सौरभ भोसले यांचा जीवनप्रवास
Saurabh bhosale biography in marathi – सौरभ भोसले हे प्रसिद्ध सार्वजनिक वक्ता आहेत. तसेच ते लोकप्रिय लेखक आहेत. सौरभ भोसले हे प्रोजेक्ट व्हिजनसी चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. आज आपण सौरभ भोसले यांचा प्रवास पाहणार आहोत.
About the saurabh bhosale
सौरभ भोसले यांचे पूर्ण नाव सौरभ सुरेश भोसले आहे. सौरभ भोसले हे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील मदबा पूर येथील आहेत. सौरभ भोसले हे 26 वर्षाचे आहे .
Saurabh bhosale biography in marathi
सौरभ भोसले यांचे 10 वी पर्यंतचे शिक्षण चांगले झाले. 10वी नंतर त्यांनी सायन्स ला ऍडमिशन घेतले. 10 वी पर्यंत त्यांना शिक्षक व्हायचे होते. बारावीत असताना सौरभ भोसले यांनी डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचे एक पुस्तक वाचले. अग्निपंख हे त्या पुस्तकाचे नाव होते. ते पुस्तक वाचल्यानंतर सौरभ भोसले यांनी सायंटिस्ट होण्याचे स्वप्न पाहिले.
सौरभ भोसले यांची या वेळेत संगत बिघडली. ते भांडण, मारामाऱ्या करू लागले. त्याच्या कॉलेजमध्ये शिकत होते त्या कॉलेजमधून त्यांना सात वेळा रस्टीगेट करण्यात आले.
सौरभ भोसले यांच्या घरात अनेक इंजिनियर्स आहेत. बारावीला 52% पडल्यानंतर सौरभ भोसले यांनी प्रोडक्शन इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतले. दोन वर्षे सौरभ भोसले यांनी इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न केला. पण इंजिनिअरिंग त्यांना जमले नाही. म्हणून त्यांनी इंजीनियरिंग सोडून दिले. त्यानंतर त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट करण्याचा विचार केला पण तेही त्यांना जमले नाही. शेवटी सौरभ भोसले यांनी व त्यांच्या मित्राने बीबीए ला ऍडमिशन घेतले.
2014 साली सौरभ भोसले यांनी इंजीनियरिंग ला ऍडमिशन घेतले त्यावेळी त्यांचे तीन मित्र वेगवेगळ्या कार एक्सीडेंट मध्ये आपला जीव गमावून बसले. आपले लहानपणीचे मित्र आपल्या सोबत नसणार याचा सौरभ भोसले यांना खूप त्रास झाला. सौरभ भोसले यांनी स्वतःला सहा महिने घरात कोंडून घेतले. ते घरच्यांशी व बाहेरच्यांची बोलणे टाळू लागले. जेवणाच्या वेळा चुकवू लागले. ते खूप एकलकोंडी राहू लागले. यावेळी सौरभ भोसले यांचे वडील सुरेश भोसले यांनी या परिस्थितीतून आपल्या मुलग्याला बाहेर पडण्यास मदत केली. सौरभ भोसले यांनी या काळात खूप पुस्तके वाचली. त्या पुस्तकांनी सौरभ भोसले यांचे आयुष्य बदलून टाकले. त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली. त्यांना त्यांच्या झालेल्या चुका कळाल्या. त्यांनी बीबीए ला ऍडमिशन घेतले व आपल्या नवीन प्रवासाला सुरुवात केली.
