Sanju rathod biography in marathi / संजू राठोड बायोग्राफी.

Sanju rathod biography / संजू राठोड बायोग्राफी.

Sanju rathod biography in marathi – नऊवारी साडी, डोरलं, बुलेट वाली, गुलाबी साडी अशा मराठी गाण्यांवर क्या महाराष्ट्राला नाचवणारा संजू राठोड संगीत प्रेमींना माहीत असेलच. यात संजू राठोडचा संगीतातील प्रवास आज आपण पाहणार आहोत.

Sanju rathod biography in marathi

आपल्या कलेच्या जोरावर व आपल्या मेहनतीने, जिद्दीने सिनेसृष्टीत संजू राठोड ने आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे. सिनेसृष्टीत संजू राठोड ला कोणताही वारसा लाभलेला नाही. संजू राठोड ने अगदी शून्यातून आपल्या या प्रवासाला सुरुवात केली आहे. संजू राठोड ने आतापर्यंत अनेक मराठी हिट गाणी दिली आहेत. जी फक्त महाराष्ट्रात नाही तर भारतातही व भारताबाहेरही फेमस होत आहेत.

Sanju rathod age

संजू राठोड हा १ जुलै २००३ साली जन्माला आला. संजू राठोड हा जळगाव मधील धानवड तांडा येथील छोट्याशा तांड्यातील मुलगा आहे. संजू राठोड ने 10 वी पर्यंतचे शिक्षण होस्टेल मध्ये घेतले. 10वी नंतर संजू ने डिप्लोमा ऍडमिशन घेतले.

Sanju rathod’s girlfriend

डिप्लोमा शिकत असताना संजू हा एका मुलीच्या प्रेमात पडला. तो तिच्यावर खूप प्रेम करायचा. ती मुलगी Yo Yo Honey Singh या हिंदी गायकाची खूप मोठी फॅन होती. काही वैयक्तिक कारणांमुळे संजू राठोड व त्या मुलीत अंतर येऊ लागले. व त्यांचे नाते तुटले. त्यानंतर संजू राठोड खूप डिप्रेशनमध्ये गेला. त्याने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला.

संजू राठोड ने याच वेळी मराठी रॅप सॉंग लिहिण्यास सुरुवात केली. त्याला यात आवड निर्माण होऊ लागली. संजू राठोड ची हीच आवड त्याचं व्यसन बनली.

संजू मराठी गाणी लिहू लागला. तो लोकल एरिया मध्ये रॅपिंग करू लागला. संजू राठोड ने एकदा आपल्या वडिलांना लिहिलेले गाणे ऐकवले व त्यावर त्यांची प्रतिक्रिया विचारली. त्यांनी सांगितले की त्यांना यातील काहीच समजले नाही. त्यानंतर संजू राठोड ने सोप्या व मराठी भाषेत रॅप सॉंग बनवण्यास सुरुवात केली. संजू राठोड ने या क्षेत्रात आपला पाया भक्कम करण्याचा निर्णय घेतला.

Sanju rathod’s Youtube journey

संजू राठोड ने यूट्यूब चैनल ची सुरुवात केली. या यूट्यूब चैनल वरती संजू राठोड मराठी रॅप सॉंग बनवून अपलोड करू लागला. संजू राठोड च्या घरी याबद्दल काहीच माहीत नव्हते. संजू राठोड हा क्लास साठी मिळालेल्या पैशातून गाणी बनवू लागला. काही वेळा संजू राठोड ने गाणी बनवण्यासाठी व्याजाने पैसे घेतले. संजूला ते पैसे परत करण्यास अडथळे येऊ लागले. त्यामुळे व्याजावर व्याज लागून कर्जाची रक्कम वाढत गेली. त्यानंतर संजू राठोड च्या घरी लोक पैशासाठी येऊ लागली. अशा परिस्थितीतही संजू राठोड ने आपले काम चालूच ठेवले. व तो जिद्दीने काम करू लागला.

