Vishvas nangrepatil biography marathi / विश्वास नांगरेपाटील जीवनप्रवास.

विश्वास नांगरेपाटील जीवनप्रवास .

Vishvas nangrepatil biography marathi / विश्वास नांगरेपाटील जीवनप्रवास –

आपल्या उत्तम वक्तृत्वाने व प्रेरणादायी भाषणाने महाराष्ट्रातील अनेक मुला-मुलींना प्रेरणा देणारे दिशा दाखवणारे व्यक्तिमत्व म्हणजे विश्वास नांगरे पाटील. खरे तर या नावाची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील अनेक खेड्यात गावात शहरात तसेच जिल्ह्यात विश्वास नांगरे पाटील या नावाचा दबदबा आहे. आज आपण विश्वास नांगरे पाटील यांचा जीवन प्रवास पाहणार आहोत.

विश्वास नांगरे पाटील वय / Vishvas nangrepatil age

Vishvas nangrepatil birth place

विश्वास नांगरे पाटील हे सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील आहेत. विश्वास नांगरे पाटील यांचा जन्म 01 जून 1973 3 ला झाला.

Vishvas nangrepatil biography in marathi

विश्वास नांगरे पाटील यांचे पूर्ण नाव /vishvas nangrepatil full name

Vishvas nangrepatil biography marathi / विश्वास नांगरेपाटील जीवनप्रवास. विश्वास नांगरे पाटील यांचे पूर्ण नाव विश्वास नारायण नांगरे पाटील हे आहे. विश्वास यांचे बालपण अतिशय मजेत गेले. विश्वास नांगरे पाटील हे खेडेगावातील असल्यामुळे खेळणे, बागडणे, पोहायला जाणे, झाडावर चढणे, गाई म्हशींच्या धारा काढणे या गोष्टी ते बालपणात करायचे. विश्वास नांगरे पाटील यांचे वडील पैलवान होते. तसेच ते गावचे सरपंच ही होते. विश्वास नांगरे पाटील यांनी पैलवान व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. पण विश्वास यांचे मन आखाड्यात रमेना.

About the vishvas nangrepatil

विश्वास नांगरे पाटील यांनी शाळेत जाण्यास सुरुवात केली. ते गावातील शाळेत जात असत. सरपंचाचा मुलगा व पैलवानाचा मुलगा यामुळे ते शाळेत उर्मटपणा करत. शिक्षकांच्या खुर्चीत बसणे , शाळेतील मुलांवर दादागिरी करणे असे प्रकार विश्वास नांगरे पाटील शाळेत असताना करत होते. विश्वास पाचवीत असताना शाळेत नवीन शिक्षिका आल्या. त्यावेळी विश्वास नांगरे पाटील हे शिक्षकांच्या खुर्चीत बसून दादागिरी करत होते. हे त्या नवीन शिक्षकांनी पाहिली व त्या शिक्षिकेने विश्वास यांना खूप सुनावले. त्या म्हणाल्या की एक पैलवानाचा मुलगा या व्यतिरिक्त तुझी स्वतःची ओळख काहीच नाही. विश्वास नांगरे पाटील यांना स्वतःच्या चुकीची जाणीव झाली. व इथूनच विश्वास नांगरे पाटील यांना आयुष्याची दिशा मिळाली.

विश्वास नांगरे पाटील यांनी घरी जाऊन आपल्या वडिलांना सांगितले की त्यांना शाळा शिकायची नाही व त्यांना स्वतःची ओळख निर्माण करायचे आहे. त्यावेळी त्यांचे वडील नारायण नांगरे पाटील यांनी विश्वास यांची समजूत काढली व शिक्षण घेऊनच वेगळी ओळख निर्माण करता येते हे विश्वास यांना समजून सांगितले. विश्वासाने भरपूर शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.

Vishvas nangrepatil 12th Percentage

यानंतर विश्वास नांगरे पाटील तालुक्यातील शाळेत जाऊ लागले. तालुक्यातील शाळेत जाण्यासाठी विश्वास हे दररोज दीड तास प्रवास करत असत. ते मन लावून अभ्यास करू लागले. विश्वास नांगरे पाटील यांना इयत्ता 10 वीला 88% पडले व ते चांगल्या मार्काने पास झाले. यानंतर विश्वास नांगरे पाटील यांनी विज्ञान मधून 12 वीची परीक्षा दिली यातही त्यांनी 91% पाडून उत्तम गुण मिळवले.

12 वी नंतर विश्वास नांगरे पाटील यांनी स्पर्धा परीक्षा देण्यास सुरुवात केली. ते यूपीएससी व एमपीएससी अशा अनेक स्पर्धा परीक्षा देऊ लागले. याच काळात विश्वास नांगरे पाटील यांनी आर्ट्स मधून ग्रॅज्युएशन चे शिक्षण कोल्हापुरातील शिवाजी युनिव्हर्सिटी येथून पूर्ण केले.

