कहाणी शरद तांदळे यांच्या प्रवासाची / Sharad Tandale Biography In Marathi –
नमस्कार मित्रांनो ,
आज आपण या लेखात अश्या व्यक्तीची माहिती घेणार आहोत कि एके काळी रोजगार नसल्यामुळे नैराश्य होते तोच व्यक्ती आज एक सुक्सेसफुल बिझनेस मॅन, सक्सेसफुल लेखक , आणि तरुणांमध्ये युथ व्हॉइस म्हणून आपली ओळख निर्माण केलेली आहे. वंजारवाडी जिल्हा बीड येथील एका छोट्याशा गावातून लंडन पर्यंतचा प्रवास शरद उत्तमराव तांदळे या तरुण उद्योजकाने अनेक अडचणींना सामोरे जात , भरपूर कष्ट व मेहनत करून , धडपड करून हा प्रवास त्यांनी पूर्ण केला आहे. हाच प्रवास आपण आपल्या या लेखांमधून पाहणार आहोत.
Sharad Tandale
शरद उत्तमराव तांदळे यांचे वडील उत्तमराव तांदळे हे माध्यमिक शाळेत शिक्षक होते. शरद तांदळे यांचे बीड येथील सावरकर विद्यालय या शाळेत झाले. यानंतर त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण बलभीम कॉलेज येथे पूर्ण केले. 12 वी नंतर शरद उत्तमराव तांदळे यांनी इंजिनिअरिंग करण्याचा निर्णय घेतला. इंजीनियरिंग करण्यासाठी शरद तांदळे यांनी औरंगाबाद मधील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. शरद उत्तमराव तांदळे यांना लहानपणापासूनच स्वतःचा व्यवसाय करण्याचे स्वप्न होते. त्यांनी औरंगाबाद मधील कॉलेजमध्ये आपले इंजिनिअरिंगचे शिक्षण चालू असतानाच तरुणांसाठी विजयी युवक नावाचे मासिक कॉलेजमध्ये सुरू केले. या विजयी युवक नामक मासिकांमध्ये शरद तांदळे हे दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील तरुणांना वेगवेगळ्या उद्योगांची माहिती व्हावी यासाठी प्रयत्न करत. तरुणांनी उद्योजक व्हावे यासाठी ते प्रयत्न करत. मासिकामध्ये स्वयंरोजगाराची व वेगवेगळ्या उद्योगांची माहिती असल्यामुळे विजय युवक नामक मासिक यशस्वी ठरले. परंतु हे मासिक आर्थिक अडचणीत सापडले आणि त्यानंतर ते बंद पडले. मासिक बंद झाल्यानंतर शरद तांदळे विद्यार्थ्यांच्या अडचणींमध्ये त्यांना मदत करू लागले. त्यांच्या विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवू लागले. या सगळ्यात शरद तांदळे यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ लागले. कॉलेजमध्ये शरद तांदळे हे शरद भाऊ या नावाने ओळखले जाऊ लागले. या सगळ्यात यांचे इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात एका पेपरमध्ये अपयश आले. पण त्यांनी इंजिनिअरिंग सोडले नाही त्यांनी पुन्हा जिद्दीने आपले इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.
