रविराज साबळे पाटील जीवनप्रवास / Raviraj Sable Patil Biography.

Raviraj Sable Patil Biography.

रविराज साबळे पाटील हे नाव महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यां साठी शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून घेतले जाते. रविराज साबळे पाटील….. हे एक संघर्षातून घडलेल्या व्यक्तिमत्व आहे जे संपूर्ण जगाला दाखवून देत आहे की जर शेती ही योग्य पद्धतीने केली गेली तर त्यासारखा दुसरा व्यवसाय कोणताच नाही. शेती मधूनही अफाट पैसा मिळवता येतो. फक्त शेती करण्याची जिद्द आणि योग्य पद्धत माहिती हवी. रविराज साबळे पाटील हे शेतकऱ्यांना शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल यासाठी धडपड करत असतात. रविराज साबळे पाटील यांनी अनेक शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी व जास्त नफा मिळवण्यासाठी योग्य असे मार्गदर्शन केले आहे. यामुळेच यांना शेतीतील राजा माणूस म्हणून ओळखले जाते. या लेखातून रविराज साबळे पाटील यांचा संघर्ष पाहणार आहोत. व त्यांच्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Raviraj Sable Patil Image

Raviraj Sable Patil Biography.

About The Raviraj Sable Patil

रविराज साबळे पाटील हे महाराष्ट्रातील एका सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले आहेत. त्यांच्या घरची परिस्थिती जेमतेम होती. रविराज साबळे पाटील यांनी आपले माध्यमिक शालेय शिक्षण हे गावातील सरकारी शाळेमध्ये पूर्ण केले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रविराज पाटील यांनी इंजिनिअरिंग क्षेत्रात करियर करण्याचा विचार केला. पण इंजिनिअरिंग क्षेत्रात त्यांना करिअर करायचे नव्हते त्यांना डॉक्टर व्हायचे होते पण घरातील दबावामुळे त्यांनी इंजिनिअरिंग केले. रविराज साबळे पाटील यांचे वडील शेतकरी आहेत. रविराज साबळे पाटील यांना लहानपणापासूनच मोठे होण्याची इच्छा होते. आपले स्वतःचे घर असावे बंगला असावा गाडी असावी अशी त्यांची स्वप्ने होते. ही स्वप्ने घेऊन रविराज साबळे पाटील कष्ट करत होते. त्यांनी अनेक व्यवसाय केले. पण त्यांना हवे तसे सक्सेस मिळत नव्हते. कोणत्याच क्षेत्रात व कोणत्याच व्यवसायात यश मिळत नसल्याने रविराज साबळे पाटील यांनी आपले क्षेत्र बदलण्याचा निर्णय घेतला. रविराज यांना डॉक्टर व्हायचे होते पण त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक वेगवेगळे व्यवसाय केले. पण अपेक्षेप्रमाणे यश मिळत नसल्याने त्यांनी हे व्यवसायही बंद करून शेवटी रविराज साबळे पाटील यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. शेती करत असताना त्यांनी सोशल मिडिया या platform वरही आपले काम करण्यास सुरुवात केली. शेती करताना सुरुवातीला त्यांना कोणताही सपोर्ट नव्हता. सुरुवात करताना त्यांनी एकच विचार केला होता की आपण शेती करायची व आपल्या सोबत इतर शेतकऱ्यांनाही मोठे करायचे. शेतकऱ्यांना सपोर्ट करायचा. यातून रविराज साबळे पाटील यांनी शेती करण्यास सुरुवात केली. या क्षेत्रात रविराज साबळे पाटील यांना भरपूर सक्सेस मिळाली.

या क्षेत्रात उतरल्या नंतर रविराज साबळे पाटील यांनी अफाट कष्ट केले. भरपूर चढ-उतार पाहिले. पण माघार घेतली नाही. रविराज साबळे पाटील एकही पीक आजपर्यंत त्यांनी फेल जाऊ दिले नाही. शेतीतून त्यांनी भरपूर नफा मिळवला. यानंतर रविराज साबळे पाटील यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यास सुरुवात केली. रव्यात साबळे पाटील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विषयांची माहिती देतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांना मदत करतात. किती शेतकऱ्यांना रविराज साबळे पाटील यांनी एका एकर मधून 10 ते 15 लाख उत्पन्न मिळवण्यास मदत केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पोशिंदा यांचे रविराज साबळे पाटील यांच्या वरती अफाट प्रेम आहे. रविराज साबळे पाटील यांनी आधुनिक पद्धतीने शेती कशा प्रकारे केली जाते याची माहिती शेतकऱ्यां पर्यंत पोहोचवली. रविराज साबळे पाटील हे आपल्या स्व अनुभवातून शेतकऱ्यांना माहिती देतात.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते सुरुवातीपासून शेवतार्यंत संपूर्ण मार्गदर्शन करतात . कोणते पिक घ्यायचे , पिकाला कोणते औषध द्यायचे अशी संपूर्ण माहिती रविराज साबळे पाटील देतात. यासाठी ते काही Paid Service Provide करतात. या सर्विस मध्ये शेतकर्याला पूर्ण सपोर्ट दिला जातो. पूर्ण शेतीविषयक Structure ची माहिती दिली जाते. एक एकर मधून शेतकऱ्याला कमीत कमी १० ते 15 लाखापर्यंत उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला जातो . रविराज साबळे पाटील यांचे आत्तापर्यंत घेतलेले एकही पिक फेल गेलेले नाही. यामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा रविराज साबळे पाटील यांच्यावर विश्वास आहे. यासोबतच रविराज साबळे पाटील हे आपल्या सोशल मीडिया अकाउंट च्या माध्यमातून जमेल तितके शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विषयाची वेगवेगळ्या पिकांची तसेच शेती करण्याच्या पद्धती बद्दल माहिती सांगत असतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ही त्यांचे अनेक फॉलोवर्स आहेत. अविनाश साबळे पाटील यांचे यूट्यूब , इंस्टाग्राम , आणि फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती लाखो चाहते आहेत. रविराज साबळे पाटील यांच्या स्वभावामुळे व मदत करण्याच्या वृत्तीमुळे महाराष्ट्रातील पोशिंद्याचे रविराज साबळे पाटील यांच्यावर प्रचंड विश्वास व भरपूर प्रेम आहे.

Raviraj Sable Patil Contact –

Raviraj Sable Patil Instagram Id

ravirajsabalepatil

Raviraj Sable Patil Youtube Channel

RAVIRAJ SABALE-PATIL

Raviraj Sable Patil Facebook Account

Raviraj Sabale-Patil 

हेही वाचा – अरबाज पटेल यांचा जीवनप्रवास / Arbaj Patel Biography In Marathi.

हेही वाचा – संग्राम चौगुले यांचा जीवनप्रवास / Sangram Chougule Biography in Marathi.

हेही वाचा – Dhananjay Powar DP Dada यांचा संपूर्ण जीवन प्रवास पहा येथे.