळू शकतात. यामुळे या क्षेत्रात खूप स्पर्धा आहे. या क्षेत्रात ज्याच्या अंगी कलागुण आहे तसेच जो मेहनतीने व कष्टाने काम करतो तोच यशस्वी होतो. या झटापटीत वर आलेले नाव म्हणजे पृथ्वीक प्रताप होय. आज आपण पृथ्वीक प्रताप यांचा जीवन प्रवास पाहणार आहोत.
About the pruthvik pratap / Pruthvik pratap biography
प्रतीक प्रताप याने अनेक नाटके, मालिका, वेब सिरीज, सोबतच अनेक चित्रपटही केले आहेत. पण पृथ्वी प्रताप या नावाला खरी ओळख मिळाली ती महाराष्ट्राची हास्य जत्रा या महाराष्ट्रातील लोकप्रिय नाटकामुळे. आज आपण पृथ्वी प्रताप यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास पाहणार आहोत.
Pruthvik pratap full name
Pruthvik pratap age
पृथ्वीक प्रताप याचे पूर्ण नाव पृथ्वीक प्रताप कांबळे हे आहे.पृथ्विक यांच्या आईचे नाव जयश्री आहे. तसेच त्यांच्या भावाचे नाव प्रतीक कांबळे हे आहे. पृथ्वी प्रताप हे महाराष्ट्रातील मुंबई येथील असून तीस नोव्हेंबर 1991 चे आहेत.पृथ्विक प्रताप हे 32 वर्षाचे आहेत.
पृथ्विक प्रताप यांचे वडील पृथ्वीक लहान असतानाच कॅन्सर या आजाराने वारले. जयश्री व पृथ्वी आणि प्रतीक हे त्यांच्या मामाकडे म्हणजेच जयश्री यांच्या भावाकडे राहत होते. पृथ्वीक प्रताप यांच्या परिवाराची संपूर्ण जबाबदारी पृथ्वीच्या मामाने घेतली आहे. पृथ्वीक व त्यांचे भाऊ प्रतीक यांच्या शिक्षणापासून ते कपडे शाळेची फी कॉलेजची फी एकूणच संपूर्ण गोष्टी पृथ्वीक चे मामा करत आहेत.
पृथ्विक प्रताप यांच्या आई हि काम करत असत.त्या लवकर उठून घरातील सर्व कामे करत असत.व त्या नंतर त्या Chocolets पॅकिंग करण्याच्या कामाला जात असत. त्या दिवसभर तेथे काम करत व संध्याकाळी येऊन परत घरातील कामे करत. पृथ्वीक प्रताप यांच्या आईने पृथ्वीक आणि त्यांचा मोठा भाऊ प्रतीक यांच्यासाठी खूप कष्ट केले आहे. खूप मेहनत घेऊन त्यांनी या दोघांना लहानाचे मोठे केले आहे.
पृथ्वीक प्रताप यांना लहानपणापासूनच अभिनय करण्याची आवड होती. तसेच पृथ्वीक यांचा मोठा भाऊ प्रतिक हा हि याच क्षेत्रात होता. त्यामुळे पृथ्वीक प्रताप यांनीही हेच क्षेत्र निवडले. पृथ्वीक प्रताप शाळेत असताना व कॉलेजमध्ये असताना वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेत असत. कॉलेजमध्ये असताना पृथ्वी प्रताप यांना आंबट-गोड या मराठी मालिकेसाठी सिलेक्ट करण्यात आले. या मालिकेत पृथ्वीक प्रताप यांना एक छोटासा रोल सादर करण्याची संधी मिळाली. यानंतर पृथ्वीक प्रताप यांना नाईट स्कूल हा एक चित्रपट करायला मिळाला. यानंतर त्यांनी प्यार वाली लव स्टोरी, प्रेमाचे साईड इफेक्ट अशी अनेक नाटके व चित्रपट केले. पण काही वेळानंतर असा काळ आला की पृथ्विक प्रताप यांच्याकडे काहीच काम न्हवते. यानंतर पृथ्विक प्रताप यांनी job करण्याचा निर्णय घेतला. DREAMER SPEAR कंपनीमध्ये पृथ्वीक प्रताप हे मोठमोठ्या कलाकारांचे इंटरव्यू घेण्याचे काम करू लागले. पण या कामात त्यांचे मन रमेना. जवळ जवळ दीड वर्ष पृथ्विक प्रताप यांनी या कंपनीमध्ये काम केले. दीड वर्षानंतर पृथ्विक यांनी job सोडण्याचा निर्णय घेतला.हा निर्णय घेताना पृथ्विक यांना त्यांचे मामा व प्रतिक दादा यांचे खूप मोठे सहकार्य मिळाले. या दोघांनी पृथ्विक यांना उत्तम निर्णय मार्गदर्शन केले.व पृथ्विक प्रताप यांना स्वप्न पूर्ण करण्यासाठी सपोर्ट केला.