About The Sharad Tandale
Sharad Tandale Biography marathi- इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शरद तांदळे हे वेगवेगळे प्रयोग करू लागले. पण या प्रयोगात सुद्धा त्यांना अपयश येत होते. प्रयोग करण्यासाठी मोठ्या किमतीची गरज होती. यामुळे ते प्रयोग करताना कर्ज घेऊन प्रयोग करत. पण कोणत्याही प्रयोगात यश आल्या नसल्यामुळे त्यांचे कर्ज वाढतच जात होते. अशातच त्यांनी पुण्याला येऊन जॉब करण्याचा निर्णय घेतला. शरद तांदळे यांनी पुण्यात येऊन जॉब करण्यास सुरुवात केली. पुण्यात आल्यानंतर शरद तांदळे यांना 4000 रुपयांचा जॉब मिळाला. हा जॉब शरद तांदळे इच्छेविरुद्ध करू लागले. याच वेळी त्यांना एका मित्राकडून एका कोर्स बद्दल कळाले. चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी शरद तांदळे यांनी हा कोर्स करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्याकडे हा कोर्स करण्यासाठी पैसे नव्हते. यावेळी त्यांच्या आईने आपले सोने गहाण ठेवून कोर्स साठी पैसे दिले. यानंतर कोर्स पूर्ण करण्यासाठी शरद तांदळे हैदराबादला आले. हैदराबादला जाताना औरंगाबाद येथे ते त्यांच्या एका मित्राकडे थांबले. पण तेथे त्यांची पैशाची पॅन्ट गायब झाली. शरद तांदळे यांच्या आईने त्यांना कोर्ससाठी 70 हजार रुपये दिले होते. ते सर्व पैसे हरवले. यानंतर त्यांच्या मित्राने दिवसभरात त्यांना एकूण 18 हजार रुपये जमा करून दिले. तेवढे पैसे घेऊन शरद तांदळे पुन्हा हैदराबादला रवाना झाले. हैदराबाद मध्ये आल्यानंतर पहिले सहा महिने यांचे पैसे नसल्यामुळे भरपूर हाल झाले. काही वेळा पैसे नसल्यामुळे शरद तांदळे उपाशी झोपत. अशा परिस्थितीत शरद तांदळे यांनी तो कोर्स पूर्ण केला. कोर्स पूर्ण झाल्यानंतर शरद तांदळे हे पुण्यात आले. त्यांना वाटले की कोर्स मुळे आपल्याला कोठेही चांगल्या प्रकारची नोकरी मिळेल. यातून आपल्याला चांगले पैसे मिळतील. पण यातही त्यांना अपयशच आले. शरद आंधळे यांना चांगल्या प्रकारची व चांगल्या पगाराची नोकरी मिळाली नाही. अशा परिस्थितीत सुद्धा शरद तांदळे यांनी माघार घेतली नाही . ते मिळेल ते काम करू लागले. काहीच दिवसात त्यांच्या एका मित्राने शरद तांदळे यांना धनकवडी मध्ये ट्रांसफार्मर बसवण्यासाठी विचारले. या कामाचे शरद तांदळे यांना काहीही अनुभव नव्हता किंवा पूर्वज्ञान कोणत्याही प्रकारचे नव्हते. तरीसुद्धा शरद तांदळे यांनी ते काम पूर्ण करून दाखवले व यशस्वीरित्या केले. यानंतर त्यांना वेगवेगळी कामे मिळू लागली. त्याने अंडरग्राउंड केबल टाकण्यापासून पाईपलाईन ची कामे करण्यास सुरुवात केली. त्यांचे उत्तम काम यामुळे त्यांना पुणे महानगरपालिकेमध्ये काम करण्याचे लायसन मिळाले. लायसन मिळाल्यानंतर शरद तांदळे यांनी छोटी छोटी टेंडर हे भरणे सुरू केले. यातून त्यांना अनेक वेगवेगळी टेंडर मिळू लागलेत. शरद तांदळे यांचा मनमिळाऊ स्वभाव सर्वांना सांभाळून घेणे , मिळून मिसळून राहणे, यामुळे शरद तांदळे यांचे मित्रपरिवार वाढत गेले . यामुळे त्यांना पुढे जाण्यास मदत मिळाली.
Sharad Tandale Biography marathi
यानंतर शरद तांदळे थांबले नाहीत. त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्याने खूप मोठे संघर्ष केले , अनेक अडचणी पार केल्या, भरपूर कष्ट केले, अशात शरद तांदळे हे उद्योजक बनले. यानंतर शरद तांदळे हे मन लावून काम करू लागले . ते मागे फिरले नाहीत. त्यांनी तीन वर्षात स्वतःबरोबर अनेक वेगवेगळ्या युवकांना रोजगार मिळवून दिला. शरद तांदळे हे अधिकृत कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करू लागले. शरद यांच्या कामगिरीची दखल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. त्यांनी केलेल्या संघर्षामुळे व प्रामाणिक स्वभावामुळे शरद तांदळे यांना लंडनचा पुरस्कार प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते देण्यात आला. शरद तांदळे यांना वाय बी आय यंग आंत्र प्रेन्यूअर ऑफ द इयर 2013 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शरद तांदळे यांच्यासाठी ही गोष्ट खूप मोठी आहे. तसेच त्यांच्यासाठी ही गोष्ट अविश्वसनीय आहे.
