संग्राम चौगुले यांचा जीवनप्रवास / Sangram Chougule Biography in Marathi.

संग्राम चौगुले यांचा जीवनप्रवास / Sangram Chougule Biography in Marathi –

Sangram Chougule Biography in Marathi

बिग बॉस मराठी सीजन 5 हा कार्यक्रम महाराष्ट्रात सध्या गाजत आहे. मागील गेल्या चार सीजन पेक्षा या सीझनला जास्त पसंती दिली जात आहे. या सीजन मधून आपल्याला अनेक नवीन कलाकारांची ओळख झाली. अनेक कलाकारांविषयी आपल्याला माहिती मिळाली. यामध्ये अंकिता वालवाल कर , डीपी दादा , निकिता तांबोळी , अभिजीत सावंत , या कलाकारांना प्रेक्षकांकडून जास्त पसंती दिली जात आहे. यातीलच एक वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणजे कोल्हापूरचा पैलवान व मिस्टर वर्ल्ड ही ख्याती मिळवलेला कोल्हापूरचा बॉडी बिल्डर संग्राम चौगुले. हा प्रवास संग्राम चौगुले साठी काही सोपा नव्हता. या लेखात आपण संग्राम चौगुले यांची माहिती घेणार आहोत. यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत.

Sangram Chougule Age

संग्राम चौगुले यांचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापूर मध्ये 28 डिसेंबर 1979 रोजी झाला. संग्रामची वडील शिक्षक होते. संग्रामच्या घरची परिस्थिती जेमतेम होती. संग्रामच्या वडिलांच्या कमाई वरती सहा लोकांचा उदरनिर्वाह होत असे. संग्रामने प्राथमिक शिक्षण गावातील शाळेतून पूर्ण केले. व 12 वी नंतर संग्रामने पॉलिटेक्निक कॉलेज बहादुरगड येथून इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग चे शिक्षण पूर्ण केले. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर संग्राम चौगुले याने पुण्यातील मॉर्डन कॉलेज मध्ये बीएचे शिक्षण घेतले. शिक्षक कुटुंबात जन्म झाल्यामुळे संग्रामच्या शिक्षणावर जास्त भर दिला जात होता.

About The Sangram Chougule

Sangram Chougule Wife

पण संग्रामला कुस्ती व बॉडी बिल्डिंग मध्ये जास्त रस होता. संग्राम चौगुले यांनी हौस म्हणून 2001 मध्ये बॉडी बिल्डिंग करण्यास सुरुवात केली. कॉलेजमध्ये शिकत असताना तो पुण्यातील नावाच्या एका मुलीच्या प्रेमात पडला आणि नंतर लग्न झाले स्नेहल ही फॅशन डिझायनर आहे. लग्नानंतर संग्राम चौगुले एका कंपनीत काम करू लागला. काम करून मिळणारा मोबदला हा घर चालवण्यासाठी व बॉडी बिल्डिंग करण्यासाठी कमी पडत होता. यामुळे संग्राम चौगुले यांनी बॉडी बिल्डिंग सोडण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट जेव्हा त्याच्या जवळच्या मित्रांना समजली त्यावेळी त्या मित्रांनी त्याला खूप सपोर्ट केला. संग्रामच्या मित्रांनी अनेक दिवसांच्या प्रशिक्षणाचा खर्च उचलला. याच मित्रांमुळे संग्राम चौगुले बॉडी बिल्डिंग सुरू ठेवू शकला.या गोष्टीत रस असल्यामुळे संग्राम चौगुले मन लावून मेहनत घेऊ लागला व या गोष्टीमध्ये उतरला. याच कष्टाचा मोबदला म्हणून संग्राम चौगुले याला 2010 मध्ये मिस्टर इंडिया फिट ही पदवी मिळवली. ही पदवी मिळाल्यानंतर संग्राम चौगुले यांनी जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याचा निर्णय घेतला. व त्यासाठी तयारी चालू केली. या निर्णयानंतर संग्राम चौगुले यांनी अतोनात कष्ट केले. 2011 मध्ये संग्राम चौगुले यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर मिस्टर एशिया मध्ये तिसरा क्रमांक पटकावला. लगेचच 2012 मध्ये संग्राम चौगुले याने चीनमध्ये मिस्टर युनिव्हर्स चा मान मिळवला. इथपर्यंतचा प्रवास संग्राम चौगुले याने भरपूर कष्ट व मेहनत केली. व मिस्टर युनिव्हर्स हा नावलौकिक मिळवला.

Sangram Chougule Height

संग्राम चौगुले यांची उंची 5’8” inch इतकी आहे.

Sangram Chougule Biography in Marathi-

2013 साली एका स्पर्धेत स्टेज शोदरम्यान संग्राम चौगुले पोज देत होता त्यावेळी अचानक पायाला फ्रॅक्चर झाले . या फ्रॅक्चर नंतर संग्राम ला पूर्णपणे बेड रेस्ट घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. यावेळी संग्राम चौगुले याची आर्थिक तयारी नव्हती. या काळात संग्राम चौगुले यांनी खूप चढ-उतार पाहिले. पण संग्रामने आपली जिद्द सोडली नाही. संग्रामने आपल्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले व याच काळात त्याने फिनिक्स नावाने एकूण आठ जीव उभारले. यानंतर संग्राम आर्थिक दृष्ट्या स्टेबल झाला होता. या सगळ्यातून सावरल्यानंतर संग्रामने पुन्हा एकदा आपल्या शरीरावर काम करण्यास सुरुवात केली. यावेळीही त्याने शून्यातून सुरुवात केली व भरपूर मेहनत केली. व पुन्हा एकदा संग्राम चौगुले याने मिस्टर वर्ल्ड हा किताब मिळवला. पुन्हा एकदा संग्राम चौगुले याने आकाशाला साद घातली होती. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. 2015 साली संग्राम चौगुले यांचा कार अपघात झाला. या अपघातात संग्राम चौगुले यांच्या छाती आणि खांद्याला मार लागला. या अपघातात संग्रामच्या शरीराचे भरपूर नुकसान झाले. यानंतरही संग्रामने हार मानली नाही. त्याने पुन्हा स्वतःला तयार केले.

संग्राम चौगुले यांनी बॉडी बिल्डिंग सोबतच अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केले व याच बरोबर मोडेलिंग ही केले. 2014 मध्ये धतिंग धिंगाणा या मराठी चित्रपटांमधून संग्राम चौगुले याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. व प्रेम साथी कमिंग सून यामध्ये अभिनय केला. याचबरोबर दंडम, आलाय माझ्या राशीला व द मॅग्नेटिक फायर्स अशा चित्रपटात काम केले.

Sangram Chougule in Bigg Boss

संग्राम चौगुले याला बिग बॉस सीजन 5 या कार्यक्रमात वाइल्ड एंट्री मिळाली. संग्राम चौगुले याला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम व पाठिंबा मिळत आहे.

Sangram chougule protein brand

Absolute Nutrition

Sangram Chougule Instagram id

sangram_chougule_official

हेही वाचा – Dhananjay Powar DP Dada यांचा संपूर्ण जीवन प्रवास पहा येथे.

हेही वाचा – सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे शीला दीदी यांचा जीवन प्रवास.

हेही वाचा – प्रदीप मराठे यांचा जीवनप्रवास / Pradip Marathe Success Story .