Tanmay patekar biography marathi
तन्मय पाटेकर यांचा जीवनप्रवास.
Tanmay patekar biography in marathi.
Tanmay patekar biography / तन्मय पाटेकर यांचा जीवनप्रवास.- जगात मोबाईल हा जीवनातील आवश्यक भाग झालेला आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात आपल्याला मोबाईल हा दिसतोच. तसेच याच मोबाईल मध्ये प्रत्येकाचे सोशल मीडिया वरती अकाऊंट हे आवर्जून असतेच. यात फेसबुक, इंस्टाग्राम, whatsapp, अशा सोशल साइट्स वरती प्रत्येक जण ऍक्टिव्ह असतो.
Social media influencer.
यातूनच Social media influencers ची संख्या वाढत चालली आहे. तरुण पिढी याकडे एक करिअरच्या दृष्टिकोनातून पाहत आहे. करून यात यशस्वी होत आहे. मीडिया साईटवर अनेक तरुण तरुणी आहेत. जी मेहनत करत आहेत. यशस्वी होत आहेत. यातीलच एक नाव म्हणजे तन्मय पाटेकर. आपल्या अनोख्या अभिनय शैलीने लाखो फॅन फॉलोवर्स बनवून सोशल मीडिया वरती सामाजिक विषयांवरती व्हिडिओ बनवून समाजासमोर सत्य परिस्थिती आणणारा एक रील स्टार म्हणून तन्मय पाटेकर चे नाव घेतले जाते. आज आपण तन्मय पाटेकर यांचा जीवन प्रवास पाहणार आहोत.Tanmay patekar biography marathi
About the Tanmay patekar.
तन्मय पाटेकर यांचा जीवनप्रवास.
Tanmay patekar full name
Tanmay patekar age
Tanmay patekar birthplace
तन्मय पाटेकर यांचे पूर्ण नाव तन्मय चंद्र मोहन पाटेकर हे आहे. तन्मय पाटेकर हा महाराष्ट्रातील मुंबई येथील आहे. तन्मय पाटेकर 20 डिसेंबर 1995 चा आहे. तन्मयला लहानपणापासूनच डान्स करायची आवड होती. तन्मय पाटेकर टिक टोक वरती व्हिडिओ बनवत होता. एकदा तन्मय एका डान्स स्पर्धेत सहभागी झाला. सकाळी तन्मयला सांगितले की तू डांस पेक्षा काम करू शकतोस. यानंतर तन्मय अभिनय करण्याकडे जास्त भर दिला. तन्मय पाटेकर टिक टोक वरती व्हिडिओ बनवून त्यातून आपला अभिनय सादर करत असे. तो दररोज वेगवेगळे व्हिडिओ बनवू लागला व अपलोड करू लागला. एकदा त्याने साई बाबांची वेशभूषा धारण केली व त्यातून त्याने व्हिडिओ बनवला आणि तो टिकतोक वरती अपलोड केला. या व्हिडिओला सोशल मीडिया वरती खूप जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला. याच व्हिडिओतून तन्मय पाटेकर फेमस होऊ लागला. तन्मय पाटेकर चे या व्हिडिओ नंतर फॅन फॉलोवर्स वाढत गेले. तन्मय पाटेकर चे लाखोंच्या घरात फॅन फॉलोवर्स झाले.
काही दिवसातच टिकतोक भारतात बॅन झाले. इंस्टाग्राम वरती व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. या प्लॅटफॉर्म वरती ही तन्मयला खूप प्रतिसाद मिळू लागला. लोकांना त्याचे व्हिडिओ आवडू लागले. व लोक त्याला पाठिंबा देऊ लागले. सोशल मीडिया वरती तन्मय पाटेकरच्या अभिनयाचे व त्याने बनवलेल्या व्हिडिओचे खूप कौतुक होऊ लागले.Tanmay patekar biography marathi
सुरुवातीपासूनच अनेक सामाजिक विषयांवर काम करतो. व्हिडिओ साठी लागणारे प्रत्येक काम तन्मय स्वतः करतो. व्हिडिओ साठी स्टोरी लिहिणे, प्रोडक्शन करणे, फोटोशूट करणे, व्हिडिओ एडिटिंग करणे अशी कामे तू स्वतः करत असतो. तन्मय पाटेकर स्त्री-पुरुष समानता, स्त्रीभ्रूणहत्या, आईचे प्रेम, वडिलांच्या भावना, तृतीयपंथी यांच्या भावना, महिला सक्षमीकरण तसेच समाजातील दुर्लक्षित गोष्टी असे अनेक सामाजिक प्रश्न समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. तन्मय पाटेकर च्या प्रत्येक व्हिडिओला लाखों मध्ये लाईट व कमेंट्स मिळतात. तसेच त्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर देखील केले जातात. आपल्या व्हिडिओचा तन्मय पाटेकर जनजागृती करतो.