विश्वास नांगरे पाटील यांनी IS, IPS डेप्युटी कलेक्टर,DYSP, फौजदार अशा अनेक परीक्षा दिल्या. B.A चे शिक्षण घेताना त्यांनी NNC चे सर्टिफिकेट मिळवले. यातूनच शूटिंग कॉम्पिटिशन केल्या. NNC मधून अनेक कॅम्प त्यांनी ऑर्गनाईज केले.

विश्वास नांगरे पाटील यांना अभ्यासासाठी पुस्तके कमी पडू लागली. त्यांच्या संस्थेत अभ्यासासाठी लागणारी सर्वच पुस्तके नव्हते. त्यांनी गावात एक स्टडी सेंटर उभारले. विश्वास नांगरे पाटील यांनी सरकारकडून मदत मिळवली. त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रुपयांचे सहाय्यता निधी मिळवली. त्यांनी जवळजवळ दोन ते तीन लाख रुपये जमा केले. यातूनच विश्वास नांगरे पाटील यांनी पुस्तके व स्टडी सेंटर साठी छोटी इमारत बनवली. पुस्तकांमुळे विश्वास नांगरे पाटील यांना पुढच्या वाटचालीसाठी दिशा मिळू लागली. व याच दरम्यान ते ग्रॅज्युएट झाले.

Vishvas nangrepatil IPS batch

यानंतरच्या पुढील शिक्षणासाठी विश्वास नांगरेपाटील मुंबईला गेले. त्यांनी यूपीएससी व एमपीएससी च्या परीक्षा दिल्या. या परीक्षा दिल्यानंतर त्यांना पहिल्या प्रयत्नात यश आले नाही. ते अपयशी झाले. यानंतर 1997 ला MPSC मधून डेप्युटी कलेक्टर , IPS अशा 13 परीक्षेत त्यांनी यश मिळवले. विश्वास नांगरे पाटील यांना इंटरव्यू दरम्यान एक प्रश्न विचारला गेला की तुम्ही या जगात का आला आहात? या प्रश्नाचे विश्वास नांगरे पाटील यांनी उत्तम उत्तर दिले. ते म्हणाले मी या ठिकाणी संघर्ष करायला आलो आहे आणि जर माझ्यावरती विश्वास टाकला तर सिस्टीम मधील वाईट गोष्टींशी संघर्ष करण्याची माझी तयारी आहे. 1997 ला विश्वास नांगरे पाटील यांचे IPS मध्य सिलेक्शन झाले. तेव्हा त्यांचे शिक्षण बीए पूर्ण झाले होते. IPS च्या सर्विस मधून विश्वास नांगरे पाटील यांनी MA चे शिक्षण एक्स्टर्नल पद्धतीने पूर्ण केले. यानंतर त्यांनी अनेक परीक्षा दिल्या व यश मिळवले. 1997 ला विश्वास नांगरे पाटील यांनी वयाच्या 23व्या वर्षी डेप्युटी कलेक्टर, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आणि IPS या तीन पदव्या एकाच वेळी मिळवल्या.

राष्ट्रपती शौर्य पुरस्कार

26/11 ला मुंबई मधील ताजमहल हॉटेल मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात विश्वास नांगरे पाटील यांनी खूप धाडस दाखवले. या हल्ल्यात विश्वास नांगरे पाटील यांनी अनेक लोकांचा जीव वाचवला. यावेळी त्यांनी आपल्या जिवाची पर्वा केली नाही. त्यांचे हे धाडस पाहून भारत सरकारने 2013 ला विश्वास नांगरे पाटील यांचा राष्ट्रपती शौर्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

Vishvas nangrepatil family

Vishvas nangrepatil wife

विश्वास नांगरे पाटील यांच्या बायकोचे नाव रूपाली विश्वास नांगरे पाटील असून त्यांना जानवी विश्वास नांगरे पाटील व रणवीर विश्वास नांगरे पाटील अशी दोन अपत्य आहेत.

Vishvas nangrepatil photo

Vishvas nangrepatil contact number

Vishvas nangrepatil contact number – 9822666699/9773005555

Vishvas nangrepatil instagram account – vishwasnangrepatil

हेही वाचा – Anushri mane biography marathi / अनुश्री माने यांचा जीवनप्रवास

हेही वाचा – Ashok todmal life story/ अशोक तोडमल जीवनप्रवास

हेही वाचा – Salgar Amruttulya chaha story/ सलगर अमृततुल्य चहा यशोगाथा.