Pruthvik pratap movie
यानंतर पृथ्विक प्रताप यांनी पुन्हा अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले.पृथ्विक प्रताप यांनी ‘बॅक बेंचर्स’ या वेब सिरीज साठी ऑडीशन दिले. व त्यांना या वेबसिरीज साठी सिलेकशन करण्यात आले. या वेब सिरीज नंतर पृथ्वीक प्रताप यांनी अनेक मालिका, चित्रपट, वेब सिरीज यामध्ये काम केले. काम करताना पृथ्वीक प्रताप अतिशय मेहनत करत. त्यांनी मेहनतीने व जिद्दीने स्वतःला सिद्ध केले. पृथ्वीक प्रताप दिवसभर उपाशी राहायचे. व तशा अवस्थेत काम करायचे. या काळात पृथ्वीक प्रताप यांच्याकडे पैसे नसायचे. पृथ्वीक प्रताप भरपूर कष्ट करत राहिले. अशातच त्यांना महाराष्ट्राची हास्य जत्रा या महाराष्ट्रातील लोकप्रिय मालिकेसाठी निवड करण्यात आली. या मालिकेमुळे पृथ्वीक प्रताप यांना एक वेगळी मिळाली. महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेत पृथ्वीक प्रताप यांनी आपल्या कलेने महाराष्ट्राला खळखळून हसण्यास भाग पाडले. या मालिकेमुळे पृथ्वी प्रताप यांना खूप प्रसिद्धी मिळाली. याच मालिकेमुळे पृथ्वीक प्रताप या नावाला एक वेगळी ओळख मिळाली.
पृथ्वी प्रताप यांनी आपली परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून मेहनत केली. पृथ्वीक प्रताप यांना आईने केलेल्या कष्टाची परतफेड करायची आहे. पृथ्वीक प्रताप यांना आईसाठी एक घर घ्यायचे आहे. पृथ्वीक त्यांच्या आयुष्यात सर्वात जास्त महत्त्व हे त्यांच्या आईला देतात. पृथ्वीक प्रताप यांच्या यशामागे त्यांच्या आईचा व त्यांच्या कष्टाचा खूप मोठा वाटा आहे.
पृथ्वीक प्रताप यांनी अतोनात कष्ट केले आहेत. आजही पृथ्वीक प्रताप यांना परिस्थितीची जाणीव आहे. ते उत्तम कलाकार आहेत तसेच ते एक उत्तम नागरिकही आहेत. जो मित्र परिवार पृथ्वीक प्रताप यांच्या वाईट काळात सोबत होता तोच मित्र परिवार आज त्यांच्या चांगल्या काळातही सोबत आहे याचे त्यांना अप्रूप वाटते. पृथ्वीक प्रताप यांनी खूप प्रसिद्धी मिळाली. तसेच त्यांनी भरपूर पैसाही मिळाला. आज पृथ्वीक प्रताप हे महाराष्ट्रातील हास्य जत्रा या मालिकेतील एका भागासाठी जवळजवळ 40 ते 50 हजार रुपये घेतात.
Pruthvik pratap instagram account
Pruthvik pratap in maharastrachi hasyajatra
महाराष्ट्राची हस्याजत्रा
हेही वाचा – Lavni king Ashish patil Biography / आशिष पाटील यांचा जीवनप्रवास.
हेही वाचा – Fun with prasad’ Biography marathi / प्रसाद गेंगजे यांचा जीवनप्रवास.
हेही वाचा – Tanmay patekar biography / तन्मय पाटेकर यांचा जीवनप्रवास.