तन्मय पाटेकर आपल्या व्हिडिओ निर्मितीतून सामाजिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. तन्मय पाटेकर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समाजात घडणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करतो. या प्रयत्नात तन्मय पाटेकरला मुंबई पोलिसांचाही सपोर्ट मिळाला आहे. तसेच तन्मय पाटेकर चे जास्तीत जास्त व्हिडिओज हे स्त्रियांविषयी असतात. त्यामुळे तन्मय पाटेकरला निर्भया पथकाचा ही पूर्ण पाठिंबा आहे. यामुळे तन्मयला आपले व्हिडिओ बनवण्यासाठी कधीही अडचण येत नाही. तन्मय कोठेही व कधीही आपले व्हिडिओ शूट करू शकतो.
तन्मय पाटेकर व त्याची टीम खूप चांगले व्हिडिओज निर्माण करतात. तन्मय जेवढी मेहनत करतो तेवढीच मेहनत त्याची टीम ही करते. एखाद्या विषयावर संपूर्ण पिक्चर बनवावा अशा पद्धतीने फक्त एका मिनिटात संपूर्ण पिक्चर ची स्टोरी तन्मय पाटेकर व त्याची टीम व्हिडिओ मधून सादर करण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओत अनेक भूमिका साकारतो. यात नायक, खलनायक, भिकाऱ्याची भूमिका, दारू पिणाऱ्या व्यक्तीची भूमिका, रडवेल्या व्यक्तीची भूमिका अशा अनेक भूमिका तन्मय पाटेकर उत्तमरित्या सादर करतो. तन्मय पाटेकर सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्म वरती खूप फेमस आहे. इंस्टाग्राम वरील रील सोबतच तन्मय पाटेकरने अनेक नावाजलेल्या कलाकारांसोबत काम केलेले आहे. तसेच तन्मय पाटेकर याने अनेक गाणीही बनवलेली आहेत. यूट्यूब वरती त्याची गाणी फेमस आहे. एक Social media influencer ती अभिनेता इथपर्यंतचा प्रवास करताना तन्मय पाटेकरने खूप मेहनत केलेली आहे.
Tanmay patekar sister story
तन्मय पाटेकर एक उत्कृष्ट अभिनेता आहे सोबतच तन्मय पाटेकर हा माणूस म्हणूनही खूप चांगला व्यक्ती आहे. तन्मयला सामाजिक कर्तव्याची जाण आहे. व तन्मय पाटेकर आपले सामाजिक कर्तव्य पार पाडत आहे. तन्मय स्त्रियांचा खूप आदर करतो. याबद्दल एक किस्सा असा की तन्मय पाटेकर ची बहीण काही शारीरिक अडचणींमुळे अनेक वर्ष हॉस्पिटलमध्ये आहे. ती चालू शकत नाही व बसू शकत नाही. एकदा आणीबाणीच्या वेळी तन्मय पाटेकर ने आपल्या बहिणीचे पाळीचे रक्त ही साफ केले आहे. त्यामुळे तन्मय स्त्रियांचा खूप आदर करतो. तन्मय च्या वडिलांना साखर आहे त्यामुळे काही वर्षांपूर्वी ते अंध झाले आहेत. तसेच तन्मय च्या आई ही सारखी आजारी असते. तन्मय पाटेकर आपल्या घरचे सर्व परिस्थिती सांभाळतो. तन्मय पाटेकर अनेक वेळा आपले काम करून, इव्हेंट अटेंड करून घरी गेल्यानंतर घरचे कामही करतो. घरच्या कामात तन्मय पाटेकर आईला खूप मदत करतो.
तन्मय पाटेकर हा यूट्यूब वरती व्हिडिओ बनवून तसेच सोशल मीडियाचा वापर करून अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे प्रमोशन करून महिन्याला दोन ते तीन लाख रुपये कमवत आहे.
तन्मय पाटेकर ची कहाणी खरच खूप प्रेरणादायी आहे. तन्मय पाटेकर एक उत्तम कलाकार आहे तसेच तू एक उत्तम नागरिकही आहे. तन्मय पाटेकर हे नाव आज फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यात ही घेतले जाते.
Tanmay patekar instagram account
Tanmay patekar instagram account – tanmaypatekar2424
अधिक माहितीसाठी येथे पहा