संजू राठोड चे पहिले हिट झालेले गाणे ‘ बाप्पा वाला गाणं ‘ हे होते. या गाण्यावर रितेश देशमुख यांनी रील बनवली. ही संजू राठोड यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. हेच त्याच्या कष्टाचे फळ होते. त्यानंतर संजू राठोड ने मागे वळून पाहिले नाही. संजीवनी अनेक मराठी हिट गाणी दिली. नऊवारी पाहिजे, बाप्पा वाला गाणं, बुलेट वाली, गुलाबी साडी यासारखी हिट गाणी संजू देऊ लागला. या गाण्यांना यूट्यूब चैनल वर मिलियन मध्ये व्ह्यूज मिळू लागले. तसेच ही गाणी सोशल मीडियावरही खूप वायरल होऊ लागली. गुलाबी साडी हे गाणं भारतातच नाही तर भारताबाहेरही खूप फेमस झाले. संजू राठोड च्या गाण्याची अनेक मोठ्या गायकांनी कौतुक केले आहे.

Sanju rathod’s brother

संजू राठोड चे आई-वडील हे गावाकडे राहतात. त्यांचे विचार जरी जुने असले तरी त्यांनी संजू राठोड व त्याच्या भावंडांना शिक्षणासाठी कायम पाठिंबा दिला. संजूला इथे पर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा भाऊ गौरव राठोड (Gspark) याचा मोठा वाटा आहे.

Sanju rathod singer dreams

संजू राठोड ला मुंबईमध्ये स्वतःचे घर घ्यायचे आहे. तसेच गावाकडे ही आई-वडिलांसाठी घर व गाडी घ्यायचे आहे. संजू राठोड इतका फेमस झाला आहे तरीही त्याचे वडील काम करतात. संजू राठोड ला आपल्या वडिलांना व आईला इथून पुढे कायम सुखी ठेवायचे आहे. संजू राठोडचे संपूर्ण भारतभर मराठी गाण्याचे कॉन्सर्ट करण्याचे स्वप्न आहे. संजू राठोड ची अनेक मोठमोठी स्वप्न आहेत. ती स्वप्न त्याला पूर्ण करायचे आहेत. व तो जिद्दीने व कष्टाने आपले स्वप्न पूर्ण करत आहे. संजू राठोड खूप लहान वयात भरपूर कष्ट करत आहे.

आजच्या तरुण पिढीतील मुले मुली छोट्या छोट्या गोष्टींवर चुकीचे निर्णय घेतात. थोड्याशा आलेल्या संकटांवर हात टिकतात. व नको तो मोठा निर्णय घेऊन बसतात. अशा परिस्थितीत संकटांना न घाबरता त्यांना सामोरे जावे ही गोष्ट आपल्याला संजय राठोड च्या जीवन प्रवासातून घेण्यासारखे आहे. आपल्या आई-वडिलांचा विचार करावा व त्यांच्यासाठी कष्ट करावे. ही गोष्ट संजू राठोड आपल्याला सांगतो.

संजय राठोड च्या कष्टाची दखल घेत सिनेसृष्टीतून संजूला अनेक मोठमोठे प्रोजेक्ट मिळाले आहेत. तसेच संजूला हिंदी सिनेसृष्टीतूनही प्रोजेक्ट साठी ऑफर्स येत आहेत. हिंदी सिनेसृष्टीतील अनेक मोठे हिंदी कलाकार संजू राठोड च्या गाण्यावर रील बनवत आहेत. संजू राठोडचे हिंदी संगीतकारांकडून कौतुक केले जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात तसेच भारताबाहेर आहे संजू राठोड च्या गाण्याचे वेड लोकांमध्ये पाहायला मिळत आहे.

संगीत दिग्दर्शन, गायन, दिग्दर्शन, तंत्रज्ञान, अभिनय अशा प्रत्येक क्षेत्रात संजीवनी स्वतःला सिद्ध केले आहे. संजू अगदी सोप्या भाषेत आणि खऱ्या वाटणाऱ्या कलेत मराठी गाणी लोकांसमोर सादर करत असतो. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून व अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जात संजू राठोड ने स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. संजू राठोड नवीन कलाकारांना मोलाचा सल्ला देतो की कितीही कठीण प्रसंग असो स्वतःवर विश्वास ठेवून कष्ट करा. तुम्हाला त्याचे फळ नक्की मिळणार तुमच्या वाट्याला यश नक्की येणार.

संजू राठोड instagram accoun – Sanjurathod07

हेहि वाचा -Akshay Raskar Biography / अक्षय रासकर जीवनप्रवास.