Salgar Amruttulya chaha story/ सलगर अमृततुल्य चहा यशोगाथा.
दादू सलगर यांची यशोगाथा –
Salgar Amruttulya story/ सलगर अमृततुल्य चहा यशोगाथा- सलगर अमृततुल्य चहा या चहाने आत्मा तृप्त करण्याच्या चहाची गोष्ट आपण पाहणार आहोत. सलगर अमृततुल्य चहा हे नाव चहा प्रेमींसाठी एक वरदानच आहे. याच चहाची सुरुवात कशी झाली व याच्या 550 शाखांचा प्रवास आज आपण पाहणार आहे.
Salgar amruttulya chaha owner – सलगर अमृततुल्य चहा.
सलगर अमृततुल्य चहा हा उद्योग दादू सलगर यांनी सुरू केला.
About the dadu salgar
Salgar Amruttulya chaha story/ सलगर अमृततुल्य चहा यशोगाथा- दादू सलगर हे दुष्काळग्रस्त भागातील आहेत. यांचे बालपण हे अतिशय कष्टात गेले. त्यांचे आई-वडील शेतकरी होते. पण दुष्काळग्रस्त भागात असल्यामुळे दादू सलगर यांचे आई-वडील कोकणात चिराच्या खाणीवर कामासाठी जात असत. दादू सलगर हे त्यावेळी आई-वडिलांसोबत एका झोपडीत राहत. अशा परिस्थितीतच दादू सलगर यांनी त्यांचे बारावीचे शिक्षण पूर्ण केले. 12 वी नंतर दादू सलगर यांना बीकॉम मध्ये आपले शिक्षण पूर्ण करायचे होते. त्याने बीकॉम साठी ऍडमिशन ही घेतले होते. पण दादू सलगर यांनी घरच्या बिकट परिस्थितीमुळे आपले शिक्षण अर्ध्यावरती थांबवले. घरची परिस्थिती बिकट असल्या कारणामुळे दादू सलगर यांनी शिक्षण बंद करून आपल्या वडिलांना शेतीत मदत करण्यास सुरुवात केली.
दोन ते तीन वर्षे दादू सलगर यांनी शेती केली. पण त्यांना यात काहीच फायदा मिळत नव्हता. त्यांनी शेती करणे सोडून दिले. यानंतर त्यांनी गावातील एका मित्रासोबत शेळीपालन हा व्यवसाय चालू करण्याचा निर्णय घेतला. हा व्यवसाय तेवर त्यांचा मित्र हे दोघे मिळून करत असत. शेळीपालनाचा व्यवसाय दादू सलगर यांनी जवळ जवळ आठ ते नऊ महिने केला. पण यातही त्यांना अपयश मिळाले. हा व्यवसाय ही त्यांनी बंद केला. त्यानंतर दादू सलगर यांनी एका मित्राची शेती करायला घेतली. ते त्या शेतात भाजीपाला करू लागले. पण अवकाळी पाऊस, बाजार भाव, व पिकांवरील रोग या सर्व कारणांमुळे या व्यवसायातही त्यांचे मोठे नुकसान झाले. हा व्यवसाय ही त्यांनी बंद केला.
दादू सलगर यांनी अनेक प्रयत्न केले पण त्यांना यश मिळत नव्हते. शेवटी त्यांनी पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. दादू सलगर यांनी आपल्या बायकोचे सोन्याचे दागिने विकले. व त्यातून त्यांना 3000 रुपये मिळाले. ते 3000 रुपये घेऊन ते पुण्याला आले. पुण्यात आल्यानंतर दादू सलगर यांनी अनेक ठिकाणी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना नोकरी मिळत नव्हती. काही दिवसांनी दादू सलगर यांना ATM मशीन बाहेर सिक्युरिटी गार्डची नोकरी मिळाली. ते ती नोकरी करू लागले. पण काही दिवसातच त्यांना ती नोकरी सोडावी लागली. यानंतर दादू सलगर यांनी पुणे शहर सोडले.