Public speaker saurabh bhosale
सौरभ भोसले यांनी बीबीए झाल्यानंतर त्यांनी अनेक इंटरव्यू क्रॅक केले. त्यानंतर ते पब्लिक स्पिकिंग व लेखक या क्षेत्रात आले. सराफ भोसले यांनी आतापर्यंत 575 सेशन 410 स्कूल्स कॉलेजेस आणि यूनिवर्सिटी मध्ये केलेले आहेत. सौरभ भोसले यांचे जेव्हा 21 कंपन्यांमध्ये सिलेक्शन झाले त्यावेळी त्यांच्या कॉलेजमध्ये ज्या कॉलेजमधून सौरभ भोसले यांना सात वेळा रस्तिगेट करण्यात आले त्याच कॉलेजमध्ये पहिल्यांदा स्पीच देण्यासाठी बोलावले गेले. ते सेशन 45 मिनिटाचे होते. पण सौरभ भोसले यांनी जवळजवळ चार तास ते सेशन चालू ठेवले. कॉलेजमधील मुलांनाही ते सेशन आवडले. त्यावेळी सौरभ भोसले यांना समजले की त्यांच्यात पब्लिक स्पिकिंग स्किल्स आहेत. व यानंतर त्यांनी पब्लिक स्पिकिंग करण्याचा निर्णय घेतला. आज जवळजवळ चार वर्षे झाली रिपब्लिक स्पिकिंग करत आहेत.
सौरभ भोसले हे आपल्या स्पीच मधून तरुण पिढीला त्यांना आलेले अनुभव सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी केलेल्या चुका त्यांना मिळालेले आयुष्याकडून धडे हे सौरभ भोसले आपल्या लेखनाच्या माध्यमातून व आपल्या स्पीच मधून मुलांना देण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी ज्या चुका केल्या त्या करू नयेत व आपण केलेल्या चुकीने वेळीच स्वतःला सावरावे हे सौरभ भोसले सांगतात.
Saurabh bhosale show’s online booking
सौरभ भोसले यांनी महाराष्ट्रातील अनेक शहरात गावात पब्लिक स्पिकिंग केलेले आहे. अनेक वेगवेगळ्या सिरीज सौरभ भोसले यांनी बनवले आहेत. सौरभ भोसले यांचे स्पीच यूट्यूब, इंस्टाग्राम या सोशल साईट्सवर ही व्हायरल होत आहेत. त्यांच्या शोजचे ऑनलाइन बुकिंग केले जाते .
Saurabh bhosale podcast
सौरभ भोसले यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षापासून पब्लिक स्पिकिंग करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना खूप अडचणी आल्या. सौरभ भोसले आणि सुरुवातीच्या काळात फ्री सेशनही केलेले आहेत. खूप वेळा त्यांना डीमोटिवेट करण्यात आलं. पण सौरभ भोसले थांबले नाहीत.
सौरभ भोसले यांनी 2022 मध्ये सातारा येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे उन्हाळी शिबिर आयोजित केले. सौरभ भोसले जोश टॉक्स या मंचावर ही दिसले आहेत. 2021 मध्ये सौरभ भोसले यांना सर्वोत्कृष्ट प्रादेशिक प्रभावशाली पुरस्काराने सन्मानित केले आहे.
सौरभ भोसले यांनी अनेक मुलांना शिक्षणासाठी मदत केली आहे. सौरभ भोसले तरुण मुलांना मार्गदर्शन करतात. सौरभ भोसले यांनी साताऱ्यात अनेक मोफत नेत्रदान शिबिरे आयोजित केली. त्यांनी महाराष्ट्रात स्वच्छ पर्यावरण अभियाने केली. ज्या लोकांना समाज आणि स्वतःच्या भल्यासाठी काहीतरी करायचे आहे अशा लोकांसाठी सौरभ भोसले यांनी प्रोजेक्ट व्हिजनसी या प्लॅटफॉर्मची स्थापना केली. सौरभ भोसले यांनी जागतिक युवा परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे.
Saurabh bhosale wife
सौरभ भोसले यांच्या पत्नीचे नाव प्रणोती सौरभ भोसले आहे. प्रनोती एक सक्सेसफुल इंस्टाग्राम इनफ्लूअन्सर आहेत.
Saurabh bhosale instagram account- saurabh_s_bhosale
Pranoti saurabh bhosale instagram accoun- Pranoti_saurabh_bhosale