Anushri mane biography marathi / अनुश्री माने यांचा जीवनप्रवास

Anushri mane biography marathi / अनुश्री माने यांचा जीवनप्रवास – या मराठी वेब सिरीज मधून मिली ही भूमिका साकारून महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारी अनुश्री माने आपल्याला माहीत असेलच. आज आपण अनुश्री माने यांचा जीवन प्रवास पाहणार आहोत.

Anushri mane birth date

अनुश्री माने यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. अनुश्री माने तीन वर्षाचे असताना तिचे वडील कॅन्सर या आजाराने वारले. लहान वयातच अनुश्री माने यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत नाहीसे झाले. अनुश्री माने यांचा जन्म 21 मार्च 2001 या साली झाला.

About the anushri mane

अनुश्री यांच्या आई ने घराची व अनुश्री यांची संपूर्ण जबाबदारी घेतली. त्या काम करू लागल्या. अनुश्री माने यांची आई पाच ते सहा दुकानात फरशी पुसणे व झाडू मारणे अशी कामे करत असत. त्यानंतर त्या खानावळ मध्ये जात असत. खानावळ मध्ये त्या चपाती करणे व भांडी घासणे अशी कामे करत असे. त्यानंतर अनुश्री माने यांच्या आई मुलींच्या वसतिगृहामध्ये नाईट ड्युटी करण्यासाठी जात असत. अशा परिस्थितीत अनुश्री लहानाची मोठी झाली. अनुश्री माने हिला आपल्या परिस्थितीची जाणीव होती. अनुश्री माने यांच्या आईने अनुश्रीला कधीच कोणत्या गोष्टीसाठी अडवले नाही. अनुश्री माने यांनी अनुश्रीच्या प्रत्येक निर्णयात त्यांची साथ दिली आहे. व अनुश्रीला प्रत्येक वेळी सपोर्ट केलेला आहे. अनुश्री माने यांच्या यशामागे आज त्यांच्या आईचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी खूप मेहनतीने व कष्टाने अनुश्रीला लहानाचे मोठे केले. व अनुश्री माने यांच्या वरती उत्तम संस्कारही केले.

Anushri mane hobbies

अनुश्री माने लहानपणापासूनच डान्स क्लासला जायचे. अनुश्रीला लहानपणापासून डान्स आणि एक्टिंग मध्ये रस होता. अनुश्री माने यांच्या डान्स क्लास मध्ये श्रावणी सोळसकर यांनी मीस सातारा या स्पर्धेची माहिती अनुश्रीला दिली. व अनुश्रीला या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्या सांगण्यावरून अनुश्री माने ही मी सातारा या स्पर्धेच्या ऑडिशन साठी गेली. तिथे गेल्यानंतर अनुश्री ने पाहिले की खूप मुली या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आले आहेत. त्यांची वेशभूषा ही उत्तम प्रकारची होती. त्यांच्या अंगावरील कपडे त्यांच्या पायातील सॅंडल्स हे महागडे होते. पण अनुश्री ही एका गरीब घरातील असल्यामुळे तिच्याकडे अशा कोणत्याही वस्तू नव्हत्या. ती एकदम साध्या वेशभूषेत तेथे गेली होती. पण अनुश्री टॅलेंटेड होती. अनुश्री माने तिच्यातील कलेमुळे मीस सातारा या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

Anushri mane miss satara

अनुश्री माने हिने अगदी लहान वयात या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली. यावेळी अनुश्री माने ही फक्त नववीत होती. ती फक्त 17 वर्षाची होती. ज्यावेळी अनुश्री मानेची मी सातारा या कॉम्पिटिशन साठी निवड करण्यात आली त्यावेळी तिच्याकडे स्पर्धेत घालण्यासाठी चांगले कपडे नव्हते. व ते कपडे विकत घेण्या इतपत तिच्याकडे पैसेही नव्हते. अनुश्री माने हिने अगदी रात्रभर बसून स्वतःचा ड्रेस स्वतः शिवला. अनुश्रीला शिवण या कलेत ही जास्त रस आहे. अनुश्री स्वतःचे ड्रेस स्वतः शिवते. अनुश्री ने पहाटे 4 वाजेपर्यंत स्वतः ड्रेस शिवला व तिने तो ड्रेस मी सातारा या स्पर्धेत घातला. या स्पर्धेत अनुश्री माने ही दुसर्या नंबरची विजेता ठरली. या स्पर्धेसाठी अनुश्री माने हिने भरपूर कष्ट घेतले.

Shala marathi webstories

या स्पर्धेनंतर अनुश्री माने हिने एक वर्ष काहीही केले नाही. तिने आपल्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले. एक वर्षानंतर श्रावणी सोलस्कर यांनी अनुश्री माने हिला शाळा या मराठी वेब सिरीज साठी ऑडिशन देण्यास सांगितले. व अनुश्री ने त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा या वेब सिरीज साठी ऑडिशन दिले. या ऑडिशन नंतर अनुश्रीला या वेब सिरीज साठी सिलेक्ट करण्यात आले. अनुश्री माने हिने शाळा या मराठी वेब सिरीज साठी खूप मेहनत घेतली व अनुश्री माने हिने नीलू ही भूमिका साकारून चाहत्यांच्या मनात घर केले. श्री मानेचे आयुष्य बदलून गेले. शाळा या वेब सिरीज नंतर अनुश्री माने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ही व्हायरल होऊ लागली. सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्म वरती अनुश्री मानेचे एका रात्रीत लाखोंमध्ये फॅन फॉलोवर्स वाढले. शाळा या वेब सिरीज मुळे अनुश्री माने ही यशस्वी झाली. या वेब सिरीज मुळे ती व्हायरल झाली. याच वेब सिरीज मुळे अनुश्रीला भरपूर प्रेम मिळू लागली. या वेब सिरीज मधून अनुश्री चा नवीन प्रवास चालू झाला.

Anushri mane biography marathi / अनुश्री माने यांचा जीवनप्रवास – माने हिने लहान वयातच कष्ट करायला सुरुवात केली. ती अजूनही आपल्या स्वप्नांसाठी आईसाठी खूप कष्ट घेत आहे. अनुश्री मानेची ही कहाणी खूप प्रेरणादायी आहे.

Anushri mane instagram account

Anushri mane instagram account – anushrisurekhamane

हेहि वाचा – Ashok todmal life story/ अशोक तोडमल जीवनप्रवास

हेही वाचा – Salgar Amruttulya chaha story/ सलगर अमृततुल्य चहा यशोगाथा.

हेही वाचा – Sunny jadhav biography in marathi / ( रुबाब मेन्स वेअर ) यांची वाटचाल.

हेही वाचा – Tanaji galgunde biography in marathi/तानाजी गलगुंडे यांचा जीवनप्रवास