पुणे शहर सोडल्यानंतर दादू सलगर हे कोल्हापूर येथे आले. कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी स्वतःचा छोटासा व्यवसाय चालू केला. दादू सलगर यांनी कोल्हापुरात येऊन ज्यूसचा गाडा चालू केला. या व्यवसायात त्यांना चांगला फायदा होऊ लागला. जे ग्राहक त्यांच्याकडे ज्यूस पिण्यासाठी येत असत ते ग्राहक जे रेग्युलर कस्टमर होत असत. यातूनच त्यांनी ज्यूस चे आठ गाडे चालू केली. या ज्यूस च्या गाड्यावर ते दुष्काळग्रस्त भागातील मुलांना काम देत असत. पण त्या भागात एक पद्धत अशी आहे की कामगाराला वर्षभराचा पगार द्यावा लागत व त्यानंतर कामगार त्यांच्याकडे काम करण्यास येत असे.
ज्यूस चा व्यवसाय हा फक्त तीन महिन्यांसाठी होत असे. उन्हाळ्याच्या काळात यास मोठी मागणी असे. पण त्यानंतर या व्यवसायात काहीही उत्पन्न होत नसे. म्हणून दादू सलगर यांनी खेळण्याचा व्यवसाय चालू केला. पण यात दादू सलगर यांना मोठे नुकसान झेलावे लागले. या व्यवसायात दादू सलगर यांनी जवळ जवळ 10 लाखापर्यंत नुकसान पचवले. याच काळात दादू सलगर यांनी शेअर मार्केट मध्ये दोन ते तीन लाख रुपये गुंतवले होते. पण ते पैसेही बुडाले. या काळात दादू सलगर यांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागला. ते पूर्णपणे खचून गेले होते. त्यांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार येत होता. पण त्यांनी आणि एकदा शेवटचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला.
Salgar amruttulya chaha recipe
दादू सलगर यांनी अशा परिस्थितीतही हार मानली नाही. त्यांनी त्यांची जिद्द सोडली नाही. दादू सलगर यांनी परत व्यवसाय करायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी चहाची टपरी चालू केली. यावेळी मेहनत तर होतीच पण आधीच्या व्यवसायांमध्ये केलेल्या चुका ते परत करत नव्हते. भरपूर अनुभव होता. ते परत जोमाने मेहनत करू लागले. ते भरपूर कष्ट घेऊ लागले. त्यांनी बनवलेला चहा लोकांना आवडू लागला. त्यांच्याकडे रेगुलर ग्राहक येऊ लागले. या व्यवसायात दादू सलगर यांना यश मिळू लागले. त्यानंतर दादू सलगर यांनी आपल्या छोटीशी टपरी चे रूपांतर एक दुकानात केले होते. त्यांनी सलगर अमृततुल्य चहा हा सेटअप उभा केला. तर दादू सलगर यांच्याकडे लोक येत व सलगर अमृततुल्य चहाची शाखा मागत असत. दादू सलगर यांनी शाखा देण्याची सुरुवात केली. दादू सलगर यांनी 4 लाख रुपये गुंतवून सुरू केलेला व्यवसाय हा कोट्यवधींची उलाढाल आज करत आहे. आज सलगर अमृततुल्य चहा या उद्योगाच्या जवळपास 550 शाखा महाराष्ट्रात पसरलेल्या आहेत.
Salgar amruttulya chaha
अनेक संकटांना तोंड देऊन दादू सलगर यांनी इथे पर्यंतचा प्रवास केलेला आहे. त्यांनी आपल्या जिद्दीने अनेक संकटांवर मात केली आहे. दादू सलगर यांचा संघर्ष आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. दादू सलगर यांच्या कष्टाने व मेहनतीने त्यांनी समृद्धी यश संपत्ती मिळवली आहे.
Salgar amruttulya chaha franchise cost
दादू सलगर हे आपल्या सलगर अमृततुल्य चहा या उद्योगाची शाखा साडेतीन लाख ते पाच लाख पर्यंत देतात.
Salgar amruttulya chaha official website / सलगर अमृततुल्य चहा
इथे पहा – सलगर अमृततुल्य चहा.
सलगर अमृततुल्य चहा या उद्यागाची माहिती व शाखा घेण्यासाठी वरील Website पहा.
हेही वाचा – Sunny jadhav biography in marathi / ( रुबाब मेन्स वेअर ) यांची वाटचाल.
हेही वाचा – Tanaji galgunde biography in marathi/तानाजी गलगुंडे यांचा जीवनप्रवास
हेही वाचा – gaurav more biography in marathi / गौरव मोरे यांचा जीवनप्रवास.
हेही वाचा – Shiv thakare biography in marathi / मराठी माणूस शिव ठाकरे यांचा जीवनप्रवास.