शरद तांदळे यांनी स्वतःची इंडियाना नावाची एक सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली. या सॉफ्टवेअर कंपनी मधून शरद तांदळे आणि तरुण उद्योजकांसाठी भारतात गव्हर्मेंट डिपारमेंट चे टेंडर दाखवण्यासाठी ई टेंडर वर्ल्ड नावाचे टेंडरिंग सोल्युशन चे अँड्रॉइड एप्लीकेशन बनवले. यानंतर शरद तांदळे यांनी आपल्या अनुभवातून हाऊ टू बिकम अ कॉन्ट्रॅक्टर नावाचा एक ट्रेनिंग कोर्स सुरू केला. हा कोर्स अशा विद्यार्थ्यांना उपयोगी आहे जे विद्यार्थी नवीन कॉन्ट्रॅक्टदार बनण्यासाठी उत्सुक आहेत. यातून शरद तांदळे तरुण उद्योजकांना घडवू लागले. यामुळे तरुणांमध्ये शरद तांदळे हे शरद सर या नावाने नावाजले गेले. या कंपनीतून शरद तांदळे जास्तीत जास्त तरुणांना उद्योग व रोजगार मिळवून देण्याचा जोर असतो.
Sharad Tandale Ravan Book
या कंपनीच्या सक्सेस नंतर शरद तांदळे यांनी अजून एक उपक्रम हाती घेतला. शरद तांदळे यांनी कोणताही अनुभव नसताना , व लेखनासाठी कोणतीही पार्श्वभूमी नसताना कादंबरी लिहिण्याचा निर्णय घेतला. ही कादंबरी लिहिताना शरद तांदळे यांनी भरपूर संशोधन केले , त्यासोबतच त्यांनी संदर्भही तपासून घेतले . यासाठी त्यांनी पुरण वाड्मयाचे सर्व खंड व ते सर्व वाचून काढले. यातून त्यांना भरपूर माहिती मिळाली. अशातून शरद तांदळे यांनी रावण राजा राक्षसांचा ही कादंबरी 2018 साली प्रसिद्ध केली. या कादंबरीला अल्पवयीन काळात वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काहीच दिवसात या कादंबरीच्या जवळजवळ साडेचार हजार प्रती विकल्या गेल्या. ही कादंबरी लिहून पूर्ण करण्यासाठी शरद तांदळे यांना त्यांच्या धाकट्या भावाची व त्यांच्या बायकोची सल्लागार म्हणून साथ मिळाली. शरद तांदळे यांनी ही कादंबरी स्वतः प्रकाशित केली. यानंतर शरद तांदळे यांनी अनेक वेगवेगळे पुस्तके लिहिलीत. यातूनच शरद तांदळे यांचे पुण्यामध्ये न्यू इरा पब्लिशिंग हाऊस उदयास आले.
शरद तांदळे यांनी त्यांच्या जीवनात भरपूर कष्ट केले. व या कष्टामुळे शरद तांदळे आज एक सक्सेसफुल बिझनेस मॅन व एक सक्सेसफुल लेखक आहेत. तसेच शरद तांदळे यांचे तरुणांमध्ये भरपूर क्रेझ आहे. शरद तांदळे यांना सोशल मीडिया वरती तरुण तरुणी फॉलो करतात. तसेच यूट्यूब वरही त्यांना खूप जास्त प्रतिसाद मिळतो.
Sharad Tandale Contact Number
Sharad Tandale – 9689934481
Sharad Tandale Instagram Id
हे हि वाचा – किरण गायकवाड यांची बायोग्राफी / kiran Gaikwad Biography in Marathi .
हे हि वाचा – बिग बॉस फेम सुरज चव्हाण / suraj chavan Biography Marathi.